AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘…ब्रह्मदेव खाली आला तरी मी मंत्रिपद घेणार नाही’, बच्चू कडू यांचं सर्वात मोठं वक्तव्य

बच्चू कडू यांनी मंत्रिपदाबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. तसेच त्यांनी पेपर फुटीच्या प्रकरणावरही अतिशय महत्त्वाची मागणी केली आहे. पेपर फुटी करणाऱ्यांना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

'...ब्रह्मदेव खाली आला तरी मी मंत्रिपद घेणार नाही', बच्चू कडू यांचं सर्वात मोठं वक्तव्य
Follow us
| Updated on: Aug 30, 2023 | 2:37 PM

मुंबई | 30 ऑगस्ट 2023 : राज्यभरात सध्या तलाठी भरतीच्या परीक्षा पार पडत आहेत. सप्टेंबर महिन्याच्या उत्तरार्धात या सर्व परीक्षा संपतील. पण तलाठी भरतीच्या या परीक्षांमध्ये पेपर फुटीसारखे प्रकार उघडकीस आले. त्यामुळे विद्यार्थी चांगलेच आक्रमक झालेले बघायला मिळाले. राज्यभरात या प्रकरणाचा मुद्दा गाजताना दिसतोय. असं असताना आमदार बच्चू कडू यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. त्यांनी पेपर फुटीच्या घटनांवर संताप व्यक्त केला आहेत. तसेच पेपर फुटी करणाऱ्यांना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. दरम्यान, बच्चू कडू यांनी मंत्रिपदाबाबत महत्त्वाचं वक्तव्य केलं.

“स्पर्धा परीक्षेबाबत पेपर फुटीचा कायदा झाला पाहिजे. शेतीला भाव नाही. शेतकऱ्याच्या मुलाला वावही नसेल, त्यात पेपर फुटी होत असेल तर कडक कायदा करण्याची आवश्यकता आहे. या प्रकरणात सरकार बदनाम होतं. पेपर फुटीचा कायदा इतका कडक झाला पाहिजेल की मृत्यू दंड होतो, त्याप्रमाणे त्याच्यावर दंड झाला पाहिजे. चाकूने मारलेला माणूस दिसतो. मात्र परीक्षेने मारलेला माणूस दिसत नाही”, असं बच्चू कडू म्हणाले.

‘हा मोठा खूनच’

“ज्याला 50 टक्के गुण घेण्याची लायकी नसते तो पास होतो आणि 99 टक्के घेणारा नापास होतो. त्यामुळे हा मोठा खूनच आहे. त्याला त्याच पद्धतीने शिक्षा झाली पाहिजे”, अशी मागणी बच्चू कडू यांनी केली. “भ्रष्टाचार मुक्त होणे गरजेचे आहे. आरोग्य, शिक्षण, परीक्षा भरती याचा ताळमेळ राखला पाहिजे”, असंही बच्चू कडू यावेळी म्हणाले.

अपर वर्धा धरणग्रस्तांच्या मंत्रालयातील आंदोलनावर बच्चू कडू म्हणाले…

मंत्रालयात काल अप्पर वर्धा धरणग्रस्तांना जाळीवर उतरुन आंदोलन केलं. मंत्रालयाच्या मुख्य इमारतीत हा प्रकार घडला. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. सुरुवातीला नेमकं काय घडलं ते समजत नव्हतं. पण नंतर पोलिसांनी आंदोलकांची धरपकड केली तेव्हा सर्व प्रकार उघडकीस आला.

“2014 मध्ये एक चांगला कायदा लागू झाला. त्याच्या अगोदर जे भूसंपादन झाले ते फार कमी किंमतीत झाले. त्यात त्यांना कमी मोबदला मिळाला. त्यामुळे त्यांच्या मनात चीड निर्माण झाली. त्यांच्या बाबतीत मी विधानसभेत बोलणार होतो. याबाबतीत आम्ही पुढाकार घेऊ”, असं बच्चू कडू म्हणाले. “आंदोलन चुकीचं झालं असेल, ते सरकारला चुकीचं वाटत असेल. मात्र आंदोलनामागच्या भावना अतिशय सकारात्मक आहेत. त्या दृष्टीने सरकारने निर्णय घेतला पाहिजे”, असं बच्चू कडू म्हणाले.

“पुनर्वसन, प्रकल्पग्रस्तांना नोकरी लागत नसेल तर 50 लाख रुपये दिले पाहिजे. नोकरी नाही तर उद्योगाला हातभार लावायला पाहिजे. 50 एकरचा मालक होता. आता पान टपरीवर काम भेटत नाही, अशी अवस्था त्यांची होऊ नये”, असं बच्चू कडू म्हणाले.

