AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Uddhav Thackeray:दीड महिन्यांत कोरोना रुग्णसंख्या सातपटीने वाढली, निर्बंध नको असतील तर मास्क वापरा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन, 15 दिवसांनी पुढील निर्णय

मुंबई- गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढते आहे, राज्य सरकार पुढील पंधरा दिवस लक्ष ठेवून असेल. निर्बंध नको असतील तर नागरिकांनी स्वतःहून शिस्त पाळावी. मास्क वापरावा, लसीकरण करून घ्यावे, हात धुवावे आणि अंतर ठेवावे, असे आवाहन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज येथे केले. मुख्यमंत्र्यांनी आज सायंकाळी कोविड टास्क फोर्स समितीच्या सदस्यांशी चर्चा केली. त्यावेळी […]

Uddhav Thackeray:दीड महिन्यांत कोरोना रुग्णसंख्या सातपटीने वाढली, निर्बंध नको असतील तर मास्क वापरा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन, 15 दिवसांनी पुढील निर्णय
CM meeting taskforceImage Credit source: social media
Follow us
| Updated on: Jun 02, 2022 | 8:16 PM

मुंबई- गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढते आहे, राज्य सरकार पुढील पंधरा दिवस लक्ष ठेवून असेल. निर्बंध नको असतील तर नागरिकांनी स्वतःहून शिस्त पाळावी. मास्क वापरावा, लसीकरण करून घ्यावे, हात धुवावे आणि अंतर ठेवावे, असे आवाहन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज येथे केले. मुख्यमंत्र्यांनी आज सायंकाळी कोविड टास्क फोर्स समितीच्या सदस्यांशी चर्चा केली. त्यावेळी त्यांनी या सूचना दिल्या. वर्षा निवासस्थानी असलेल्या समिती कक्षात झालेल्या या बैठकीस मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, मुख्यमंत्री यांचे प्रधान सल्लागार सीताराम कुंटे, सार्वजनिक आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ प्रदीप व्यास, मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव आशिष कुमार सिंह आदी उपस्थित होते.

दीड महिन्यांत सात पट रुग्ण वाढले

या बैठकीच्या प्रारंभी डॉ प्रदीप व्यास यांनी राज्यातील कोविड विषाणूच्या संसर्गाबाबत सविस्तर माहिती दिली. १६ एप्रिल २०२२ रोजी राज्यात सर्वात कमी ६२६ सक्रिय रुग्ण होते. आज दीड महिन्यात त्यात सात पटीने वाढ झाली असून ती संख्या ४५०० वर गेली आहे असे सांगून डॉ प्रदीप व्यास यांनी सांगितले की, मुंबई, ठाणे, पुणे तसेच महानगर क्षेत्रात राज्याच्या एकूण रुग्ण संख्येच्या ९७ टक्के रुग्ण आहेत. मुंबईचा पॉझिटीव्हीटी दर ६ टक्के असून राज्याचा देखील वाढून ३ टक्के झाला आहे असेही ते म्हणाले.

रुग्णसंख्या वाढते आहे

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सांगितले की, गेल्या काही दिवसांत कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी दिलेल्या सूचनांनुसार कोविड आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे शासन पुढील पंधरा दिवस परिस्थितीवर लक्ष ठेवून असेल. प्रसार वाढू नये यासाठी नागरिकांनी काळजी घेतली पाहिजे, यावर भर दिला पाहिजे.

हे सुद्धा वाचा

फिल्ड रुग्णालये सुसज्ज ठेवा

कोरोना कालावधीत उभारण्यात आलेली फिल्ड रुग्णालये व्यवस्थित आहे का पहा. त्यांचे स्ट्रक्चरल ऑडिट करुन घ्यावे. या  ठिकाणी वैद्यकीय कर्मचारी आहेत का, आवश्यक पायाभूत सुविधा आहेत का याचा आढावा घ्यावा, अशा सूचना उद्धव यांनी आरोग्य विभागाला दिल्या.

