BIG News : तीन बड्या नेत्यांच्या गुप्त बैठकीमुळे राजकारणात खळबळ, मराठवाड्यात मोठा राजकीय भूकंप होणार?

मराठवाड्यातील तीन बड्या नेत्यांची आज बंद दाराआड गुप्त बैठक झाल्याची माहिती समोर येत आहे. या गुप्त बैठकीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे या नेत्यांना बैठक झाल्याचं मान्य करावं लागलं आहे. पण या भेटीत नेमकी काय राजकीय रणनीती शिजली? याबाबत राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा सुरु आहेत.

BIG News : तीन बड्या नेत्यांच्या गुप्त बैठकीमुळे राजकारणात खळबळ, मराठवाड्यात मोठा राजकीय भूकंप होणार?
Follow us
| Updated on: Jul 03, 2024 | 8:20 PM

मराठवाड्याच्या राजकारणात पडद्यामागे नेमकं काय घडतंय? असा प्रश्न आता उपस्थित होतोय. कारण मराठवाड्यातील तीन बड्या नेत्यांची आज बंद दाराआड गुप्त बैठक झाल्याची माहिती समोर येत आहे. या गुप्त बैठकीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे या नेत्यांना बैठक झाल्याचं मान्य करावं लागलं आहे. पण या भेटीत नेमकी काय राजकीय रणनीती शिजली? याबाबत राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा सुरु आहेत. हिंगोलीचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या उपस्थितीत शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर आणि हिंगोलीचे ठाकरे गटाचे नवनिर्वाचित खासदार नागेश पाटील यांच्यात बैठक पार पडली आहे. या बैठकीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यामुळे हिंगोली जिल्ह्यात विविध चर्चांना उधाण आलं आहे. ही बैठक मंत्री अब्दुल सत्तार यांच्या मुंबईतील निवासस्थानी झाल्याची माहिती समोर येत आहे.

या बैठकीचा फोटो समोर आल्यानंतर मंत्री अब्दुल सत्तार यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. “आपण माझं ऐका. मी हिंगोली जिल्ह्याचा पालकमंत्री आहे. ते हिंगोली जिल्ह्याचे खासदार आहेत. माझ्या बंगल्यावर आले, मला भेटायला आले. मंत्रालयात मला भेटायला आले. अशा पद्धतीत कुठेही राजकारण नाही. माझ्या माहितीप्रमाणे ते माझ्याकडे फक्त जिल्ह्याच्या कामासाठी आले होते. आमदार संतोष बांगर हे सुद्धा होते. मी दोघांची चर्चा केली. या चर्चेत कोणतंही राजकारण नाही”, असा खुलासा अब्दुल सत्तार यांनी केला.

अब्दुल सत्तार काय म्हणाले?

“मी बैठकीत आहे. मी नाही असं बोललोच नाही. मी बसलो. त्यांच्याशी चर्चा केली. जिल्ह्याच्या बाबतीत चर्चा झाली. राजकारणाच्या बाबतीत अशी ओपन चर्चा करता येत नाही”, असं सत्तार यांनी स्पष्ट केलं. शिवसेनेचा एक खासदार वाढवत आहात, अशी चर्चा आहे. याबाबत काय सांगाल? असा प्रश्न अब्दुल सत्तार यांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी “याचं उत्तर एकनाथ शिंदे यांच्याकडेच आहे, असं म्हटलं. एकनाथ शिंदे आमचे नेते आहेत. आपण त्यांना विचारुन घ्या. त्यांना जे जे सोबत आहेत त्यांना सोबत घेतात. आमच्या सारखा कार्यकर्ता त्यांच्यासोबत जोडण्याचं काम करतो”, अशी सूचक प्रतिक्रिया अब्दुल सत्तार यांनी दिली.

