Dharmveer Trailer Launched : दिघेंचही लग्न झालं नव्हतं अन् माझंही, सलमान धर्मवीरबद्दल मोजका बोलला पण काय मोलाचं बोलला
आदित्य ठाकरेंशी बोललो त्यांनीही एक साम्य सांगितलं की त्यांचं ही लग्न झालं नव्हतं आणि माझंही झालं नाही. एक चित्रपट आधी आला होता धर्मवीर, आता हा चित्रपटच येतोय. हाही चित्रपट तितकाच चालावा जितका तो धर्मवीर चालला होता. असंही त्यांनी सलमान खान यांनी सांगितले.
मुंबईः नमस्कार आता मी मराठीत बोलतो, माझं नवा सलमान खान (Salman khan)आहे. मला धर्मवीरचा (Dharmveer) ट्रेलर (Trailer) फार आवडला आहे. आत्ताच मी उद्धव ठाकरेंशी बोलत होतो, त्यांनी आनंद दिघेंबाबत (Anand Dighe) एक गोष्ट चांगली सांगितली की, जी माझ्या आणि त्यांच्यात साम्य असणारी होती, ते एका बेडरुममध्ये राहत होते, मीही एकाच बेडरुममध्ये राहतो. नंतर आदित्य ठाकरेंशी बोललो त्यांनीही एक साम्य सांगितलं की त्यांचं ही लग्न झालं नव्हतं आणि माझंही झालं नाही. एक चित्रपट आधी आला होता धर्मवीर, आता हा चित्रपटच येतो आहे. हाही चित्रपट तितकाच चालावा जितका तो धर्मवीर चालला होता, असंही धर्मवीर चित्रपटाचा ट्रेलर लॉंच झाला त्याप्रसंगी सलमान खान यांनी सांगितले.
ट्रेलर मला प्रचंड आवडला
धर्मवीर चित्रपटाच्या ट्रेलर लॉंचवेळी चाफ्याची फुले अर्पण करण्यात आली. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या प्रतिमेला चाफ्याची फुले अर्पण करण्यात आली. यावेळी सलमान खान यांनी सांगितले की, धर्मवीर चित्रपटाचा ट्रेलर मला प्रचंड आवडला आहे.
हा चित्रपटही खूप चालावा
हा चित्रपटही खूप चालावा अशी इच्छा व्यक्त करत त्यांनी ज्यांच्या आयुष्यावर हा चित्रपट आधारलेला आहे, त्यांच्या आणि आपल्यामध्ये एक साम्य असल्याचे सांगत त्यांनी हा विषय आपल्या लग्नाशीही जोडला.
नेत्यांचीही उपस्थिती
धर्मवीर चित्रपटाच्या ट्रेलर लॉंच प्रसंगी शिवसेनेचे दिग्गज नेते यावेळी उपस्थित होते. त्याचबरोबर हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतील मराठमोठा अभिनेता रितेश देशमुख याचीही मुख्य उपस्थिती होती. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत,पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, मंत्री एकनाथ शिंदे यांची प्रमुख उपस्थित होती.
चाफ्याची फुलं हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला चाफ्याची फुलं अर्पण करण्यात आली. दिवंगत आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित धर्मवीर हा चित्रपट आधारीत आहे. धर्मवीर चित्रपटाचा ट्रेलर लाँच, मुख्यमंत्री ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत, एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित होते. भेटला विठ्ठल हे गाणेही यावेळी लावण्यात आले होते.