कोरोना चाचण्या वाढवा

कोविड चाचण्यांचे प्रमाण कमी झाले आहे. हे प्रमाण वाढविण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. कोविड विषाणूचा नवीन व्हेरियंट आहे का, असल्यास त्याची संसर्ग क्षमता किती आहे, यावर लक्ष ठेवा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. लवकरच शाळा सुरू होतील. शाळेच्या बाबत जागतिक स्तरावर काय निर्णय घेतले गेले आहेत, तेथील मुलांना संसर्ग होण्याची स्थिती काय आहे, याबाबत माहिती घ्यावी, असेही मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सांगितले. यावेळी कोविड टास्क फोर्स चे अध्यक्ष डॉ. संजय ओक, डॉ. अजित देसाई, डॉ. बजान, डॉ. शशांक जोशी, डॉ. राहुल पंडित, डॉ. वसंत नागवेकर, डॉ. तात्याराव लहाने याांनी दूरदृष्य प्रणालीव्दारे आपली मते मांडली.

नागरिकांना आवाहन

ताप, सर्दी, घशात दुखत असल्यास तत्काळ कोविड चाचणी करुन घ्या गर्दीच्या ठिकाणी मास्क आवर्जून वापरावा बारा ते अठरा वयोगटातील लसीकरण वाढवा. ज्येष्ठ, सहव्याधी नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे, बूस्टर लस घ्यावी आरोग्य व्यवस्थेने पायाभूत सुविधांची तयारी करुन ठेवावी ऑक्सिजन, औषधे यांचा साठा करुन ठेवावा. येणाऱ्या पावसाळ्यामुळे जलजन्य आजार देखील डोके वर काढतात, त्यांची लक्षणे कोरोना सारखीच असल्याने डॉक्टरांनी देखील अशा रुग्णांना वेळीच चाचण्या करून घेण्यास सांगावे.

लाडक्या बहिणींनो आता एप्रिलचा हफ्ता कधी? आदिती तटकरेंनी थेट सांगितलं..
लाडक्या बहिणींनो आता एप्रिलचा हफ्ता कधी? आदिती तटकरेंनी थेट सांगितलं...
भारताकडून पेजर हल्ला होण्याची भेदरलेल्या पाकिस्तानला वाटतेय भीती
भारताकडून पेजर हल्ला होण्याची भेदरलेल्या पाकिस्तानला वाटतेय भीती.
Toolkit दहशतवाद्यांच्या डेड ड्रॉप पॉलिसीचे 'हे' 4 कोड असतात महत्त्वाचे
Toolkit दहशतवाद्यांच्या डेड ड्रॉप पॉलिसीचे 'हे' 4 कोड असतात महत्त्वाचे.
पाक लष्करानंतर नागरिकांमध्ये घाबरगुंडी; Google वर एकच गोष्ट करताय सर्च
पाक लष्करानंतर नागरिकांमध्ये घाबरगुंडी; Google वर एकच गोष्ट करताय सर्च.
हल्ल्यातील प्रत्यक्षदर्शींना घेऊन एनआयएचं पथक् बैसरन खोऱ्यात दाखल
हल्ल्यातील प्रत्यक्षदर्शींना घेऊन एनआयएचं पथक् बैसरन खोऱ्यात दाखल.
बिबट्याने 11 महिन्यांच्या चिमूकल्याला उचलून नेलं, 18 तासांनंतर सापडला
बिबट्याने 11 महिन्यांच्या चिमूकल्याला उचलून नेलं, 18 तासांनंतर सापडला.
'पहलगाम'चा अख्खा प्लानचं उघड, अतिरेक्यांना काय होत्या सूचना? अन्...
'पहलगाम'चा अख्खा प्लानचं उघड, अतिरेक्यांना काय होत्या सूचना? अन्....
'या भूमीतील सर्व बंधू भगिनींना..', पंतप्रधान मोदींचं वेव्हज समिटमध्ये
'या भूमीतील सर्व बंधू भगिनींना..', पंतप्रधान मोदींचं वेव्हज समिटमध्ये.
हल्ल्याआधी बैसरन व्हॅलीत मुक्काम,या तीन ठिकाणांची दहशतवाद्यांकडून रेकी
हल्ल्याआधी बैसरन व्हॅलीत मुक्काम,या तीन ठिकाणांची दहशतवाद्यांकडून रेकी.
उगवत्या सूर्याप्रमाणे हे समिट चमकत आहे; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
उगवत्या सूर्याप्रमाणे हे समिट चमकत आहे; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.