मोहन डेलकर यांच्या आत्महत्येची चौकशी एसआयटीद्वारे करणार, गृहमंत्र्यांची घोषणा
फडणवीसांचा हा हल्ला परतवून लावण्यासाठी सत्ताधारी महाविकास आघाडीतील नेत्यांनी भाजपचे नेते मोहन डेलकर यांच्या आत्महत्येचा मुद्दा उपस्थित केला आणि भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला.
मुंबई : विधानसभेत अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान मनसुख हिरेन आत्महत्या प्रकरणावरुन जोरदार खडाजंगी झाली. विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. फडणवीसांचा हा हल्ला परतवून लावण्यासाठी सत्ताधारी महाविकास आघाडीतील नेत्यांनी भाजपचे नेते मोहन डेलकर यांच्या आत्महत्येचा मुद्दा उपस्थित केला आणि भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. इतकच नाही तर डेलकर आत्महत्या प्रकरणाची चौकशी एसआयटीमार्फत करण्याची घोषणाही गृहमंत्री देशमुखांनी यावेळी केली. (Anil Deshmukh announces to hand over SIT probe into Dadra-Nagar Haveli MP Mohan Delkar’s suicide)
देवेंद्र फडणवीस यांच्या हल्ल्याला उत्तर देताना गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मोहन डेलकर यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी वाचून दाखवली. दादरा-नगर हवेलीचे प्रशासक प्रफुल्ल खेडा पटेल आणि काही अधिकाऱ्यांच्या दबावाखाली मला वारंवार त्रास दिला जात होता. अडचणी निर्माण केल्या जात होत्या. माझं सामाजिक जीवन उद्ध्वस्त करण्याच्या धमक्या दिल्या जात होत्या, असा उल्लेख डेलकर यांच्या आत्महतेपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत असल्याचं देशमुख यांनी सांगितलं.
‘महाराष्ट्र सरकारवर विश्वास म्हणून महाराष्ट्रात आत्महत्या!’
दादरा-नगर हवेलीचे प्रशासक प्रफुल्ल खेडा पटेल हे पूर्वी गुजरातमध्ये भाजप सरकारच्या काळात गृहमंत्री होते. कदाचित त्यावेळी नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते. त्यांनी लिहिलेल्या चिठ्ठीत आपण मुंबईत आत्महत्या करतोय, कारण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, माजी मंत्री प्रफुल्ल पटेल आणि महाराष्ट्र सरकारवर माझा विश्वास आहे. त्यामुळे मी महाराष्ट्रात आत्महत्या करत असल्याचा सुसाईड नोटमध्ये उल्लेख असल्याचंही गृहमंत्री देशमुखांनी सांगितलं. त्याचबरोबर मोहन डेलकर यांच्या पत्नी आणि मुलानेही आपल्याला पत्र लिहिलं. त्या पत्रातही प्रफुल्ल खेडा पटेल यांच्यावर आरोप करण्यात आल्याचं देशमुख यांनी सांगितलं.
नागपुरातील IAS अधिकाऱ्याच्या आत्महत्येचाही उल्लेख
मोहन डेलकर यांना त्रास गुजरातमध्ये आणि ते महाराष्ट्रात आत्महत्या करतात, म्हणजे त्यांचा महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातील प्रशासनावर विश्वास असल्याचा दावा गृहमंत्र्यांनी केलाय. इतकच नाही तर नागपूरमध्ये मध्यप्रदेशातील IAS अधिकारी राजेश कुमार श्रीवास्तव यांच्याही आत्महत्येचा उल्लेख केला. त्यांनीही आपल्याला महाराष्ट्रात न्याय मिळेल म्हणून आत्महत्या केली असावी, असंही गृहमंत्र्यांनी म्हटलंय.
मोहन डेलकरांच्या मृतदेहाजवळ सापडलेल्या 15 पानी सुसाईड नोटमध्ये नेमकं काय?
दादरा आणि नगर हवेली येथील खासदार मोहन डेलकर यांनी काल मुंबईत आत्महत्या केली. मरीन लाईन्स चौपाटी येथील सी ग्रीन हॉटेलमधील रूममध्ये त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. यावेळी त्यांच्या मृतदेहाजवळ सुसाईड नोट सापडली आहे. ही नोट सुमारे 15 पानांची आहे. यात त्यांनी आपल्या आत्महत्येबाबत सविस्तर माहिती दिली आहे. या अनुषंगाने आता पोलिसांचा तपास सुरू झालाय. या तपासासाठी पोलीसांनी एका विशेष पथकाची स्थापना केलीय. पोलीस सर्व अंगाने या घटनेचा तपास करीत आहेत.
संबंधित बातम्या :
Mansukh Hiren death : भर सभागृहात चिरफाड, देवेंद्र फडणवीसांचा शब्द आणि शब्द, जसाच्या तसा!
Anil Deshmukh announces to hand over SIT probe into Dadra-Nagar Haveli MP Mohan Delkar’s suicide