सुट्टीवर आलेल्या नवऱ्याबरोबर उडाले खटके…; वाद गेला वाढत अन् नको ते घडलं…

पत्नीला ठार मारल्यानंतर कतारहून आलेला पती स्वतः बेलापूर पोलीस ठाण्यात हजर झाला. त्यानंतर त्याने पोलिसांना सांगितले की, माझ्या पत्नीला मी ठार मारले आहे. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन या घटनेचा तपास चालू केला.

सुट्टीवर आलेल्या नवऱ्याबरोबर उडाले खटके...; वाद गेला वाढत अन् नको ते घडलं...
Follow us
| Updated on: Apr 03, 2023 | 11:04 PM

बेलापूर : परदेशातून आलेल्या पतीला पत्नीकडून अपमानास्पद वागणूक मिळत होती म्हणून सातत्याने त्या दोघांमध्ये प्रचंड वाद होत होते. आताही कतारवरून आलेल्या पतीबरोबर पत्नीचे वारंवार खटके उडत होते. आजही पती पत्नीमध्य वाद झाला, तो वाद इतका टोकाला गेला की, पतीने अगोदर आपल्या पत्नीचा गळा आवळून तिचा खून करण्यात आला. त्यानंतरही त्या पतीने पत्नीच्या पोटात चाकू भोसकण्यात आला. या घटनेनंतर पती थेट बेलापूर पोलिसात हजर होत त्यांनी आपण पत्नीचा खून केल्याचे सांगितल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन तपास सुरु केला आहे.

पत्नीचा खून करणाऱ्या संशयिताचे जसपालसिंग मसुता असे नाव आहे. तो काही वर्षांपासून नोकरीसाठी कतारमध्ये राहत होता.

कतारवरून पती घरी आल्यानंतर पत्नीबरोबर त्याचे वारंवार वाद होत होते. मागील महिन्यातच हा संशयित आरोपी सुट्टीवर आला होता.

त्यानंतर या दोघांमध्ये पुन्हा वाद निर्माण झाला. वाद विकोपाला जात असल्याने पतीन पत्नीला अनेक वेळा समजवण्याचा प्रयत्न केला होता, मात्र पत्नीच्या स्वभावात सुधारणा कधी झालीच नाही असंही या संशयित आरोपीने पोलिसांना सांगितले.

रविवारी रात्री ही दोघं पती पत्नी मुलीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी गेले होते. वाढदिवस करून घरी परतल्यानंतर त्या दोघांमध्ये जोरदार भांडण झाले.

त्यांचा हा वाद त्यांच्या पाच वर्षाच्या मुलीसमोरच सुरू होता. पती पत्नीचा वाद इतकी टोकाला गेली की पतीने रागाच्या भरात पत्नीचा गळा दाबला होता. त्यानंतर पत्नीचा मृत्यू होत नसल्याचे त्याच्या लक्षात येताच त्याने पत्नीच्या पोटावर सपासप वार केले.

पत्नीला ठार मारल्यानंतर कतारहून आलेला पती स्वतः बेलापूर पोलीस ठाण्यात हजर झाला. त्यानंतर त्याने पोलिसांना सांगितले की, माझ्या पत्नीला मी ठार मारले आहे. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन या घटनेचा तपास चालू केला.

'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.