नवीन सागरी मासेमारी कायद्याच्या अंमलबजावणीस सुरुवात; अस्लम शेख यांच्या आदेशानंतर एलईडी बोटींवर कारवाई

नियमांचे उल्लंघन करून मासेमारी करणाऱ्या बोटींवर कारवाई करण्याचे आदेश मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख यांच्याकडून संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. अस्लम शेख यांच्या आदेशानुसार गुरुवारी रात्री उशीरा बेकायदेशीररित्या मासेमारी करणाऱ्या 7 बोटींवर कारवाई करण्यात आली आहे.

नवीन सागरी मासेमारी कायद्याच्या अंमलबजावणीस सुरुवात; अस्लम शेख यांच्या आदेशानंतर एलईडी बोटींवर कारवाई
Follow us
| Updated on: Dec 10, 2021 | 6:25 AM

मुंबई : नियमांचे उल्लंघन करून मासेमारी करणाऱ्या बोटींवर कारवाई करण्याचे आदेश मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख यांच्याकडून संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. अस्लम शेख यांच्या आदेशानुसार गुरुवारी रात्री उशीरा बेकायदेशीररित्या मासेमारी करणाऱ्या 7 बोटींवर कारवाई करण्यात आली आहे. एल.ई.डी. लाईटच्या मदतीने बोटीतून मासेमारी सुरू होती. यातील सातपैकी तीन बोटींवरून  एलईडी लाईटसह इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. संबंधित बोटी आणि जाळे देखील ताब्यात घेण्यात आले असून, बोट मालकांना नोटीस पाठवण्यात आली आहे.

नवीन अध्यादेशानुसार कारवाई

महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन (सुधारणा) अध्यादेश राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मंजूर करण्यात आला आहे. अध्यादेश मंजूर झाल्यानंतर राज्यापालाच्या स्वाक्षरीने तातडीने त्याची राज्यात अंमलबजावणी देखील करण्यात येत आहे. या अध्यादेशामध्ये मासेमारी करण्यासाठी काही नियम व अटी घालून देण्यात आल्या आहेत, त्याचे उल्लंघन केल्यास संबंधित बोटींवर कारवाई करण्याचे आदेश मंत्री अस्लम शेख यांनी दिले आहे. अशाच नियमांचे उल्लंघन करणाऱ्या सात बोटींवर काल रात्री कारवाई करण्यात आली. कारवाई केलेल्या अधिकाऱ्यांच्या पथकामध्ये मुंबई विभागाचे प्रादेशिक उपायुक्त मत्स्यव्यवसाय महेश देवरे, मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी संजय माने,  सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी सचिन भालेराव  आणि नीरज चासकर यांचा समावेश होता.

अवैध मासेमारीमुळे माशांच्या अनेक प्रजाती संकटात 

गेल्या काही दिवसांपासून राज्यात अवैधपद्धतीने मासेमारी सुरू आहे. अवैधपद्धतीने मासेमारी सुरू असल्यामुळे काही माशांच्या प्रजातीचे अस्वित्व धोक्यात आले आहे. तसेच एलईडी लाईटच्या मदतीने मासेमारी केल्यास कमी वेळेत मोठ्याप्रमाणात मासे मिळतात. मात्र यामुळे माशांच्या वाढीला पुरसावेळा मिळत नाही. परिणामी माशांची संख्या झपाट्याने कमी होते. याचा परिणाम म्हणजे भविष्यात माशांच्या अनेक प्रजाती नष्ट होऊ शकतात. याला आळा घालण्यासाठी आता राज्यात महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन (सुधारणा) अध्यादेश लागू करण्यात आला आहे. या अंतर्गत गुरुवारी रात्री साई गोल्ड, दबाळूमाता आणि अंबा या बोटींवर कारवाई करत एलईडी लाईट आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे.

संबंधित बातम्या 

Adity Thackarey | ठाणे खाडी परिसराला रामसर क्षेत्र म्हणून मान्यतेसाठी केंद्राकडे प्रस्ताव पाठविणार : आदित्य ठाकरे

Mumbai Crime: कामावर उशिरा आली म्हणून अल्पवयीन नोकरानीला निर्वस्त्र करुन मारहाण, नग्न व्हिडिओही काढला

BMC | मनपा कर्मचाऱ्यांच्या सुदृढ आरोग्यासाठी ‘आनापानसती’ प्रशिक्षणाचे आयोजन

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.