Holi Festival : “महापालिका निवडणुकीत आम्ही आमचे रंग दाखवू!”, एकनाथ शिंदेंचा होळीच्या दिवशी एल्गार

आगामी महापालिका निवडणुकीत आम्ही आमचे रंग दाखवून देऊ असं नगर विकासमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.

Holi Festival :  महापालिका निवडणुकीत आम्ही आमचे रंग दाखवू!, एकनाथ शिंदेंचा होळीच्या दिवशी एल्गार
नगर विकासमंत्री एकनाथ शिंदे , मुंबई महापालिका
Follow us
| Updated on: Mar 18, 2022 | 1:32 PM

मुंबई : आज धुलीवंदनाचा सण सगळीकडे उत्साहात साजरा होतोय. राज्यभर होळी आणि धुलिवंदनाचा उत्साह पाहायला मिळतोय. सगळीकडे रंगाची बरसात होतेय. होळीनिमित्त एकमेकांना शुभेच्छा दिल्या जात आहेत. अश्यात राजकीय मंडळीच्या घरीही होळीचा उत्साह पहायला मिळतोय. नगर विकासमंत्री एकनाथ शिंदे (Urban Development Minister Eknath shinde) यांच्या घरीही होळीचं खास सेलिब्रेशन करण्यात आलं. कोरोनानंतर पहिल्यांदाच सगळं शिंदे कुटुंब एकत्र होळीचा आनंद लुटताना दिसलं. एकनाथ शिंदे यांच्या पत्नी लता शिंदे, मुलगा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे (Shreekant Shinde) , नातू रुद्राश शिंदे आणि जवळची काही मंडळी उपस्थित होती. यावेळी बोलताना “आगामी महापालिका निवडणुकीत आम्ही आमचे रंग दाखवून देऊ”, असं एकनाथ शिंदे म्हणाले. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी हे विधान महत्वपूर्ण आहे.

एकनाथ शिंदे काय म्हणाले?

2 वर्षानंतर आपण होळी रंगपंचमी साजरी करत आहोत.धर्मवीर आनंद दिघे यांनी अनेक उपक्रम आणि सण साजरे करत आले तेच आम्ही पुढे नेत आहोत. “आगामी महापालिका निवडणुकीत आम्ही आमचे रंग दाखवून देऊ”, असंही एकनाथ शिंदे म्हणाले.

मंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी राज्यावरचं संकट दूर होऊ दे, सगळ्यांना सगळ्यांना चांगलं आरोग्य लाभू दे, अशी प्रार्थना केली. तसंच “केमिकल रंग शरीराला घातक आहेत म्हणून नैसर्गिक रंगचा पावर करून धुळवड साजरी करा.पर्यावरणपूरक होळी साजरी करा”, असं आवाहन शिंदे यानी केलं. कोरोनाचं संकट अजून गेलेलं नाही त्यामुळे सगळ्यांनी नियम पाळून सण साजरे करा, आरोग्याची काळजी घ्या असं आवाहन त्यांनी केलं.

श्रीकांत शिंदे काय म्हणाले

कोविड काळात दोन वर्षं आपण घरातच सगळे सण साजरे केले. आता 2 वर्षाच्या नंतर खऱ्या अर्थाने सण साजरे करत आहोत. त्याचा आनंद आहे. पण सगळ्यांनी काळजी घ्या, असं आवाहन श्रीकांत शिंदे यांनी यावेळी केलं.

किशोरी पेडणेकरांनी लुटला होळीचा आनंद

मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनीही होळीचा आनंद लुटला. मुंबईच्या नागरिकांसोबत रंग खेळत त्यांनी होळी साजरी केली.

Rane पिता-पुत्रांचा राजकीय इन्श्युरन्स संपलाय, विनायक राऊतांची खोचक टीका

MNS च्या नावानं फेरीवाल्याकडून वसुली,  खिशात शिवसेनेचं सभासद कार्ड; विरारमध्ये आरोप-प्रत्यारोप

Kolhapur bypoll | ‘आप’ची थेट कोल्हापुरात उडी, काँग्रेस आमदाराच्या जागेवरील पोटनिवडणूक लढणार

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.