‘त्या’ दोन हजार कोटींच्या डीलची आधीच माहिती होती; संजय राऊत यांचा गौप्यस्फोट

भाजपने सर्वच्या सर्व जागा जिंकण्याचा निर्धार केला आहे. त्यावरही संजय राऊत यांनी टीका केली. पुन्हा सत्तेत येऊन दाखवावे. आमच्या त्यांना शुभेच्छा..., असा सूचक इशाराच राऊत यांनी दिला.

'त्या' दोन हजार कोटींच्या डीलची आधीच माहिती होती; संजय राऊत यांचा गौप्यस्फोट
sanjay rautImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Feb 20, 2023 | 10:53 AM

मुंबई : ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजप, शिंदे गट आणि निवडणूक आयोगावर जोरदार टीका केली आहे. पक्षाचे नाव आणि चिन्ह विकत घेण्यासाठी दोन हजार कोटींचा सौा झाल्याचा पुनरुच्चार संजय राऊत यांनी केला आहे. तसेच आमची लढाई ही मिंधे गटासोबत नाही. आमची लढाई ही देशाला हुकूमशाहीकडे नेणाऱ्या भाजपविरोधात आहे. मिंधे गटाची आमच्याविरोधात लढण्याची पात्रता नाही, असं संजय राऊत यांनी ठणकावलं आहे. तसेच न्याय विकत घेण्यासाठी दोन हजार कोटींचा सौदा झाल्याची आपल्याला आधीच माहिती होती, असा दावाही राऊत यांनी केला.

या सत्ताधारी पक्षाच्या गुलाम झाल्या आहेत. बनवलं असलं तरी आम्ही लोकांना दाखवत आहोत. देशाला दाखवत आहोत. सत्य आणि न्यायाची बाजू कशी डावलली जात आहे. मी काल स्पष्ट सांगितलं. चिन्ह आणि पक्षाचं नाव यासाठी दोन हजार कोटींचा सौदा झाला. व्यवहार झाला. कालही सागितलं, आजही सांगितलं, असं संजय राऊत यांनी सांगितलं.

हे सुद्धा वाचा

प्रचंड पैशाचा वापर

निकाल लागण्याची प्रक्रिया सुरू होती. तेव्हा देवेंद्र फडणवीस स्वत: सांगत होते निकाल आपल्याच बाजूने लागेल. मिंधे गटाचे नेते म्हणत होते निकाल आमच्याच बाजूने लागेल. एक केंद्रीय मंत्री सांगत होते, आम्हीच. निकाल फिरवण्यासाठी दोन हजार कोटींचा सौदा झाला याची मला तेव्हाच माहिती होती. न्याय आणि निर्णय यात फरक आहे. प्रचंड पैशाचा वापर करून निर्णय विकत घेतला आहे, असा आरोप त्यांनी केला.

पुरावे देईन

लवकरच पुरावे देईन. कोण विरोधक. आम्ही भाजपचे विरोधक आहोत. आमची लढाई मिंधे गटाशी नसून देश हुकूमशाहीकडे नेणाऱ्या भाजपशी आहे. मिंधे गट गुलाम आहे. त्यांची लढण्याची पात्रता नाही. पैसा मिंध्यांचा आणि यंत्रणा त्यांची त्यामुळे न्याया विकत घेतला आहे, अशी टीका त्यांनी केली.

सत्तेत येऊन दाखवा

भाजपने सर्वच्या सर्व जागा जिंकण्याचा निर्धार केला आहे. त्यावरही संजय राऊत यांनी टीका केली. पुन्हा सत्तेत येऊन दाखवावे. आमच्या त्यांना शुभेच्छा…, असा सूचक इशाराच राऊत यांनी दिला.

शिवसेना अंगार आहे

शिवसेना महाराष्ट्राचा स्वाभिमान आहे. शिवसेना तोडून तुम्ही ज्या प्रकारे विकट हास्य करत आहात. एकेकाळी आम्ही काँग्रेसविरोधात लढलो होतो. आज कोणी काँग्रेसवाला बनत असेल मुखवटा घालून तर आम्ही लढणार. शिवसेना संपणार नाही. ही आग आहे. ती विझणार नाही. हा अंगार आहे, असा इशारा त्यांनी दिला.

व्यापाऱ्यांना मुंबई खरेदी करायचीय

अमित शाह हे मराठी माणसांचे शत्रू आहेत ही महाराष्ट्राच्या जनतेची भावना आहे. 2014 सालच्या निवडणुकीत उद्धव ठाकरे यांनी याच भावना व्यक्त केली होती. भाजपला मुंबई विकत घ्यायची आहे. शिवसेना सर्वात मोठा अडथळा आहे. काही व्यापाऱ्यांना मुंबई खरेदी करायची आहे. आम्ही होऊ देणार नाही. त्यामुळे सर्व हातखंडे वापरले जात आहेत, असंही त्यांनी सांगितलं.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.