आधी फडणवीस म्हणाले, आरोग्य भरतीत दलालांचा सुळसुळाट, आता व्हायरल Audio Clip ने शंका वाढवली

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दलाल घुसल्यामुळेच आरोग्य विभागाची परीक्षा रद्द झाल्याचा संशय व्यक्त केला होता. आता ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानं शंका वाढल्याचं बोललं जातंय.

आधी फडणवीस म्हणाले, आरोग्य भरतीत दलालांचा सुळसुळाट, आता व्हायरल Audio Clip ने शंका वाढवली
Health Department Recruitment
Follow us
| Updated on: Sep 27, 2021 | 1:23 PM

मुंबई:  राज्यात आरोग्य सेवा भरती घोटाळ्यात मोठा घेटाळा होत असल्याचा आरोप ओबीसी नेता प्रकाश शेंडगे यांनी केला आहे. प्रकाश शेंडगे यांनी महाविकास आघाडी सरकारवर गंभीर आरोप केला आहे. आरोग्य भरतीसंदर्भात मध्यस्थ आणि दलाल यांच्यातील संभाषणाची एक ऑडिओ क्लिप व्हायरल होतं आहे. व्हायरल होत असलेल्या क्लिपची टीव्ही 9 मराठी पष्टी करत नाही.  विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दलाल घुसल्यामुळेच आरोग्य विभागाची परीक्षा रद्द झाल्याचा संशय व्यक्त केला होता. विद्यार्थ्यांकडे 5, 10 ते 15 लाख रुपयांची मागणी करुन, भरती करण्याचं आश्वासन दिलं जात आहे. त्यामुळे परीक्षा रद्द का झाली याची तर चौकशी व्हायलाच हवी, पण या दलालांचाही शोध घेऊन आवश्यक ती कारवाई करावी, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. आता ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानं शंका वाढल्याचं बोललं जातंय.

ऑडिओ क्लिप व्हायरल

भरतीसाठी एजंटमार्फत 15 लाख मागितले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. क्लास डी साठी 6, क्लास बी साठी 13 लाख मागितल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. काम शंभर टक्के होणार, अशी एजंटकडून लोकांना बतावणी करण्यात येत आहे.

प्रकाश शेंडगे यांचे सरकारवर आरोप

हे प्रकरण धक्कादायक आहे. यामध्ये फार मोठा भ्रष्टाचार झाल्याची शक्यता आहे. ऑडिओ क्लिपमध्ये अमरावती जिल्ह्याचा उल्लेख आहे. मात्र व्याप्ती राज्यभर असण्याची शक्यता आहे. क्लिपमध्ये न्यासा कंपनीचा उल्लेख आहे. न्यासा कंपनीचा मालक 84 दिवस तुरुंगात राहून आलेला आहे. काळ्या यादीत टाकलेल्या कंपनीला कंत्राट देण्यात आलं, काय चाललंय नेमकं? या संपूर्ण प्रकरणाची सीआयडी चौकशी झाली पाहिजे.समाजातील सर्व घटकांची मुलं या परीक्षेची तयारी करत होते. या प्रकरणातील झारीतील शुक्राचार्य कोणं हे समोर आलं पाहिजे, अशी मागणी प्रकाश शेंडगे यांनी केली आहे.

प्रकाश शेंडगे यांच्या आरोपात 100 टक्के तथ्य आहे. देवेंद्र फडणवीस यांनी काही दलाल फिरत असल्याचं वक्तव्य केलं होतं.आरोग्य भरतीत महाघोटाळा झाल्याचा आरोप मी केला होता. न्यासा कंपनी नॉट क्वालिफाईड असं लिहिण्यात आलं होतं त्याचा आदेश माझ्याकडं आहे. या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे, असं प्रविण दरेकर म्हणाले.

परीक्षा लांबणीवर टाकल्यानं विद्यार्थ्यांना मनस्ताप

आरोग्य विभागाच्या परीक्षा पुढे ढकलल्याने राज्यभरातील विद्यार्थ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. मात्र या परीक्षेच्या नियोजनाचं काम ज्या न्यासा कम्युनिकेशन या कंपनीला आरोग्य विभागाने दिल होतं त्या कंपनीच्या अकार्यक्षमतेमुळे परीक्षा पुढे ढकलावी लागली, असं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितलंय. या कंपनीबाबत माहिती घेतली असता ही मूळ दिल्लीची कंपनी असून अशा प्रकारच्या परिक्षांचे आयोजन त्यासोबत परीक्षांचे नियोजन करण्याचं काम ही कंपनी करते.

या कंपनीचे एक कार्यालय मुंबईतील नरिमन पॉइंट इथल्या डालामाल टॉवर या इमारतीत असल्याचं या कंपनीच्या संकेतस्थळावर सांगण्यात आलंय. टीव्ही 9 मराठीच्या टीमने तिथे भेट दिली असता आज मात्र हे कार्यालय बंद असून तिथे कुठल्याही प्रकारचं काम सुरु नाहीये. शिवाय या संकेतस्थळावर देण्यात आले संपर्क क्रमांक देखील बंद आहेत.

इतर बातम्या:

आरोग्य विभागाची परीक्षा पुढे ढकलली, विद्यार्थ्यांना त्रास झाला, मनापासून माफी मागतो, आरोग्यमंत्र्यांची प्रतिक्रिया

जमत नसेल तर खुर्च्या खाली करा, लगोलग विद्यार्थ्यांची नुकसान भरपाई द्या, आरोग्य विभागाच्या भोंगळ कारभाराने भाजप आक्रमक

'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण.
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट.
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ.
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये.
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल.
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?.
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?.
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'.
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा.