खडसेंवरील गुन्हा रद्द होणार?; आज कोर्टात सुनावणी

राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्याविरोधात ईडीने गुन्हा दाखल केला आहे. (hearing on eknath khadse plea in bombay high court)

खडसेंवरील गुन्हा रद्द होणार?; आज कोर्टात सुनावणी
Eknath Khadse
Follow us
| Updated on: Jan 25, 2021 | 10:28 AM

मुंबई: राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्याविरोधात ईडीने गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा रद्द व्हावा म्हणून खडसे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून त्यावर आज सुनावणी होणार आहे. तसेच ईडीही आज खडसेंविरोधात अतिरिक्त प्रतिज्ञापत्र कोर्टात सादर करणार आहे. त्यामुळे खडसेंविरोधातील गुन्हा रद्द होणार का? याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे. (hearing on eknath khadse plea in bombay high court)

ईडीने एकनाथ खडसे यांची सुमारे साडेसहा तास कसून चौकशी केली होती. त्यानंतर त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. हा गुन्हा रद्द व्हावा म्हणून खडसे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर गुरुवारी कोर्टात सुनावणी झाली. कोर्टात खडसे यांच्या वकिलांनी गुन्हा रद्द करण्याची जोरदार मागणी केली. तर ईडीच्या वकिलांनी त्याला विरोध केला. आमच्याकडे खडसेंविरोधात अनेक पुरावे आहेत. अनेक साक्षीदार आहेत. याबाबत आम्हाला कोर्टात अतिरिक्त प्रतिज्ञापत्रं सादर करायचं आहे. त्यामुळे खडसेंवरील गुन्हा रद्द करू नये, असं ईडीने म्हटलं होतं. त्यावर कोर्टाने ईडीला अतिरिक्त प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले होते. ईडी आज हे प्रतिज्ञापत्रं कोर्टात सादर करणार असून त्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

साडेसहा तास चौकशी

दरम्यान, 15 जानेवारी रोजी पुण्यातील भोसरी येथील जमीन खरेदी प्रकरणी खडसे आणि त्यांच्या कन्येची आज ईडीकडून सुमारे साडे सहातास चौकशी करण्यात आली. ईडीकडून आपल्यावर कोणताही दबाव टाकण्यात आला नाही. ईडीला जेव्हा जेव्हा गरज पडेल, तेव्हा तेव्हा त्यांना सर्व सहकार्य करण्यात येईल, असं खडसे यांनी सांगितलं होतं.

खडसे 15 जानेवारी रोजी सकाळीच ईडीच्या कार्यालयात गेले होते. यावेळी त्यांची साडे सहातास कसून चौकशी करण्यात आली. यावेळी त्यांच्या कन्येचीही चौकशी करण्यात आली. या चौकशी नंतर संध्याकाळी पावणे सहाच्या सुमारे खडसे ईडी कार्यालयातून बाहेर पडले. यावेळी मीडियाने त्यांना गराडा घातला असता खडसे यांनीही प्रतिक्रिया व्यक्त केली. ईडी मला जेव्हा जेव्हा कागदपत्रं आणि इतर माहितीसाठी बोलावेल तेव्हा तेव्हा मी हजर राहीन. ईडीला सर्व सहकार्य करणार आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. मात्र, आजच्या चौकशीत काय काय विचारणा करण्यात आली, हे सांगणं त्यांनी टाळलं होतं. (hearing on eknath khadse plea in bombay high court)

संबंधित बातम्या:

भोसरी भूखंड प्रकरणात नोटीस, 30 डिसेंबरला ईडी कार्यालयात हजर राहणार, एकनाथ खडसेंची पहिली प्रतिक्रिया

एकनाथ खडसे यांना कोरोना, खासगी चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह

भोसरी भूखंड प्रकरणी खडसेंची ईडी चौकशी, तारीख आणि वेळ ठरली

एकनाथ खडसेंची साडे सहातास चौकशी; तपासानंतर दिली ‘ही’ प्रतिक्रिया

(hearing on eknath khadse plea in bombay high court)

पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोडी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोडी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.