लस टोचणं हे स्किल; मलाही कोरोनाची लस द्यायला आवडेल: महापौर किशोरी पेडणेकर
परवानगी मिळाली तर मलाही कोरोनाची लस द्यायला आवडेल. लसीकरणाच्या मोहिमेत वैद्यकीय कर्मचाऱ्यांसोबत काम करायला आवडेल, अशी प्रतिक्रिया महापौर किशोरी पेडणेकर यांनी व्यक्त केली. (if i will get permission i would like to participate in vaccination)
मुंबई: लस टोचणं हे सुद्धा एक स्किल आहे. मी हे स्किल विसरलेले नाही. त्यामुळे परवानगी मिळाली तर मलाही कोरोनाची लस द्यायला आवडेल. लसीकरणाच्या मोहिमेत वैद्यकीय कर्मचाऱ्यांसोबत काम करायला आवडेल, अशी प्रतिक्रिया महापौर किशोरी पेडणेकर यांनी व्यक्त केली. (if i will get permission i would like to participate in vaccination)
देशात कोव्हॅक्सिन आणि कोव्हिशिल्ड या दोन लसींच्या आपत्कालीन वापरास परवानगी देण्यात आली आहे. तर झायडस कॅडिला लसीच्या तिसऱ्या ट्रायलला परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे देशात कोणत्याही क्षणी लसीकरणास सुरुवात होणार आहे. या पार्श्वभूमीवर महापौर किशोरी पेडणेकर यांनी टीव्ही9 मराठीशी खास संवाद साधला. त्यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली. कोरोना लसीकरणाबाबतची सर्व तयारी झालेली आहे. काळजीपूर्वक आणि टप्प्याटप्प्याने लसीकरण केलं जाणार आहे. प्रशासनाने जर मला परवानगी दिली तर मलाही लस द्यायला आवडेल. लस देणे हे एक स्किल असून मी ते अजून विसरलेले नाही, असं किशोरी पेडणेकर म्हणाल्या. कांजूरमार्ग येथील इमारतीत कोरोना लसीची साठवणूक केली जाणार असून लसीवर सूर्यप्रकाश पडणार नाही याची काळजी घेतली जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
उद्या बैठक
कोरोना लसीची पूर्ण तयारी झाली आहे. माझं प्रशासनावर संपूर्ण लक्ष आहे. उद्या सोमवारी आमची आढावा बैठक होणार आहे. या बैठकीत तयारीची संपूर्ण माहिती घेतली जाईल, असं त्यांनी स्पष्ट केलं.
म्हणून त्या परिचारिका थांबल्या
किशोरी पेडणेकर या सुद्धा परिचारिका होता. कोरोना संकट काळात त्यांनी स्वत: परिचारिकेचा ड्रेस परिधान करून रुग्ण सेवा सुरू केली होती. त्यावेळी त्यांचं कौतुकही झालं आणि त्यांना ट्रोलही करण्यात आलं होतं. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. मला परिचारिका म्हणून काम करताना पाहून काही लोकांनी ट्रोल केलं. पण त्या काळात मी परिचारिकेचा ड्रेस घालून रुग्णालयात काम केलं म्हणूनच पहिल्या आणि तिसऱ्या वर्षाच्या नर्सिंगच्या मुली रुग्णालयात थांबल्या. त्यांना प्रोत्साहन मिळालं, असंही त्या म्हणाल्या. (if i will get permission i would like to participate in vaccination)
36 जिल्हे 72 बातम्या | सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढला | 3 January 2021https://t.co/rc7VX50oLl#marathinews | #latestnews | #newsUpdate
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 3, 2021
संबंधित बातम्या:
कोवॅक्सिन, कोव्हिशिल्ड आणि झायडस कॅडिला लसीच्या आपत्कालीन वापराला अखेर परवानगी
परवानगीनंतर मुंबईतील 4 रुग्णालयांमध्ये लसीकरणाला सुरुवात होणार
कोरोनाची लस घेतल्यावर तब्येत बिघडली तर, जबाबदारी सरकार घेणार की कंपनी?
(if i will get permission i would like to participate in vaccination)