“मुख्यमंत्री आमदार, खासदार, माजी आमदार, खारदार यांच्या विकासाच्या मुद्द्यांवर कुठल्याही ठिकाणी कमी पडत नाही. मुख्यमंत्री विकासकामांसाठी योग्य निधी देत आहेत. एकनाथ शिंदे हे आमचे अंतिम सत्य आहेत. मी एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातूनच शिवसेनेत आलो”, असं अब्दुल सत्तार यावेळी म्हणाले.

नागेश पाटील आष्टीकर काय म्हणाले?

ठाकरे गटाचे खासदार नागेश पाटील आष्टीकरण यांनीदेखील या बैठकीवर प्रतिक्रिया दिली. “मी लोकप्रतिनिधी आहे. मला लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी पालकमंत्र्यांना भेटावं लागणारच आहे. मला न्याय मंदिरात यावच लागेल. कुणतरी या छोट्या गोष्टीची चर्चा सुरु केली आहे. कुणीतरी खोडासळपणे लपूनछपून फोटो काढलेला आहे. कुठल्यातरी एका कॉर्नरमधून फोटो काढण्यात आलेला आहे. मोदी आमच्या विरोधात आहेत तर मी त्या सभागृहात जायचंच नाही का?”, असा सवाल नागेश पाटील यांनी केला.

Non Stop LIVE Update
'त्या' प्रश्नावर पांड्यानं जे उत्तर दिलं अन् मोदींनाही हसू आवरलं नाही
'त्या' प्रश्नावर पांड्यानं जे उत्तर दिलं अन् मोदींनाही हसू आवरलं नाही.
बर झाल त्याच्या हातात कॅच बसला नाहीतर..सूर्याच्या कॅचवरून रोहितचा टोला
बर झाल त्याच्या हातात कॅच बसला नाहीतर..सूर्याच्या कॅचवरून रोहितचा टोला.
विधानभवनात वर्ल्डकप विजेत्या चॅम्पियन्सच मराठमोळ्या पद्धतीनं स्वागत
विधानभवनात वर्ल्डकप विजेत्या चॅम्पियन्सच मराठमोळ्या पद्धतीनं स्वागत.
VIDEO: डोळ्यांच पारण फेडणारा कोयनेतील ओझर्डे धबधबा तुम्ही पाहिलाय का?
VIDEO: डोळ्यांच पारण फेडणारा कोयनेतील ओझर्डे धबधबा तुम्ही पाहिलाय का?.
लाडकी बहीणला आणखी अटी लावा, 'यांना' लाभ देऊ नका, कुणाची आक्रमक मागणी?
लाडकी बहीणला आणखी अटी लावा, 'यांना' लाभ देऊ नका, कुणाची आक्रमक मागणी?.
सरकारी पैशातून मत खरेदी..., 'लाडकी बहीण'वरून वडेट्टीवारांची सडकून टीका
सरकारी पैशातून मत खरेदी..., 'लाडकी बहीण'वरून वडेट्टीवारांची सडकून टीका.
'लाडकी बहीण'चा बोजवारा..सर्व्हर बंद, महिलांची लांबलचक रांग अन् मनस्ताप
'लाडकी बहीण'चा बोजवारा..सर्व्हर बंद, महिलांची लांबलचक रांग अन् मनस्ताप.
बसवर टीका करणारे रोहितच्या मागे फोटोसाठी पोट धरून..भाजप नेत्याचा टोला
बसवर टीका करणारे रोहितच्या मागे फोटोसाठी पोट धरून..भाजप नेत्याचा टोला.
संदेह गमला, रेडा कैसा बोलविला..तुकोबांच्या पालखीत चालणारा रेडा पाहिला?
संदेह गमला, रेडा कैसा बोलविला..तुकोबांच्या पालखीत चालणारा रेडा पाहिला?.
वर्ल्डकप जिंकून मायदेशी रोहित शर्माला पाहून वर्ल्ड चॅम्पियनची आई भावूक
वर्ल्डकप जिंकून मायदेशी रोहित शर्माला पाहून वर्ल्ड चॅम्पियनची आई भावूक.