तिसऱ्या लाटेचं सोडा, पण गर्दी कराल तर दुसरीच लाट पुन्हा उलटेल: उद्धव ठाकरे

CM Uddhav Thackeray | पुढच्यास ठेच , मागचा शहाणा या म्हणीप्रमाणे आपण जगभर कोरोनाची लाट परत उसळत आहे ते पाहून सावध राहावे लागेल, असे उद्धव यांनी म्हटले.

तिसऱ्या लाटेचं सोडा, पण गर्दी कराल तर दुसरीच लाट पुन्हा उलटेल: उद्धव ठाकरे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
Follow us
| Updated on: Jun 29, 2021 | 7:53 AM

मुंबई: आरोग्य यंत्रणा आणि ऑक्सिजन बेडसचा तुटवडा असतानाही महाराष्ट्राने कोरोनाची दुसरी लाट थोपवली. आता कोरोना रुग्णांचा (Coronavirus) आलेख खाली आला आहे. त्यामुळे पुन्हा गर्दी होऊ लागली आहे. परंतु, कोरोनाची दुसरी लाट पूर्णणे ओसरलेली नाही. तिसरी लाट कधी येईल सांगता येत नाही. पण अशीच गर्दी होत राहिली तर दुसरीच लाट पुन्हा उलटेल, असा गंभीर इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला. (CM Uddhav Thackeray warns about Coroanavirus threat in Maharashtra)

ते सोमवारी मालाडमधील कोविड रुग्णालयाच्या ऑनलाईन लोकार्पण सोहळ्यात बोलत होते. यावेळी उद्धव ठाकरे यांनी नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला. कोरोनाची दुसरी लाट ओसरली नसून सध्या जरी बेडस रिकामे दिसत असले तरी दुसरी लाट परत उलटू नये म्हणून आपल्याला गर्दी टाळणे, मास्क घालणे हे नियम कटाक्षाने पाळावे लागतील. पुढच्यास ठेच , मागचा शहाणा या म्हणीप्रमाणे आपण जगभर कोरोनाची लाट परत उसळत आहे ते पाहून सावध राहावे लागेल, असे उद्धव यांनी म्हटले.

सह्याद्री अतिथीगृहावर झालेल्या या कार्यक्रमावेळी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, अल्पसंख्यांक विकास मंत्री नवाब मलिक, परिवहन मंत्री अनिल परब, मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख, मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे, महापौर किशोरी पेडणेकर, मुंबई महानगरपालिका आयुक्त इकबालसिंह चहल, महानगर आयुक्त एस के श्रीनिवासन उपस्थित होते.

‘दररोज 15 लाख लसीकरणाची तयारी’

पहिल्या लाटेच्या वेळेस आपण बीकेसी येथे देशातले पहिले फिल्ड रुग्णालय विक्रमी वेळेत उभारले. आपण आरोग्य सुविधांच्या उभारणीत आणि नागरिकांच्या आरोग्याचे हित जोपासताना कोणतीही उणीव भासू देणार नाही. लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी आपल्याकडे दररोज 15 लाख नागरिकांच्या लसीकरणाची क्षमता असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

संबंधित बातम्या: 

मुंबईकरांना दिलासा, आता कस्तुरबा रुग्णालयात ‘डेल्टा प्लस’ चाचणी होणार, अवघ्या दोन दिवसात मिळणार रिपोर्ट

मुंबईकरांसाठी गूड न्यूज, 50 टक्के लहान मुलांमध्ये आढळल्या अँटीबॉडीज

ऑक्सिजन निर्मिती संयंत्र उभारणी प्रकल्पात कोणताही घोटाळा नाही; मुंबई महापालिकेचे स्पष्टीकरण

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.