रतन टाटा यांच्या अखेरच्या दर्शनासाठी त्यांचा डॉग ‘गोवा’ देखील आला, व्हिडीओ व्हायरल
टाटा समुहाचे सर्वेसर्वा रतन नवल टाटा यांच्या वयाच्या 86 व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने संपूर्ण देश शोकसागरात बुडाला आहे. त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेण्यासाठी अनेक क्षेत्रातील मंडळींची रिघ लागली होती. परंतू या गर्दी मुके अबोल असलेले त्यांचे लाडके श्वान गोवा देखील आपल्या मालकाचे अखेरचे दर्शन घेण्यासाठी पोहचले होते.
आपल्या मालकाला श्रद्धांजली देण्यासाठी आलेला गोवा हा देखील मालकाची अवस्था पाहून दुखी झालेला दिसला. रतन टाटा एकदा गोव्याला गेले होते. त्यावेळी हा कूत्रा त्यांच्या मागे लागला. रतन टाटा त्याला सोबत घेऊन आले. गोव्याहून आणला म्हणून त्याचे नामकरण ‘गोवा’ असे त्यांनी केले. मुंबईच्या बॉम्बे हाऊस या कार्यालया बाहेर अन्य डॉग सोबत गोवाही राहतो. कुत्रे त्यांना खूपच आवडायचं. आता त्यांच्यावर प्रेम करणारे रतन टाटा गेले आहेत. त्यामुळे ते देखील दु:खी झाले असतील.
या डॉगची देखभाल करणाऱ्या केअर टेकरनी सांगितले की हा गोवा नामक डॉग त्यांच्याकडे 11 वर्षांपासून आहे. आम्ही पिकनिकसाठी गेलो होतो. तेव्हा सुरक्षा गार्डनी त्याला आणले. रतन टाटा त्याच्यावर खूप प्रेम करायचं.त्याला गोवा हे नाव त्यांनीच दिले.
येथे पाहा पोस्ट –
#WATCH | Visuals of Ratan Tata’s dog, Goa outside NCPA lawns, in Mumbai where the mortal remains of Ratan Tata were kept for the public to pay their last respects. pic.twitter.com/eVpxssjpLa
— ANI (@ANI) October 10, 2024
टाटांनी ब्रिटनचा दौरा रद्द केला
रतन टाटा यांना कुत्रे खूपच आवडायचे, ताजमहल हॉटेल असो किंवा टाटा समुहाचे मुख्यालय तेथे या श्वानांना खुला प्रवेश होता. एक किस्सा सांगितला जातो. एकदा आजारी डॉगची देखभाल करण्यासाठी ब्रिटनचे तत्कालिन प्रिन्स चार्ल्सशी रतन टाटा भेटू शकले नव्हते. ब्रिटनच्या बकिंघम पॅलेसमध्ये प्रिन्स चार्ल्स यांच्यावतीने एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. याच कार्यक्रमात रतन टाटा यांचा सन्मान करण्यासाठी बोलावले होते. परंतू कुत्रा आजारी पडल्याने त्यांनी ब्रिटनचा दौरा रद्द केला होता.