Home delivery of fuel : इंधनाचीही होम डिलिव्हरी!, मोबाईल फ्युलपंप या अभिनव व्यवसायाची मुहूर्तमेढ, केंद्रीय मंत्री नारायण राणेंची उपस्थिती

Repos च्या संस्थापक आदिती भोसले म्हणाल्या, इंधन app वर ऑर्डर करता येईल, ही आमची संकल्पना आहे. जे पेट्रोलपंप वर जाऊ शकत नाही त्यांच्यासाठी ही सुविधा आहे.

Home delivery of fuel : इंधनाचीही होम डिलिव्हरी!, मोबाईल फ्युलपंप या अभिनव व्यवसायाची मुहूर्तमेढ, केंद्रीय मंत्री नारायण राणेंची उपस्थिती
केंद्रीय मंत्री नारायण राणेंची उपस्थिती
Follow us
| Updated on: Jul 15, 2022 | 10:08 PM

मुंबई : मोबाईल ॲपवर एका क्लीकवर हवी ती गोष्ट घरबसल्या मिळवणं हल्ली सहज शक्य आहे. याच धर्तीवर आता देशात पहिल्यांदाच इंधनाचीही होम डिलिव्हरी सुरू करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या उपस्थितीत ‘फ्युलिंग इंडिया 2022’च्या माध्यमातून डिझेल वितरित करणाऱ्या ‘मोबाईल फ्युलपंप’ (Mobile Flumpump) या अभिनव व्यवसायाची मुहूर्तमेढ करण्यात आली. इतकंच नव्हे तर रिपोस लवकरच सीएनजीसह इलेक्ट्रिक वाहनांसाठी मोबाईल चार्जिंग स्टेशन सेवाही डिलिव्हरीच्या माध्यमातून उपलब्ध करून देणार आहेत. अर्थातच ही ऑर्डर हजारो लिटरमध्ये असल्यानं मोठ्या ट्रान्सपोर्ट (Transport) कंपन्यांकरिता फायदेशीर असणार आहे. रिपोस (Repos) या कंपनीच्या माध्यमातून हा अभिनव व्यवसाय सुरू करण्यात आला आहे. यासाठी किमान 100 लीटरची ऑर्डर करणं आवश्यक असेल. त्यांच्या अत्याधुनिक मशीनच्या सहाय्यानं एरव्ही इंधनाची होणारी नासाडी टाळून व्यावसायिकांना आपल्या इंधनाचं वितरण अगदी सहजपणे नियोजित पद्धतीनं करण्यात येणार आहे.

देश आत्मनिर्भर होणारचं

यावेळी बोलताना केंद्रीय मंत्री नारायण राणे म्हणाले, आपल्याला भारताला आत्मनिर्भर बनवायचं आहे. आत्मनिर्भर देश बनवण्यासाठी अशी तरुणाई आपल्या देशात आहे, याचा मला गर्व आहे. मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री राहिलो आहे. भारताची अर्थव्यवस्थेमध्ये महाराष्ट्रचा वाटा मोठा असला पाहिजे. आपल्या देशाचे उद्योजक यांचा मी खूप आदर करतो. त्यांच्यामुळेच भारत स्पर्धेत आहे. नारायण राणे म्हणाले, माझे स्वतःचे 7 पेट्रोल पंप आहेत. आता यांनी जागोजागी जाऊन पेट्रोल दिले तर आम्ही काय करायचे. आपल्याला महासत्ता बनायचं आहे. आत्मनिर्भर बनायचं आहे यासाठी आपण बिझनेस आणले पाहिजेत. सतत काम सुरु असलं पाहिजे. रतन टाटा यांना भेटा. मग तुम्हाला खूप शिकायला मिळेल, असा सल्ला नारायण राणे यांनी दिला. राणे म्हणाले, नरेंद्र मोदी ज्या प्रकारे काम करत आहेत ते मी जवळून पाहतोय. 18-18 तास काम करतात ते. कोणीही इतकं काम करत नाही जेवढे मोदीजी करतात. म्हणून मला विश्वास आहे की, आपला देश आत्मनिर्भर होणारचं.

नेमकी संकल्पना काय?

Repos च्या संस्थापक आदिती भोसले म्हणाल्या, इंधन app वर ऑर्डर करता येईल, ही आमची संकल्पना आहे. जे पेट्रोलपंप वर जाऊ शकत नाही त्यांच्यासाठी ही सुविधा आहे. हे fuelling in फोनने कनेक्ट केलं आहे. एका फोनवर इंधन ऑर्डर करता येणं यामुळे शक्य आहे. याशिवाय इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन आणि डिस्ट्रिब्युशन सुध्दा लाँच होत आहे. Repos app वरूनच ही सुविधा उपलब्ध होणार आहे. कचऱ्यापासून वीजनिर्मिती आणि त्याचा वापर ev चार्जिंगसाठी होणार आहे.

Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.