जर हे राज्य माझ्या हातात आलं… राज ठाकरे नेमकं काय म्हणाले
जगाला हेवा वाटेल, असा महाराष्ट्र उभा राहू शकतो, असं राज ठाकरे यांनी सांगितलं.
मुंबई : अभिनेता सुबोध भावे (Subodh Bhave) यांनी मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मुलाखत घेतली. शिवस्मरण हा या संवादाचा विषय होता. राज ठाकरे हे सहकलाकार आहेत. त्यांनी व्हाईस ओव्हर दिला. यावेळी बोलताना राज ठाकरे म्हणाले, मी माझ्या पक्षस्थापनेच्या वेळी पहिल्या सभेला बोललो होतो. मी महाराजांना स्मरण करून खरंच मी शपथपूर्वक सांगतो. जर हे राज्य माझ्या हातात आलं. सत्ता माझ्या हातात आली, तर जगाला हेवा वाटेल, असा महाराष्ट्र मी लोकांना करून दाखविनं. हे सहज शक्य आहे.
पुरुष गरोदर राहणे आणि बाहेर आलेली टूथपेस्ट आत घालणं या दोन गोष्टी सोडल्या तर, जगात अशक्य गोष्ट कुठलीचं नाही. त्यामुळं जगाला हेवा वाटेल, असा महाराष्ट्र उभा राहू शकतो, असं राज ठाकरे यांनी सांगितलं.
राज ठाकरे हे आजोबा झालेत. कियानला महाराजांची गोष्ट सांगायची असेल तर महाराजांच्या कोणत्या गोष्टीनं सुरुवात करालं. मुलगा असल्यामुळं आणि त्यातही ठाकरे असल्यामुळं त्याला लढाया सांगाव्या लागतील, असं मला वाटतं. (हशा नि टाळ्या…)
मोठा झाल्यानंतर सांगेन त्याला की, शब्दकोष बनविला होता नि बाकीच्या गोष्टी. पण, शेवटी शिवछत्रपतींना जिजाऊ मातेनं रामायण, महाभारताच्या कथा ऐकविल्यात. तो संस्कार पुढं चालू ठेवणं ही महत्त्वाची गोष्ट आहे, असंही राज ठाकरे म्हणालेत.
आम्ही एकदा उदयपूरला गेलो होतो. जेम्स बाँडच्या चित्रपटाचं शुटिंग झालं होतं. तिथं एक बोट आहे. शुटिंगपूर्वी रेकीसाठी लोकं आले तेव्हा तलावाच्या कोपऱ्यात बोट अत्यंत भग्नावस्थेत बघीतली. त्याचे डिटेल्स त्यांनी काढले.
कुणी बांधली. केव्हाची आहे. तशी बोट त्यांनी बनविली. डिझाईन केली. संपूर्ण जशीच्या तशी तयार केली. त्यातनं ऑक्टोपसीची इंट्री घेतली. ताज हॉटेलला ती भेट म्हणून दिली. हे सर्व फ्रेंचचे लोकंच करू शकतात. सगळं ते डिटेल्समध्ये उभं करतील.