IAS Transfer | राज्यात तीन आयएएस अधिकाऱ्यांची बदली, तीन महापालिकांचे आयुक्त बदलले

यंदाच्या जानेवारी महिन्यापर्यंत बांगर हे नागपूर महापालिकेच्या आयुक्तपदाचा कारभार सांभाळत होते. मात्र त्यांच्या जागी तुकाराम मुंढे यांची आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली (IAS Officer Abhijit Bangar Transfer as Navi Mumbai Municipal Commissioner)

IAS Transfer | राज्यात तीन आयएएस अधिकाऱ्यांची बदली, तीन महापालिकांचे आयुक्त बदलले
Follow us
| Updated on: Jun 23, 2020 | 2:15 PM

मुंबई : राज्यात तीन आयएएस अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे. नवी मुंबई, उल्हासनगर आणि मीरा भाईंदर महापालिकांच्या आयुक्तपदी नवीन अधिकाऱ्यांची वर्णी लागली आहे. तुकाराम मुंढे यांच्याआधी नागपूर महापालिकेच्या आयुक्तपदी असलेल्या अभिजीत बांगर यांची चार महिन्यात दुसऱ्यांदा बदली झाली आहे. (IAS Officer Abhijit Bangar Transfer as Navi Mumbai Municipal Commissioner)

अभिजीत बांगर यांची आता नवी मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे. ते 2008 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत.

यंदाच्या जानेवारी महिन्यापर्यंत बांगर हे नागपूर महापालिकेच्या आयुक्तपदाचा कारभार सांभाळत होते. मात्र त्यांच्या जागी तुकाराम मुंढे यांची आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर महिनाभर बांगर यांच्याकडे कोणतेही खाते नव्हते.

फेब्रुवारी 2020 मध्ये वस्त्रोद्योग संचालक म्हणून अभिजीत बांगर यांची नियुक्ती करण्यात आली होती, मात्र त्यांनी पदभार स्वीकारला नव्हता. त्यामुळे शेवटी नागपूर विभागाचे अतिरिक्त आयुक्त म्हणून त्यांची नियुक्ती झाली.

आता जेमतेम चार महिन्यात पुन्हा त्यांच्याकडे नवी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. विशेष म्हणजे नवी मुंबई महापालिकेचे आयुक्तपद यापूर्वी तुकाराम मुंढे यांनी सांभाळले होते, आता तिथेच बांगर यांची बदली झाली आहे.

कोण आहेत अभिजीत बांगर?

2008 च्या तुकडीचे आयएएस अधिकारी

युवा आणि धडाडाचे सनदी अधिकारी म्हणून ओळख

सध्या नागपूर विभागाचे अतिरिक्त आयुक्त

नोव्हेंबर 2018 ते जानेवारी 2020 असे 14 महिने नागपूर महापालिकेचे आयुक्त म्हणून काम

14 महिन्यात कार्यकाळात नागपूरमधील कचरा आणि पाण्याची समस्या सोडवली, स्वच्छ भारतमध्ये नागपूरचा क्रमांक सुधारला

फेब्रुवारी 2020 मध्ये वस्त्रोद्योग विभागाचे संचालक म्हणून बदली झाली, मात्र त्यांनी पदभार स्वीकारला नव्हता

अखेर नागपूर विभागाचे अतिरिक्त आयुक्त म्हणून त्यांची नियुक्ती झाली

उल्हासनगर, मीरा भाईंदर महापालिकेला नवे आयुक्त 

दुसरीकडे, राज दयानिधी यांची उल्हासनगर महानगरपालिकेच्या आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे. तर विजय राठोड यांची मीरा भाईंदर महापालिकेच्या आयुक्तपदी वर्णी लागली आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या या कामाचा आढावा घेऊनच केल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

(IAS Officer Abhijit Bangar Transfer as Navi Mumbai Municipal Commissioner)

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.