Video Tricolor dams : हर घर तिरंगा अभियान, मुंबईत धरणातून पाणी वाहते तीन रंगांत, उजनी धरणातूनही वाहते तिरंगी पाणी

सोलापुरातील उजनी धरणाचे पाणी सोडताना तीन रंग दिसत आहेत. हिरवा, पांढरा आणि केशरी रंगात पाणी धरणातून खाली पडताना दिसत आहे. हे तीन रंग लक्ष वेधून घेत आहेत.

Video Tricolor dams : हर घर तिरंगा अभियान, मुंबईत धरणातून पाणी वाहते तीन रंगांत, उजनी धरणातूनही वाहते तिरंगी पाणी
मुंबईत धरणातून पाणी वाहते तीन रंगांत
Follow us
| Updated on: Aug 13, 2022 | 10:36 PM

मुंबई : देशात सर्वत्र हर घर तिरंगा अभियान राबविण्यात येत आहे. स्वातंत्र्याच्या 75 च्या वर्षानिमित्त राष्ट्रभक्ती जागविण्याचा प्रयत्न केला जात आहे. याचाच एक भाग म्हणून धरणही तिरंगी होऊ लागली आहेत. चार दिवसांपूर्वी केरळातील ईडुक्की (Kerala’s Idukki) धरण तिरंगी झालं होतं. आता मुंबईला पाणीपुरवठा (water flows) करणारं धरणही तिरंगी झालंय. तीन रंगातून पाणी वाहत आहे. हे वाहणारं पाणी पाहून देशभक्तीची (patriotism) भावना अधिकच प्रबळ होताना दिसत आहे. राज्यात सर्वत्र देशभक्तीचा माहौल आहे. घरोघरी तिरंगा फडकविला जात आहे. त्यात आता भर पडली आहे ती धरणांच्या सौंदर्यात. धरणांचे पाणी तीर रंगात करण्याचा कदाचित हा पहिलाच प्रयोग असेल.

सोलापुरातील उजनी धरणातून तिरंगी पाणी

सोलापुरातील उजनी धरणाचे पाणी सोडताना तीन रंग दिसत आहेत. हिरवा, पांढरा आणि केशरी रंगात पाणी धरणातून खाली पडताना दिसत आहे. हे तीन रंग लक्ष वेधून घेत आहेत. उजनी धरणही चमकत आहे. पुणे व सोलापूर जिल्ह्याच्या सीमेवरील उजनी धरण 104 टीएमची भरले. धरणाची क्षमता 117 आहे. राज्यातील सर्वात मोठ्या धरणांपैकी एक असलेल्या या धरणातून शुक्रवारी रात्री पाणी सोडण्यास आरंभ झाला. स्वातंत्र्याच्याअमृतमहोत्सव निमित्त पाण्यावर अशी तिरंगा रोषणाई केली आहे.

गोसे खुर्दमध्येही तीन रंगात वाहते पाणी

भंडाऱ्यातील गोसे खुर्द धरणातूनही अशाच प्रकारे तीन रंगात पाणी बाहेर पडताना दिसत आहे. हर घर तिरंगा अभियान राबवत असताना धरणही तिरंगी दिसू लागलीत.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.