AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

CM Eknath Shinde:उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का, एकनाथ शिंदे यांच्यासोबत ऑनलाईन बैठकीला 12 शिवसेना खासदारांची उपस्थिती, सूत्रांची माहिती

एकनाथ शिंदे यांचे समर्थक आमदार गेल्या काही दिवसांपासून मुंबईत सातत्याने शक्तिप्रदर्शनही करीत आहेत. शिवसेना हा आपलाच पक्ष आहे आणि त्यांचे चिन्हही आपलेच आहे, असा दावा सातत्याने शिंदे गटाकडून करण्यात येतो आहे. आता शिवसेना खासदारांतही मोठी फूट पडल्यास उद्धव ठाकरे आणि शिवसेनेपुढील अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

CM Eknath Shinde:उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का, एकनाथ शिंदे यांच्यासोबत ऑनलाईन बैठकीला 12 शिवसेना खासदारांची उपस्थिती, सूत्रांची माहिती
शिवसेनेचे 14 खासदार शिंदेंसोबत?Image Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jul 18, 2022 | 5:50 PM

मुंबई – शिवसेनेतील (Shiv sena) दोन तृतियांश आमदार सोबत घेऊन बंडखोरी करणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde)आता शिवसेनेला आणखी एक धक्का देण्याच्या तयारीत आहेत. आमदारांनंतर आता शिवसेनेचे खासदार (Shivsena MP)फोडण्यात येणार असल्याची शक्यता आहे. संसदेच्या अधिवेशनात शिवसेनेच्या खासदारांत फूट निर्माण करण्यात येईल, अशी शक्यता शिवसेना खासदार विनायक राऊत यांनीही वर्तवली होती. एकनाथ शिंदे यांच्यासोबत झालेल्या ऑनलाईन मिटिंगमध्ये शिवसेनेचे 12 खासदार उपस्थित असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तसेच आणखी दोन खासदारही शिवसेनेच्या संपर्कात असल्याचे सांगण्यात येत आहेत. एकनाथ शिंदे यांचा शपथविधी झाल्यानंतर राज्यातील अनेक महापालिका, नगरपालिकांत शिवसेनेत फूट पडून अनेक माजी नगरसेवक आणि शिवसेनेचे पदाधिकारी हे शिंदे गटाला पाठिंबा देत आहेत. एकनाथ शिंदे यांचे समर्थक आमदार गेल्या काही दिवसांपासून मुंबईत सातत्याने शक्तिप्रदर्शनही करीत आहेत. शिवसेना हा आपलाच पक्ष आहे आणि त्यांचे चिन्हही आपलेच आहे, असा दावा सातत्याने शिंदे गटाकडून करण्यात येतो आहे. आता शिवसेना खासदारांतही मोठी फूट पडल्यास उद्धव ठाकरे आणि शिवसेनेपुढील अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

एकनाथ शिंदेंसोबत शिवसेना खासदारांची ऑनलाईन बैठक

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत झालेल्या ऑनलाईन बैठकीला 12 खासदार उपस्थित असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे यांच्या गटाची एक महत्त्वाची बैठक ट्रायडन्टमध्ये झालेल्या बैठकीत पार पडली. त्यात 12 शिवसेना खासदार या बैठकीत सहभागी झाल्याची माहिती मिळते आहे. श्रीकांत शिंदे, भावना गवळी यांच्यासह आणखी 12 खासदार कोणते, याकडे सगळ्यांचे लक्ष आहे.

शिंदे गटाकडून शिवसेनेची नवी राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर

दरम्यान या बैठकीनंतर एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून शिवसेनेची नवी राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. एकनाथ शिंदे यांची मुख्य नेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षप्रमुख पदी कुणाचीही नियुक्ती करण्यात आलेली नाही. दीपक केसरकर यांची मुख्य परवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. 12 खासदार या बैठकीला होते का याबाबत मात्र काहीही थेट बोलणे केसरकर यांनी टाळले. सर्व खासदार आमच्यासोबत असल्याचे त्यांनी सांगितले.

एकनाथ शिंदे रात्री दिल्लीला रवाना होणार

दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज रात्री दिल्लीला जाणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे आता दिल्लीच्या संसदेच्या अधिवेशन काळात शिवसेनेचे खासदार काही भूमिका घेणार का, याकडे सगळ्यांचे लक्ष आहे. मंत्रिमंडळ वाटपाबाबतही या दौऱ्यात एकनाथ शिंदे हे भाजपा पक्षश्रेष्ठींची भेट घेण्याची शक्यता आहे. तसेच 20 तारखेला सुप्रीम कोर्टात होणाऱ्या सुनावणीबाबतही दिल्ली दौऱ्यात काही विधिज्ञांची चर्चा होण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही दिल्लीला जाण्याची शक्यता आहे.

पहलगाम हल्ल्यात मुश्ताक अहमद जरगरचा हात?
पहलगाम हल्ल्यात मुश्ताक अहमद जरगरचा हात?.
पाकिस्तानचे पश्तून लोक भारतासोबत; काय आहे कारण?
पाकिस्तानचे पश्तून लोक भारतासोबत; काय आहे कारण?.
युद्धाची चाहूल? राज्यांना सुरक्षा यंत्रणांची मॉक ड्रिल घेण्याचे आदेश
युद्धाची चाहूल? राज्यांना सुरक्षा यंत्रणांची मॉक ड्रिल घेण्याचे आदेश.
राहुल गांधी पंतप्रधान मोदींच्या भेटीसाठी दाखल, काय होणार चर्चा?
राहुल गांधी पंतप्रधान मोदींच्या भेटीसाठी दाखल, काय होणार चर्चा?.
'मेरा ये वतन..', काश्मीरच्या शाळकरी मुलींनी गायलं देशभक्तीचं गाणं
'मेरा ये वतन..', काश्मीरच्या शाळकरी मुलींनी गायलं देशभक्तीचं गाणं.
'तुला पुढे काय शिकायचं?', उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा वैभवीला फोन
'तुला पुढे काय शिकायचं?', उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा वैभवीला फोन.
विशेष दलाची शोध मोहीम, tv9 चा ग्राऊंड रिपोर्ट
विशेष दलाची शोध मोहीम, tv9 चा ग्राऊंड रिपोर्ट.
काहीतरी मोठं होणार? पंतप्रधान मोदींचा लष्कराला फ्री हँड
काहीतरी मोठं होणार? पंतप्रधान मोदींचा लष्कराला फ्री हँड.
पाकसोबतचा वाद, पुतीन यांचा मोदींना फोन, युद्धजन्य परिस्थितीत काय घडतय?
पाकसोबतचा वाद, पुतीन यांचा मोदींना फोन, युद्धजन्य परिस्थितीत काय घडतय?.
कशाचे पेढे अन् काय.., 12वीचा निकाल लागताच सुप्रिया सुळेंचा वैभवीला फोन
कशाचे पेढे अन् काय.., 12वीचा निकाल लागताच सुप्रिया सुळेंचा वैभवीला फोन.