‘राम मंदिर उद्घाटनाला जाणार नाही, उद्या मनोज जरांगेंच्या गुन्हेगारी संदर्भात…’; गुणरत्न सदावर्ते यांचं मोठं विधान

मनोज जरांगे पाटील सांगितल्याप्रमाणे मोठ्या संख्येने मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईच्या दिशेने रवाना झाला आहेत. मात्र त्याआधी वकील गुणरत्न सदावर्ते जरांगे यांच्याविरोधात कोर्टात जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. नेमकं काय म्हणालेत जाणून घ्या.

'राम मंदिर उद्घाटनाला जाणार नाही, उद्या मनोज जरांगेंच्या गुन्हेगारी संदर्भात...'; गुणरत्न सदावर्ते यांचं मोठं विधान
Follow us
| Updated on: Jan 21, 2024 | 5:23 PM

मुंबई : मराठा आरक्षणाचा विषय आता चांगलाच पेटला आहे. मनोज जरांगे आंदोलकांसह मोठ्या संख्येने मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. तर देशभरात सध्या राम मंदिर उद्घाटनामुळे सर्वत्र भक्तीमय वातावरण पाहायला मिळत आहे. मात्र या सोहळ्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार मात्र जाणार नाहीत. याबाबत मुख्यमंत्र्यांनी ट्विट करत माहिती दिली होती. जरांगे मुंबईला येत असल्याने मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांकडून समजली होती. अशातच वकील गुणरत्न सदावर्ते यांनी मोठं विधान केलं आहे.

काय म्हणाले सदावर्ते?

राम मंदीर निमंत्रण मला देण्यात आलं आहे. ⁠मात्र जरागे पाटील यांच्या गुन्हेगारी संदर्भात उद्या हेअरिंग आहे. ⁠त्यामुळे मला जाता येणार नाही. मात्र मी उद्या तुलसी माणस विद्या मंदिर येथे राम ललाची पूजा करणार असल्याचं सदावर्ते यांनी सांगितलं. मनोज जरांगे 26 जानेवारीला मुंबईत लाखो मराठा आंदोलकांसह पोहोचणार आहेत. मात्र त्याआधीच जरांगे यांना सदावर्ते कोर्टात खेचणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

सुट्टीविरोधात कम्युनिस्ट पक्षाकडून हाय कोर्टात याचिका दाखल

अयेध्येत रामलल्ला प्राणप्रतिष्ठा होत आहेत. मात्र हे होऊ नये सुट्टी मिळू नये यासाठी कम्युनिस्ट पक्षाच्या लोकांनी हाय कोर्टात याचिका दाखल केली होती. राम मंदीर प्रकरणात मी आणि जयश्री पाटील होत्या. कारसेवकांची बाजू त्यांनी घेतली होती. त्यामुळे आम्ही ही बाजू घेतली आणि कोर्टाने त्याची मागणी फेटाळून लावली. जी सुट्टी जाहीर केली होती त्याला कोणतीही स्थगिती नाही. ⁠रामलल्लाच्या पुजेसाठी सर्वांना सुट्टी जाहीर केली त्यावर शिक्कामोर्तब झालं आहे. अर्बन नक्षलवाद याप्रमाणे ते कोर्टात भुमिका मांडत असल्याचं गुणरत्न सदावर्ते यांनी सांगितलं

दरम्यान, राम मंदिराच्या उद्घटनादिवशी सर्व राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. उद्याच्या दिवशी सर्वांनी दिवाळी साजरी करावी, असं आवाहन पंतप्रधान मोदी यांनी देशवासियांना केलं आहे. अयोध्येमध्ये मोठ्या प्रमाणात राम भक्त दाखल झाले आहेत.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.