PSI भरतीबाबत MPSC चा मोठा निर्णय, मुलाखतीसाठी आता शारीरिक चाचणीत 60 गुण आवश्यक

MPSC ने PSI भरतीबाबत एक महत्वपूर्ण निर्णय घेतलाय. या निर्णयानुसार PSI पदाची मुलाखत देण्यासाठी शारीरिक चाचणीत 60 गुण मिळवणं आवश्यक असणार आहे.

PSI भरतीबाबत MPSC चा मोठा निर्णय, मुलाखतीसाठी आता शारीरिक चाचणीत 60 गुण आवश्यक
महाराष्ट्र लोकसेवा आयोग
Follow us
| Updated on: May 25, 2021 | 5:39 PM

मुंबई : राज्यातील MPSC ची तयारी करणाऱ्या आणि PSI होण्याचं स्वप्न बाळगणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे. MPSC ने PSI भरतीबाबत एक महत्वपूर्ण निर्णय घेतलाय. या निर्णयानुसार PSI पदाची मुलाखत देण्यासाठी शारीरिक चाचणीत 60 गुण मिळवणं आवश्यक असणार आहे. शारीरिक चाचणीत 60 गुण असतील तरंच विद्यार्थ्यांना मुलाखत देता येणार आहे. आता मैदानी गुण फक्त क्वालिफिकेशनसाठी गृहीत धरले जाणार आहेत, तशी माहिती MPSC ने जारी केलेल्या परिपत्रकात देण्यात आलीय. (Important decision of MPSC regarding PSI recruitment)

PSI भरतीसाठी विद्यार्थ्यांना आता MPSC पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि त्यानंतर मैदानी परीक्षेत 60 गुण आवश्यक असणार आहेत. त्यानंतरच या विद्यार्थ्यांना मुखालतीसाठी पात्र ठरवण्यात येणार आहे. MPSCच्या 2020 मध्ये निघालेल्या जाहिरातीसाठी हा नियम लागू असणार आहे. तशी माहिती MPSC कडून देण्यात आलीय. यापूर्वी शारीरिक चाचणीचे गुण निकालासाठी एकत्रित केले जात होते. मात्र आता अंतिम गुणवत्ता यादीतून शारीरिक चाचणीचे गुण वगळण्यात आले आहेत. हे गुण आता फक्त पात्रतेसाठी ग्राह्य धरले जाणार आहेत.

युपीएससीकडून नागरी सेवा आणि इतर परीक्षांच्या मुलाखती स्थगित

केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) कोरोना विषाणूच्या घटनांमध्ये वाढ झाल्यामुळे नागरी सेवा परीक्षा 2020 ची मुलाखत पुढे ढकलली आहे. 20 एप्रिल रोजी प्रसिद्ध झालेल्या अधिकृत निवेदनातून ही माहिती मिळाली आहे. युपीएससीमार्फत दरवर्षी तीन टप्प्यात सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षा घेण्यात येते, ज्यात प्राथमिक परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखतीचा समावेश आहे. या माध्यमातून भारतीय प्रशासकीय सेवा (IAS), भारतीय परराष्ट्र सेवा (IFS) आणि भारतीय पोलिस सेवा (IPS) अधिकारी निवडले जातात.

निवेदनात म्हटले आहे की, मुलाखतीची तारीख आणि भरती परीक्षेची तारीख याबाबत वेळोवेळी आढावा घेण्यात येईल. आयोगाकडून प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सुधारीत कार्यक्रमांबाबत युपीएससीच्या संकेतस्थळावर सूचित केले जाईल. युपीएससीने सोमवारी आपल्या विशेष बैठकीत सांगितले की, वेगाने बदलणारी परिस्थिती, आरोग्याबाबतचे विचार, सामाजिक अंतर राखण्याचे नियम, साथीच्या रोगामुळे उद्भवणार्‍या परिस्थितीचा विचार केला

इतर बातम्या :

‘निसर्ग’प्रमाणेच तौक्ते चक्रीवादळग्रस्तांना भरपाई, मुख्यमंत्र्यांची घोषणा, मदतीचा आकडा मात्र गुलदस्त्यात!

‘या’ 18 जिल्ह्यात होम आयसोलेशन बंद, यादी जारी; तुमचाही जिल्हा आहे का? पटापट तपासा!

Important decision of MPSC regarding PSI recruitment

सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.