फडणवीसांनी अजित पवार यांता ‘तो’ निर्णय फेटाळला, बच्चू कडू म्हणतात…

दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कारखान्यांवर घातलेल्या अटी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. यावर कडू यांनी प्रतिक्रिया दिली. “एकत्रित सरकार आहे. काही गोष्टी एकत्रित नसताना घेतलेले निर्णय आणि आता एकत्रित आल्यावर घेतलेले निर्णय, त्याच्यातला हा निर्णय आहे”, असं बच्चू कडू म्हणाले.

बच्चू कडू यांनी इंडिया आघाडीच्या बैठकीवरही प्रतिक्रिया दिली आहे. इंडिया आघाडीची मुंबईत बैठक पार पडणार आहे. याबाबत बच्चू कडू यांना विचारला असता “देशात दोन प्रथा आहेत. इंडिया आणि भारतीयांची स्पर्धा आहे. भारतीय म्हणजे कायम कष्ट, प्रचंड मेहनत. इंडिया म्हणजे एशो आराम, एसीमध्ये राहणारा. त्यांनी इंडिया नाव घेऊन विचार स्पष्ट केलेला आहे. हम कोई भारतीय नहीं. हम इंडियावाले और हम ऐशो आराम वाले है. यामुळे त्यांची अधिक गोची झालीय”, असं बच्चू कडू म्हणाले.

‘…ब्रह्मदेव खाली आला तरी मी मंत्रिपद घेणार’

“मंत्री पदापेक्षा मला मंत्रालय भेटलं. दिव्यांगण मंत्रालय भेटले, मंत्रिपदापेक्षा जास्त भेटलं. आम्ही मागितलेला एक डोळा आणि आम्हाला मिळाले दोन डोळे. मला मंत्रीपदाची गरज नाही. मी दावा सोडलेला आहे. 2024 पर्यंत ब्रह्मदेव खाली आला तरी मी मंत्रिपद घेणार नाही”, असं बच्चू कडू म्हणाले.

बच्चू कडू महायुतीच्या बैठकीला जाणार नाहीत

महायुतीची 1 तारखेला महायुतीची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीचं आपल्यालाही निमंत्रण आल्याचं बच्चू कडू म्हणाले. पण या बैठकीला आपण जाऊ शकणार नाही, असं बच्चू कडू म्हणाले. “माझं ठाण्याला दिव्यांग अभियान आहे. त्यामुळे मी जाऊ शकणार नाही. आमचं अभियान सर्वात मोठं, सामान्य लोकांसाठी आहे. त्याचं स्थान सोडून बैठकीसाठी जाणं चांगलं नाही”, असं बच्चू कडू यांनी सांगितलं.

लाईट इन्फंट्रीचे रायफलमन सुनील कुमार यांना वीरमरण
लाईट इन्फंट्रीचे रायफलमन सुनील कुमार यांना वीरमरण.
पुलवामा हल्ल्यात पाकिस्तानचा हात, स्वत: दिली कबुली
पुलवामा हल्ल्यात पाकिस्तानचा हात, स्वत: दिली कबुली.
गोळ्या आल्या तर गोळे फेका; मोदींच्या सैन्यदलाच्या प्रमुखांना सूचना
गोळ्या आल्या तर गोळे फेका; मोदींच्या सैन्यदलाच्या प्रमुखांना सूचना.
भारतीय सेनेची धमक रावळपिंडीपर्यंत गेली - संरक्षणमंत्री राजनाथ सिंग
भारतीय सेनेची धमक रावळपिंडीपर्यंत गेली - संरक्षणमंत्री राजनाथ सिंग.
पाकिस्तानच्या ख्वाजा आसिफला भारताकडून सकारात्मक चर्चेच्या अपेक्षा!
पाकिस्तानच्या ख्वाजा आसिफला भारताकडून सकारात्मक चर्चेच्या अपेक्षा!.
ब्रह्मोसची ताकद काय आहे ते पाकिस्तानला विचारा - योगी आदित्यनाथ
ब्रह्मोसची ताकद काय आहे ते पाकिस्तानला विचारा - योगी आदित्यनाथ.
जैसलमेरच्या भटोडा गावात जीवंत स्फोटकं सापडले, नागरिकांमध्ये भिती
जैसलमेरच्या भटोडा गावात जीवंत स्फोटकं सापडले, नागरिकांमध्ये भिती.
भारत - पाकिस्तानच्या डिजीएमओची बैठक, काय होणार चर्चा?
भारत - पाकिस्तानच्या डिजीएमओची बैठक, काय होणार चर्चा?.
शेतकऱ्यांना दिलासा मिळणार! भारतात वेळेच्या आधीच पाऊस दाखल होणार
शेतकऱ्यांना दिलासा मिळणार! भारतात वेळेच्या आधीच पाऊस दाखल होणार.
जम्मू काश्मीर, जैसलमेर, अमृतसरमध्ये परिस्थिती पूर्वपदावर
जम्मू काश्मीर, जैसलमेर, अमृतसरमध्ये परिस्थिती पूर्वपदावर.