सचिन वाझे यांना मधुमेहाचा त्रास, जेजे रुग्णालयात विविध आरोग्य तपासण्या

सचिन वाझे यांना मधुमेह असल्याचं आरोग्य तपासणीत निष्पन्न झालं आहे. सोमवारी दुपारी अस्वस्थ वाटत असल्यानं सचिन वाझे यांनी जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

सचिन वाझे यांना मधुमेहाचा त्रास, जेजे रुग्णालयात विविध आरोग्य तपासण्या
NIA ने या कटात सहभागी असलेल्या स्कॉर्पिओ आणि इनोव्हा या दोन्ही गाड्यांच्या चालकांची ओळख पटवली आहे. याप्रकरणातील संशयित सचिन वाझे यांनीच ही माहिती 'एनआयए'ला दिल्याचे समजते.
Follow us
| Updated on: Mar 15, 2021 | 6:51 PM

मुंबई : मुकेश अंबानी यांच्या घराजवळ सापडलेली स्फोटकांनी भरलेली गाडी आणि मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात नाव आलेले सचिन वाझे यांना मधुमेह असल्याचं आरोग्य तपासणीत निष्पन्न झालं आहे. सोमवारी दुपारी अस्वस्थ वाटत असल्यानं सचिन वाझे यांनी जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तिथे त्यांच्या प्रकृतीबाबत अनेक चाचण्या करण्यात आल्या. त्यानंतर त्यांना मधुमेहाचा त्रास असल्याचं रुग्णालयाकडून सांगण्यात आलं आहे.(Health check-up of Sachin Waze at JJ Hospital, Sachin Waze is diagnosed with diabetes)

सचिन वाझे यांची रविवारीही डॉक्टरांकडून तपासणी करण्यात आली होती. त्यानंतर आज पुन्हा एकदा NIAच्या टीमने त्यांना जेजे रुग्णालयात दाखल केलं. तिथे त्यांची ECG तपासणी करण्यात आली. तसंच मधुमेहाचीही तपासणी करण्यात आली. त्यावेळी वाझे यांना मधुमेहाचा त्रास असल्याचं आरोग्य तपासणीत स्पष्ट झालं आहे. त्यानंतर संध्याकाळी त्यांना रुग्णालयातून पुन्हा एकदा NIAच्या कार्यालयात नेण्यात आलं.

शनिवारीही वाझेंची प्रकृती खालावली

यापूर्वी शनिवारी रात्रीही सचिन वाझे यांची प्रकृती खालावली होती. एनआयएने त्यांची सलग 13 तास चौकशी केली होती. त्यामुळे सचिन वाझे यांना थकवा जाणवायला लागला होता. त्यामुळे सचिन वाझे मुंबईच्या जे.जे. रुग्णालयात गेले होते. याठिकाणी त्यांना सलाईन लावण्यात आले होते, अशी माहितीही सूत्रांनी दिली होती. त्यानंतर आता सलग दुसऱ्या दिवशी सचिन वाझे यांच्यावर डॉक्टर बोलावून उपचार करण्याची वेळ आली आहे. सचिन वाझे यांच्या चौकशीत कोणताही अडथळा येऊ नये म्हणून NIA कडून त्यांची सर्वतोपरी काळजी घेतली जात आहे.

‘एनआयए’चा फास आणखी आवळला; सचिन वाझेंना 10 दिवसांची पोलीस कोठडी

मनसुख हिरेन प्रकरणामुळे चर्चेत असलेले सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे (Sachin Vaze) यांना एनआयएच्या विशेष न्यायालयाने रविवारी 10 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. त्यामुळे आता सचिन वाझे यांची कसून चौकशी करण्याचा राष्ट्रीय तपासयंत्रणेचा (NIA) मार्ग मोकळा झाला होता.

त्यामुळे आता पुढच्या काही दिवसांत एनआयए सचिन वाझे यांच्याकडून कोणती माहिती बाहेर काढणार, हे पाहावे लागेल. आतापर्यंतच्या चौकशीत सचिन वाझे यांनी एनआयएला बरीच खळबळजनक माहिती दिली होती. त्यामुळे आता आगामी काळात याप्रकरणातील आणखी कोणत्या गोष्टी बाहेर येणार, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

संबंधित बातम्या :

सचिन वाझेंची तब्येत पुन्हा बिघडली; NIA च्या कार्यालयात मध्यरात्री डॉक्टर बोलावले?

स्कॉर्पिओ गाडीवर सचिन वाझेंच्या हाताचे ठसे; NIA ने पुरावे दाखवल्यानंतर वाझेंची बोलती बंद

Health check-up of Sachin Waze at JJ Hospital, Sachin Waze is diagnosed with diabetes

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.