Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईकरांनो, लोकलने प्रवास करायचाय?, मग हे 10 नियम वाचा आणि असा मिळवा पास…!

मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये एकूण 53 उपनगरीय रेल्वे स्थानकांवर ऑफलाईन पडताळणी प्रक्रिया सुरु करण्यात येणार आहे. यामध्ये मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावरील स्थानकांचा समावेश आहे.

मुंबईकरांनो, लोकलने प्रवास करायचाय?, मग हे 10 नियम वाचा आणि असा मिळवा पास...!
मुंबई लोकल
Follow us
| Updated on: Aug 11, 2021 | 6:45 AM

मुंबई : मुंबई लोकल (Mumbai Local) सर्वसामान्यांना नियम आणि अटी घालून 15 ऑगस्टपासून सुरु होणार आहे. तत्पूर्वी आजपासून म्हणजेच 11 ऑगस्टपासून रेल्वे स्टेशनवर क्यूआर कोड सुविधा उपलब्ध होणार आहे. आज सकाळी रेल्वे स्थानकांवर कोव्हिड लसीकरण ऑफलाईन पडताळणी करुन मासिक पास देण्याची प्रक्रिया सुरु होणार आहे. ही सगळी प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर प्रवाशांना 15 ऑगस्टपासून लोकलने प्रवास करता येईल.

दोन्ही डोस घेतलेल्यांनाच लोकल प्रवासाची परवानगी

लसीचे दोन डोस घेतले आहेत, आणि दुसरा डोस घेऊन 14 दिवस किंवा त्यापेक्षा अधिक दिवस झाले आहेत, अशा प्रवाशांनाच लोकलने प्रवास करता येईल, किंवा लोकलचा पास वगैरे मिळवता येईल. कोरोना प्रतिबंधत्मक लसीचा एकही डोस न घेतलेल्या किंवा एक डोस घेतलेल्या नागरिकांना रेल्वे प्रवासाची परवानगी देण्यात आलेली नाही.

रेल्वे प्रवासासाठी पास कसा मिळवायचा?

ज्यांच्याकडे स्मार्टफोन आहेत असे प्रवासी मोबाईल अॅपच्या माध्यमातून रेल्वेचा पास डाऊनलोड करू शकतील. ज्यांच्याकडे स्मार्टफोन नाही, असे प्रवासी शहरातील पालिकेची प्रभाग कार्यालये तसेच उपनगरीय रेल्वे स्थानकांवरून फोटो पासेस घेऊ शकतील… सर्वात महत्वाचं म्हणजे, लोकल प्रवासाच्या या पासेसवर क्यू आर कोड असतील जेणेकरून रेल्वे प्रशासनाला त्याची सत्यता पडताळता येईल.

लोकलचा प्रवासी पास कसा मिळवायचा, वाचा हे 10 नियम…

1. मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये एकूण 53 उपनगरीय रेल्वे स्थानकांवर ऑफलाईन पडताळणी प्रक्रिया सुरु करण्यात येणार आहे. यामध्ये मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावरील स्थानकांचा समावेश आहे. या सर्व स्थानकांवर मिळून तिकीट खिडकी नजीक 358 मदत कक्ष असतील.

2. मुंबई महानगरासह आजुबाजूची सर्व शहरे मिळून म्हणजे संपूर्ण मुंबई महानगर प्रदेशात एकूण 109 लोकल रेल्वे स्थानकांवर ही ऑफलाईन पडताळणी सुविधा उपलब्ध असेल.

3. ज्या नागरिकांनी कोविड प्रतिबंधक लसीची दुसरी मात्रा घेतल्यानंतर 14 दिवस पूर्ण झाले आहेत, अशा नागरिकांनी दुसरा डोस घेतल्याच्या वैध प्रमाणपत्राची प्रत , त्यासोबत ओळखपत्र पुरावा असे दोन्ही दस्तावेज सोबत घेवून घरानजीकच्या रेल्वे स्थानकावर जावे. हे दोन्ही किंवा यातील एक कागदपत्रं जरी नसेल, तरी रेल्वे स्थानकावर, रेल्वे प्रशासनाकडून प्रवेश नाकारण्यात येईल, याची कृपया नागरिकांनी नोंद घ्यावी.

