भाजप नेत्याची काँँग्रेसवासी कन्या आझाद मैदानात, अंकिता हर्षवर्धन पाटलांची ठाकरे सरकारला एक विनंती…

मुंबईतील आझाद मैदानावर मराठा समाज आणि विद्यार्थ्यांच्या वतीने गेल्या पंधरा दिवसांपासून आंदोलन सुरु आहे. (Ankita Patil Aazad Maidan)

भाजप नेत्याची काँँग्रेसवासी कन्या आझाद मैदानात, अंकिता हर्षवर्धन पाटलांची ठाकरे सरकारला एक विनंती...
अंकिता हर्षवर्धन पाटील आझाद मैदानात आंदोलकांच्या भेटीला
Follow us
| Updated on: Feb 03, 2021 | 3:30 PM

इंदापूर : भाजप नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांची कन्या अंकिता पाटील (Ankita Patil) यांनी आझाद मैदानावरील आंदोलक मराठा विद्यार्थ्यांची भेट घेतली. विद्यार्थ्यांच्या समस्या आणि मागण्या जाणून घेत अंकिता पाटलांनी आंदोलनाला, तसेच विद्यार्थ्यांना पाठिंबा दिला. (Harshvardhan Patil daughter Ankita Patil visits Aazad Maidan to support maratha student protestants)

आंदोलन कशासाठी?

मराठा आरक्षणाला स्थगिती मिळण्यापूर्वी निवड प्रक्रिया पूर्ण झालेल्या मुंबई-मेट्रो, तलाठी, महावितरण, महानिर्मिती, स्टेट बोर्ड महाराष्ट्र सेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या विविध विभागातील निवड झालेल्या उमेदवारांना तात्काळ शासकीय सेवेमध्ये घ्यावे, यासाठी मुंबईतील आझाद मैदानावर मराठा समाज आणि विद्यार्थ्यांच्या वतीने गेल्या पंधरा दिवसांपासून आंदोलन सुरु आहे.

मराठा आंदोलक विद्यार्थ्यांना पाठिंबा

या आंदोलनाला आज पुणे जिल्हा परिषद सदस्या आणि इसमा कायदेशीर समितीच्या सहअध्यक्षा अंकिता हर्षवर्धन पाटील यांनी भेट दिली. अंकिता पाटलांनी विद्यार्थ्यांच्या समस्या आणि मागण्या जाणून घेतल्या. आंदोलनाला आणि विद्यार्थ्यांना आपला पाठिंबा त्यांनी जाहीर केला.

ठाकरे सरकारकडे अंकिता पाटलांची मागणी

विद्यार्थी लोकशाही मार्गाने आंदोलन करत आहेत. माझी सरकारला एक नम्रपूर्वक विनंती आहे की या विद्यार्थ्यांच्या सर्व समस्या आपण सोडवाव्यात आणि तात्काळ या विद्यार्थ्यांना शासकीय सेवेत रुजू करून घ्यावे, अशी मागणी अंकिता पाटील यांनी यावेळी केली.

कोण आहेत अंकिता पाटील?

अंकिता पाटील या हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या आहेत. लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी संपल्यानंतर लागलीच पुण्यातील बावडा-लाखेवाडी जिल्हा परिषद गटाची पोटनिवडणूक झाली. त्यामध्ये अंकिता पाटील यांनी विजय मिळवत राजकारणात पाऊल टाकलं. जिल्हा परिषदेची निवडणूक त्यांनी विक्रमी मताधिक्क्याने जिंकली होती. (Harshvardhan Patil daughter Ankita Patil visits Aazad Maidan to support maratha student protestants)

विधानसभेला तिकीट वाटपावरुन हर्षवर्धन पाटील यांनी भाजपात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. मात्र अंकिता आजही काँग्रेसमध्येच आहेत. 2014 च्या निवडणुकीतील प्रचार यंत्रणा, सोशल मीडिया या सर्व जबाबदाऱ्या अंकिता पाटील यांच्याकडे होत्या. त्यानंतरच्या काळात खासगी साखर उद्योगाच्या  संघटनेतही त्यांना सदस्य म्हणून काम करण्याची संधी मिळाली.

संबंधित बातम्या 

हर्षवर्धन पाटील भाजपात, मुलगी मात्र काँग्रेसमध्येच

हर्षवर्धन पाटील कन्येसह राज्यपालांच्या भेटीला, अंकिता पाटील म्हणतात…

(Harshvardhan Patil daughter Ankita Patil visits Aazad Maidan to support maratha student protestants)

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.