महाराष्ट्रासाठी मोठी बातमी, मुंबईतील ‘या’ संस्थेत कोविड लस निर्मिती करणार, अमित देशमुखांची मोठी घोषणा

आता महाराष्ट्रातील आणखी एका फार्मा कंपनीत कोरोना लस तयार होणार असल्याने याचा राज्यातील नागरिकांना मोठा लाभ होणार आहे.

महाराष्ट्रासाठी मोठी बातमी, मुंबईतील 'या' संस्थेत कोविड लस निर्मिती करणार, अमित देशमुखांची मोठी घोषणा
Follow us
| Updated on: Mar 17, 2021 | 9:46 PM

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राला अधिक कोरोना लसी मिळाव्यात अशी मागणी सातत्याने होत आहे. त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही. मात्र, आता महाराष्ट्रातील आणखी एका फार्मा कंपनीत कोरोना लस तयार होणार असल्याने याचा राज्यातील नागरिकांना मोठा लाभ होणार आहे. वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी याबाबत मोठी घोषणा केली. यानुसार हाफकिन बायोफार्मा कॉर्पोरेशन आणि हैदराबाद येथील भारत बायोटेक यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबईत कोविड लसीचे उत्पादन करण्यात येणार आहे. त्यासाठी 154 कोटी रुपये खर्चाचा नवीन प्लांट मुंबईत सुरु करण्यात येणार आहे (Haffkine Institute will manufacture Corona Vaccine in Mumbai inform Amit Deshmukh).

कोविड लसीच्या उत्पादनासाठी लस संशोधनाचा वारसा असणाऱ्या हाफकिन संस्थेने पुढे यावं असं आवाहन राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी अलिकडे केले होते. यानुसार आज वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव विजय सौरभ, हाफकिन बायोफार्मा कॉर्पोरेशनचे संचालक संदिप राठोड, जनरल मॅनेजर सुभाष शंकरवार यांच्या उपस्थितीत आज मंत्रालयात घेण्यात आलेल्या बैठकीत अमित देशमुख यांनी ही घोषणा केली.

‘पहिल्या टप्प्यात भारत बायोटेक यांच्याकडील लस ठोक स्वरुपात घेणार’

हाफकिनमार्फत सुरु करण्यात येणाऱ्या लसीचे उत्पादन 2 टप्प्यात करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात भारत बायोटेक यांच्याकडील लस ठोक स्वरुपात घेण्यात येणार आहे. ती हाफकिन बायोफार्मा कॉर्पोरेशनमार्फत रिपॅकिंग व फिलिंग करून आवश्यकतेनुसार उपलब्ध करुन देण्यात येईल. सध्या या लसीचे उत्पादन भारत बायोटेक आणि इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च यांच्यामार्फत संयुक्तपणे केले जाते.

‘… तर येत्या एप्रिल किंवा मेपासून हाफकिनमार्फत लस उपलब्ध जाईल’

कोवॅक्सिन या नावाने ही लस सध्या बाजारात आणली आहे. यापैकी इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च ही संस्था केंद्र शासनाच्या आरोग्य मंत्रालयाच्या अधिनस्त कार्यरत आहे. हाफकिन बायोफार्मा कॉर्पोरेशनला ही लस ठोक प्रमाणात लवकर मिळाल्यास येत्या एप्रिल किंवा मेपासून हाफकिनमार्फत ही लस उपलब्ध केली जाईल. तर स्वतंत्रपणे करोना लसीचे उत्पादन करण्यासाठी हाफकिन बायोफार्मा कॉर्पोरेशनला एक ते दीड वर्षाचा कालावधी लागेल.

हाफकिन बायोफार्मा कॉर्पोरेशनमार्फत कोविड लसीची गरज असेल तोपर्यंत हे उत्पादन सुरु ठेवण्यात येईल आणि त्यानंतर या प्लांटमधून श्वान दंशावरील लस विकसित करुन या लसीचे उत्पादन घेण्यात येईल किंवा वेळीवेळी लागणाऱ्या अन्य लसींच्या उत्पादनासाठी या प्लांटचा उपयोग करण्यात येईल.

भारत बायोटेककडून ठोक स्वरुपात कोविड लस पुरविण्यासंदर्भात केंद्र शासनाला सविस्तर प्रस्ताव तातडीने पाठविण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे हाफकिन बायोफार्मा कॉर्पोरेशनामार्फत नव्याने उभारण्यात येणाऱ्या प्लांटसाठी आवश्यक निधीची मागणी करण्यात येणार आहे, अशी माहिती अमित देशमुख यांनी दिली आहे.

हेही वाचा :

पंतप्रधान मोदींनी मुख्यमंत्री ठाकरेंची ‘ही’ सूचना तातडीने स्वीकारली, देशभरातील लस उत्पादनात मोठी वाढ होणार

महाराष्ट्राला दर आठवड्याला लसीचे 20 लाख डोस द्या, राजेश टोपे यांची केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडे मागणी

‘रेमिडेसिव्हर’साठीची रुग्णांच्या नातेवाईकांची पिळवणूक थांबवा, चंद्राकांत पाटलांचं आरोग्यमंत्र्यांना खरमरीत पत्र

व्हिडीओ पाहा :

Haffkine Institute will manufacture Corona Vaccine in Mumbai inform Amit Deshmukh

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.