बच्चू कडू मंत्रालय मारहाण प्रकरण : सरकारी वकिलाची खरडपट्टी; नेमके कोर्ट का संतापले?

मुंबई / ब्रिजभान जैस्वार : मंत्रालयात समाज कल्याण अधिकाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी प्रहार संघटनेचे अध्यक्ष आणि आमदार बच्चू कडू यांच्याविरोधातील खटल्याची आज मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी झाली. या सुनावणीला सरकारी वकील उशिराने हजर राहिले. त्यामुळे सत्र न्यायालयात चांगले संतापले आणि सरकारी वकिलांना कठोर शब्दांत खडे बोल सुनावले. याचवेळी आरोपी बच्चू कडू यांच्यासह सरकारी वकील आणि तपास […]

बच्चू कडू मंत्रालय मारहाण प्रकरण : सरकारी वकिलाची खरडपट्टी; नेमके कोर्ट का संतापले?
बच्चू कडू मंत्रालय प्रकरणी सरकारी वकिलांना खडेबोल सुनावलेImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Apr 06, 2023 | 2:07 PM

मुंबई / ब्रिजभान जैस्वार : मंत्रालयात समाज कल्याण अधिकाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी प्रहार संघटनेचे अध्यक्ष आणि आमदार बच्चू कडू यांच्याविरोधातील खटल्याची आज मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी झाली. या सुनावणीला सरकारी वकील उशिराने हजर राहिले. त्यामुळे सत्र न्यायालयात चांगले संतापले आणि सरकारी वकिलांना कठोर शब्दांत खडे बोल सुनावले. याचवेळी आरोपी बच्चू कडू यांच्यासह सरकारी वकील आणि तपास अधिकाऱ्यांना पुढील सुनावणीवेळी हजर राहण्याचे सक्त निर्देश देखील सत्र न्यायालयाने दिले. सरकारी पक्षाने बच्चू कडू यांच्याविरोधात आवश्यक तो पुरावा तसेच सीडी सादर न केल्यामुळे न्यायालय संतप्त झाले होते. न्यायालयाने सरकारी पक्षाला याबाबत कडक शब्दांत समज दिल्यानंतर सुनावणी तहकूब केली.

या प्रकरणी आवश्यक तो पुरावा, सीडी सादर अद्याप सादर न केल्यानं कोर्टानं खरडपट्टी काढली. मात्र आजची सुनावणी तहकूब करण्यात आली. यावर पुढील सुनावणी 25 एप्रिल रोजी घेण्यात येणार आहे. मुंबई सत्र न्यायालयात 15 फेब्रुवारीला बच्चू कडू यांनी गुन्हा नाकबूल केला होता. मंत्रालयातील आयटी विभाग सचिवाला मारहाण करण्यासाठी लॅपटॉप उचलण्याचं प्रकरणात मरीन लाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपी, तपास अधिकारी आणि सरकारी वकील यांना पुढील सुनावणी वेळी हजर राहण्याचे स्पष्ट निर्देश न्यायालयाने दिले.

प्रकरण काय आहे ?

प्रहार संघटनेचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांच्या विरोधात मंत्रालयात समाज कल्याण अधिकारी यांना मारहाणी प्रकरणात गुन्हा दाखल आहे. मंत्रालयामध्ये 26 सप्टेंबर 2018 रोजी उप सचिव प्रदीप चंद्रन यांना शिवीगाळ आणि लॅपटॉपने मारहाणी केल्याचं प्रकरण घडलं होतं. त्याविरोधात संबंधित अधिकारी यांच्या तक्रारीवरून मरिन ड्रॉईव्ह पोलीस ठाण्यात बच्चू कडू विरोधात भादवी कलम 353, 504 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

हे सुद्धा वाचा

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.