दिलासादायक ! मुंबईत रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा कालवधी 300 दिवसांवर, सध्या 11 हजार सक्रिय रुग्ण

महापालिका क्षेत्रातील कोव्हिड-19 बाधित रुग्णांचे प्रमाण दुप्पट होण्याचे प्रमाण 300 दिवसांच्याही पुढे गेले आहे. महापालिकेच्या 24 विभागांचा स्वतंत्रपणे विचार केल्यास सी विभागात रुग्ण दुपटीचा कालावधी तब्बल 809 दिवसांवर पोहोचला आहे.

दिलासादायक !  मुंबईत रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा कालवधी 300 दिवसांवर, सध्या 11 हजार सक्रिय रुग्ण
Follow us
| Updated on: Nov 18, 2020 | 8:23 PM

मुंबई : महापालिका क्षेत्रातील कोव्हिड-19 बाधित रुग्णांचे प्रमाण दुप्पट होण्याचे प्रमाण 300 दिवसांच्याही पुढे गेले आहे. महापालिकेच्या 24 विभागांचा स्वतंत्रपणे विचार केल्यास सी विभागात रुग्ण दुपटीचा कालावधी तब्बल 809 दिवसांवर पोहोचला आहे. तर ई, बी, एफ-दक्षिण आणि जी-उत्तर या 4 विभागांमध्ये रुग्ण दुपटीच्या कालावधीने 500 दिवसांचा कालावधी पूर्ण केला आहे. (in Mumbai Covid-19 infected patients doubling rate has gone above 300 days)

मुंबईत कोरोनाचा संसर्ग आटोक्यात येत असल्याचे सांगितले जात आहे. मुंबई महापालिकेने दिलेल्या माहितीप्रमाणे शहरात कोरोनाग्रस्त रुग्ण दुप्पट होण्याचे प्रमाण 300 दिवसांच्याही पुढे गेले आहे. शहरात सध्या रुग्ण वाढीचा सरासरी दर 0.22 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सक्रिय रुग्णांच्या संख्येतदेखील सातत्याने घट होत असल्याचे पाहायला मिळत आहे. सध्या मुंबई शहरात 11 हजार 557 एवढे सक्रिय कोरोना रुग्ण आहेत.

दरम्यान, बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील व्यवसायिकांची कोरोना चाचणी करुन घेण्यासाठी महापालिकेने विशेष मोहीम सुरु केली आहे. या अंतर्गत विविध दुकानदार, दुकानात तसेच हॉटेलमध्ये काम करणारे कर्मचारी, बेस्टचे चालक-वाहक यांच्या कोरोना चाचण्या नियमितपणे करण्यात येणार आहेत. या चाचणीदरम्यान बाधित रुग्ण आढळल्यास त्यांच्यावर आवश्यक ते वैद्यकीय उपचार करण्यात येत आहेत. तसेच विलगीकरण करणे, समुपदेशन करणे इत्यादी पर्यायदेखील करण्यात येत आहे.

दरम्यान, राज्यात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे कोव्हिडविषयक सोयी-सुविधांमध्ये महापालिकेने कुठलीही कपात केलेली नाही. मुंबई आरोग्य प्रशासन आणि महापालिका सज्ज असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. नागरिकांना कोव्हिडची कोणतीही लक्षणे आढळल्यास त्यांनी तातडीने वैद्यकीय चाचणी करुन घ्यावी. यासाठी महापालिकेच्या अखत्यारितील विविध दवाखाने, रुग्णालये अशा 244 ठिकाणी मोफत वैद्यकीय चाचणी सुविधा उपलब्ध असल्याचे सांगण्याता आले आहे. यावेळी कोरोनाविषयक सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन मुंबई महापालिकेने सर्व नागरिकांना केले आहे. (in Mumbai Covid-19 infected patients doubling rate has gone above 300 days)

संबंधित बातम्या :

दिवाळीनंतर कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता! मुंबई महापालिका प्रशासनाच्या तयारीचा आदित्य ठाकरेंकडून आढावा

कोरोना मृत्यूदर शून्यावर आणण्यासाठी पुणे महापालिकेचे प्रयत्न, ऑडिट कमिटी नेमणार

भाजपचा मुंबई महापालिका निवडणुकीत पराभव निश्चित, त्यामुळेच नेते कामाला लागले, जयंत पाटलांचा टोला

मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.