वादळ थोपवणारा माणूस! तीन दिवस तयारी, ओदिशाची मदत, BMC आयुक्तांचं भन्नाट प्लॅनिंग !

मुंबई प्रशासनाने निसर्ग चक्रीवादळाच्या संकटाचा सामना करण्यासाठीही जय्यत तयारी केली होती.

वादळ थोपवणारा माणूस! तीन दिवस तयारी, ओदिशाची मदत, BMC आयुक्तांचं भन्नाट प्लॅनिंग !
Follow us
| Updated on: Jun 04, 2020 | 4:25 PM

मुंबई : शतकात पहिल्यांदा असलेला चक्रीवादळाचा धोका मुंबईने परतवून लावला. कोकण किनारपट्टीवर हैदोस घालून निसर्ग चक्रीवादळ आता शांत झालं आहे. या चक्रीवादळाचा परिणाम मुंबईतही जाणवला. अनेक पडझडीच्या घटना घडल्या. सुदैवाने हे वादळ मुंबईपर्यंत न पोहोचल्याने, किरकोळ नुकसान वगळता, मोठा अनर्थ टळला. मुंबईत शेकडो झाडं पडली, अनेक घरांची छपरं उडाली. वादळ न येऊनही इतकं नुकसान झालं असेल, तर वादळ आलं असतं तर किती नुकसान झालं असतं, याची कल्पनाच न केलेली बरी. (How BMC commissioner Iqbal Chahal prepared for cyclone)

एकीकडे कोरोनाचं संकट आणि दुसरीकडे हे चक्रीवादळाचं सावट अशा दुहेरी संकटात मुंबई होती. मात्र मुंबई प्रशासनाने या संकटाचा सामना करण्यासाठीही जय्यत तयारी केली होती. ग्राऊंडवर उतरुन महापौर किशोरी पेडणेकर स्वत: जातीने परिस्थितीची पाहणी करत होत्या. तर दुसरीकडे या संकटाचा सामना करण्यासाठी तीन दिवस रात्रं-दिवस अॅक्शन प्लॅन तयार करणारे मुंबईचे महापालिका आयुक्त इक्बाल चहल सज्ज होते.

इक्बाल चहल यांनी निसर्ग चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी काय तयारी केली होती, याची माहिती त्यांनी एका इंग्रजी वृत्तवाहिनीला दिली. चक्रीवादळ मुंबईला धडकण्यापूर्वी आणि धडकल्यानंतर काय उपाययोजना असाव्या, याचं भन्नाट नियोजन इक्बाल चहल आणि त्यांच्या टीमने केलं.

वादळं झेलणाऱ्या ओदिशाची मदत

इक्बाल चहल म्हणाले, “मुंबईला वादळाचा धोका आहे याची माहिती हवामान विभागाने दिल्यानंतर, तात्काळ आम्ही तयारीला सुरुवात केली. मुंबईत गेल्या शेकडो वर्षात चक्रीवादळ धडकलं नव्हतं. मुंबईकडे महापूर, आग, भूकंप, इमारत दुर्घटना, अपघात यासारख्या संकटांचा सामना करण्यासाठी अॅक्शन प्लॅन तयार आहेत. मात्र चक्रीवादळ कधी न आल्याने त्याबाबत अॅक्शन प्लॅन असूनही, हे संकट हाताळण्याचा तितकासा अनुभव नव्हता. त्यासाठी आम्ही ओदिशाची मदत घेतली.

ओदिशातील अधिकारी दरवर्षीच चक्रीवादळाचा सामना करतात. त्यामुळे चक्रीवादळ येण्यापूर्वी, आल्यानंतर आणि वादळ गेल्यावर काय काय खबरदारी, उपाययोजना करता येईल, याबाबतची माहिती घेऊन, सतत त्या अधिकाऱ्यांची आम्ही संपर्कात होतो”.

रात्रं-दिवस काम

इक्बाल चहल यांनी याशिवाय सर्व टीमच्या कठोर परिश्रम आणि मेहनतीचंही कौतुक केलं. संपूर्ण टीम रविवारपासून दिवस रात्र चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी तयारी करत होती. तब्बल 48 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं. 18 हजार विविध इमारतींमध्ये या लोकांना ठेवलं. लाऊडस्पीकरवरुन माहिती दिली, लोकांना मार्गदर्शन करुन स्थलांतरासाठी आवाहन केलं. जिथे पाणी साचतं, लॅण्डस्लाईड किंवा दरड कोसळते, जमीन खचते, पाणी साचतं, धोकादायक झोपडपट्या अशा ठिकाणच्या लोकांना तातडीने सुरक्षित स्थळी हलवलं, असं चहल यांनी सांगितलं.

196 झाडे पडली, तात्काळ हटवली

मुंबई आणि परिसरात काल दिवसभरात 196 झाडपडीच्या घटना घडल्या. मात्र आम्ही अशा टीम तैनात केल्या होत्या की, कोणताही कॉल आला की तात्काळ घटनास्थळी पोहोचून, काम सुरु करायचं. त्यामुळे मुंबईत अनेक झाडं पडूनही, ती तात्काळ हटवण्यात आली. दिवसभरात झाडं पडली पण ती संध्याकाळी पाच वाजेपर्यंत हटवण्यात आली, असं इक्बाल चहल यांनी सांगितलं.

याशिवाय मुंबईत काही ठिकाणी आग लागल्याच्या घटना घडल्या, पण आमचं अग्निशमन दल तात्काळ पोहोचलं आणि तात्काळ नियंत्रण मिळवलं. त्यामुळे झिरो लॉस ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्यास आम्हाला यश आलं, असं चहल म्हणाले.

बीकेसी कोव्हिड सेंटर

मुंबईतील कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर बीकेसी इथे एक हजार खाटांचं कोव्हिड केअर सेंटर उभारण्यात आलं आहे. मात्र वादळाच्या पार्श्वभूमीवर त्या रुग्णालयालाही धोका होता. त्यामुळे खबरदारी म्हणून तिथे उपचार घेत असलेल्या 212 रुग्णांना इतरत्र रुग्णालयात हलवण्यात आलं. वादळी वाऱ्याने एकालाही इजा होऊ नये याची काळजी घेतली. वादळाने कोव्हिड सेंटरला किरकोळ नुकसान झालं. मात्र हे सेंटर आजपासून सुरु करण्यात येणार असल्याचं चहल म्हणाले.

वीजकपात नाही मुंबईत सोसाट्याचा वारा वाहत होता. खबरदारीसाठी मुंबई उपनगरं, नवी मुंबईत अनेक ठिकाणी वीज गायब झाली. पण मुंबई शहरातील वीज एक मिनिटभरही गेली नाही, असा दावा इक्बाल चहल यांनी केला. दक्षिण मुंबईतील नागरिकांनाही तसाच अनुभव आल्याचं नागरिक सांगतात.

निसर्ग चक्रीवादळ येऊन गेलं मात्र त्यासाठी जी प्रशासकीय सज्जता हवी होती, त्याचं काटेकोर नियोजन मुंबई महापालिका प्रशासनाने आणि विशेषत: आयुक्त इक्बाल चहल यांनी केल्याचं या सर्व परिस्थितीवरुन दिसून येतं.

(How BMC commissioner Iqbal Chahal prepared for cyclone)

संबंधित बातम्या 

धारावी कोळून प्यायलेला अधिकारी मुंबई महापालिका आयुक्तपदी, कोण आहेत इक्बाल चहल?

धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट.
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा.
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?.
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'.