4. रेल्वे स्थानकावरील तिकिट खिडकीजवळ आल्यानंतर, तेथे बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे स्थापन केलेले मदत कक्ष असतील. हे मदत कक्ष सकाळी 7 ते दुपारी 3 आणि दुपारी 3 ते रात्री 11 अशा सलग दोन सत्रांमध्ये सुरु राहतील.

5. मदत कक्षावरील बृहन्मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी (किंवा संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेचे कर्मचारी) हे संबंधित नागरिकाच्या कोविड लसीकरण अंतिम प्रमाणपत्राची (फायनल व्हॅक्सिनेशन सर्टिफिकेट – दुसरा डोस) वैधता कोविन ऍपवर तपासतील. तसेच छायाचित्र ओळखपत्र पुरावादेखील तपासतील. पडताळणीमध्ये दोन्ही कागदपत्रं वैध असल्याचे निश्चित झाल्यानंतर, कोविड प्रमाणपत्रासह छायाचित्र ओळख पुराव्याच्या प्रतीवर देखील विहित नमुन्यातील शिक्का मारण्यात येईल.

6. सदर शिक्का मारलेले कोविड अंतिम प्रमाणपत्र रेल्वे स्थानकावरील तिकिट खिडकीवर सादर करावे. त्यानुसार रेल्वे प्रशासनाकडून मासिक रेल्वे प्रवास पास देण्यात येईल. मात्र, सदर पास आधारीत प्रवासाची सुविधा ही दिनांक 15 ऑगस्ट 2021 पासूनच वैध असेल. त्यापूर्वी नाही.

7. कोविड लशीचा एकही डोस न घेतलेल्या किंवा फक्त एकच डोस घेतला असल्याच, अशा नागरिकांना सद्यस्थितीत उपनगरीय रेल्वे प्रवासाची मुभा नसेल.

8. मुंबई महानगर तसेच मुंबई प्रदेशातील लोकसंख्या लक्षात घेवून उपनगरीय रेल्वे स्थानकांवर जेवढ्या तिकिट खिडक्या असतील, तेवढ्याच संख्येने मदत कक्ष देखील असतील. तसेच सकाळी 7 ते रात्री 11 अशी तब्बल 16 तास पडताळणी सुविधा सुरु राहणार आहे. त्यामुळे पात्र नागरिकांनी घरानजीकच्या रेल्वे स्थानकांवर जावे. मात्र विनाकारण गर्दी करु नये, असे विनम्र आवाहन करण्यात येत आहे.

9. जर कोणीही बनावट कोविड लसीकरण प्रमाणपत्र आणण्याचा प्रयत्न केला, तर अशा व्यक्तिंविरुद्ध साथरोग नियंत्रण कायदा / आपत्कालीन व्यवस्थापन कायदा / भारतीय दंडविधान संहिता यानुसार कठोर पोलीस कार्यवाही करण्यात येईल, याची सक्त नोंद घ्यावी, असेही प्रशासनाकडून कळविण्यात येत आहे.

10. अत्यावश्यक सेवेतील शासकीय / निमशासकीय आणि इतर कर्मचारी यांना सध्याच्या प्रचलित पद्धतीनुसारच, म्हणजेच कोविड लसीकरणाचे दोन्ही डोस पूर्ण झालेले असोत वा नसोत, त्यांना रेल्वे प्रवासाची मुभा सुरु राहील. त्यामुळे त्यांनी नियमित पद्धतीने उपनगरीय रेल्वे प्रवास करावा, असे कळविण्यात येत आहे.

(how to get monthly pass for local train in mumbai know this)

हे ही वाचा :

मुंबई लोकलच्या प्रवासासाठी पास कसा मिळणार? वाचा मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेले संपूर्ण डिटेल्स एका क्लिकवर

प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार.
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.