AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai Rains : म्हणून मुंबई तुंबणारच, महापालिका आयुक्त चहल यांनी कारण सांगितलं!

मुंबईत 104 टक्के नालेसफाई झाल्याचा दावा महापालिकेने केलेला असतानाच पहिल्याच पावसात मुंबई तुंबली आहे. मुंबई का तुंबली? यावर महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी उत्तर दिलं आहे.

Mumbai Rains : म्हणून मुंबई तुंबणारच, महापालिका आयुक्त चहल यांनी कारण सांगितलं!
Iqbal singh Chahal
Follow us
| Updated on: Jun 09, 2021 | 1:43 PM

मुंबई: मुंबईत 104 टक्के नालेसफाई झाल्याचा दावा महापालिकेने केलेला असतानाच पहिल्याच पावसात मुंबई तुंबली आहे. मुंबई का तुंबली? यावर महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी उत्तर दिलं आहे. मुंबईत आतापर्यंत 140 ते 160 मिमी पाऊस झाला आहे. तसेच अवघ्या तासाभरात 60 मिमी पाऊस झाला आहे. त्यामुळे मुंबई तुंबल्याचं इकबाल सिंह चहल यांनी स्पष्ट केलं आहे. आपल्याकडे ड्रेनेजची कॅरिंग कॅपॅसिटी कमी असल्यानं काही तासांसाठी मुंबईत पाणी तुंबणारच, असंही चहल यांनी म्हटलं आहे. (Heavy rains cause waterlogging in Mumbai says iqbal singh chahal)

मुंबईत पाणी तुंबल्यानंतर पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी रस्त्यावर उतरून परिस्थितीची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी मीडियाशी संवाद साधत ही माहिती दिली. साधारणपणे 24 तासात 165 मिमी पाऊस झाला तर अतिवृष्टी होते. परंतु, मुंबईत आतापर्यंत 140 ते 160 मिमी पाऊस झाला आहे. तसेच अवघ्या तासाभरात 60 मिमी पाऊस झाला आहे. एकट्या सायन-दादर परिसरात 155 मिमी पाऊस झाला आहे. त्यामुळे मुंबई तुंबली, असं इकबाल सिंह चहल यांनी सांगितलं.

फक्त तीन पॉइंटवरच वाहतूक कोंडी

मुंबईत दहिसर सबवे, सायन रेल्वे ट्रॅक आणि चुनाभट्टी ट्रॅक हे तीन पॉईंट वगळता मुंबईत कुठेही रोड आणि लोकल वाहतूक बाधित झाली नाही, असा दावा त्यांनी केला. तसेच मोगरा पंपिंग स्टेशन झाल्याशिवाय अंधेरी सबवेमध्ये पाणी तुंबण्याचा प्रश्न सुटणार नाही. पालिकेने टेंडर काढले आहे. त्यामुळे दोन वर्षात हे काम पूर्ण होईल. मात्र, पावसाळ्यात या सबवेमध्ये लोक अडकून पडू नये म्हणून हा सबवे संपूर्ण पावसाळा बंद ठेवण्यात आला आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

दहा वर्षात पहिल्यांदाच वाहतूक कोंडी नाही

हिंदमातामध्ये गेल्या दहा वर्षात पहिल्यांदाच वाहतूक कोंडी झाली नाही. हिंदमाता येथे आपण काम केल्याने अडीच फुटापर्यंत पाणी साचूनही वाहतूक कोंडी झाली नाही. साडेतीन फूट पाणी साचले तरी हिंदमातामध्ये वाहतूक कोंडी होणार नाही. केंद्र सरकारने दहा दिवसांपूर्वीच अंडरग्राऊंड पाईप टाकण्यासाठी पालिकेला परवानगी दिली आहे. त्यामुळे टाटा मिल्स आणि रेल्वेच्या खालून दीड किलोमीटरची पाईपलाईन टाकण्यात येणार आहे. त्यामुळे हिंदमाताचा पाणी तुंबण्याचा प्रश्न कायमचा निकाली निघेल. हा 140 कोटी रुपयांचा भूमिगत प्रकल्प आहे, असं त्यांनी सांगितलं. (Heavy rains cause waterlogging in Mumbai says iqbal singh chahal)

संबंधित बातम्या:

Mumbai Rains : मुंबईत पाणी तुंबणार नाही असा दावा केला नाही, करणारही नाही : महापौर किशोरी पेडणेकर

सत्ताधीशांचा वसुलीचा नादच खुळा, नेमेची येतो पावसाळा, पालिकेत 5 वर्षात 1 हजार कोटींचा घोटाळा; शेलारांचा आरोप

Mumbai Rains Live: पाणी साचणार नाही असा दावा केला नव्हता, काही नाले समुद्राच्या खाली असल्यानं पाणी साचणार: किशोरी पेडणेकर

(Heavy rains cause waterlogging in Mumbai says iqbal singh chahal)

'...तेवढा वेळ दहशतवाद्यांकडे होता?', वडेट्टीवारांचं वादग्रस्त वक्तव्य
'...तेवढा वेळ दहशतवाद्यांकडे होता?', वडेट्टीवारांचं वादग्रस्त वक्तव्य.
हल्ल्यात मृत झालेल्यांची काय चूक होती? - ओमर अब्दुल्ला
हल्ल्यात मृत झालेल्यांची काय चूक होती? - ओमर अब्दुल्ला.
'पहलगाम'वर बोलताना शाहिद आफ्रिदी बरळला तर ओवैसींकडून तगडं प्रत्युत्तर
'पहलगाम'वर बोलताना शाहिद आफ्रिदी बरळला तर ओवैसींकडून तगडं प्रत्युत्तर.
दहशतवाद्यांच्या घरावर 13 ठिकाणी छापेमारी
दहशतवाद्यांच्या घरावर 13 ठिकाणी छापेमारी.
पाकिस्तानी नेत्यांनी बकबक..,पाकच्या नेत्यांना असदुद्दीन ओवैसींनी झापलं
पाकिस्तानी नेत्यांनी बकबक..,पाकच्या नेत्यांना असदुद्दीन ओवैसींनी झापलं.
पाकिस्तानचं समर्थन करणाऱ्या तिघांना नालासोपारात अटक
पाकिस्तानचं समर्थन करणाऱ्या तिघांना नालासोपारात अटक.
पोकळ धमक्या देणाऱ्या भुट्टोच्या कुटुंबाने पाकिस्तानमधून ठोकली धूम...
पोकळ धमक्या देणाऱ्या भुट्टोच्या कुटुंबाने पाकिस्तानमधून ठोकली धूम....
कराड राजकारण्यांचा लाडका म्हणत अंजली दमानियांची मोठी मागणी काय?
कराड राजकारण्यांचा लाडका म्हणत अंजली दमानियांची मोठी मागणी काय?.
गुजरातमधल्या 50 पाकिस्तानी हिंदू कुटुंबांचा परत जाण्यास नकार
गुजरातमधल्या 50 पाकिस्तानी हिंदू कुटुंबांचा परत जाण्यास नकार.
पाकिस्तान सरकारला पाकिस्तानी नागरिकही वैतागले; गिलगीटमध्ये निदर्शने
पाकिस्तान सरकारला पाकिस्तानी नागरिकही वैतागले; गिलगीटमध्ये निदर्शने.