AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिंदे-फडणवीस यांच्याकडून बाळासाहेबांच्या स्मारकाची पाहणी, देवेंद्र फडणवीस म्हणतात,…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक लोकांना समर्पित करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी मी, उपमुख्यमंत्री व इतर मंत्री पाहणी करायला आलो आहोत.

शिंदे-फडणवीस यांच्याकडून बाळासाहेबांच्या स्मारकाची पाहणी, देवेंद्र फडणवीस म्हणतात,...
देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टचं सांगितलं Image Credit source: tv 9
Follow us
| Updated on: Nov 16, 2022 | 7:26 PM

मुंबई : दादर येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाची पाहणी केली. त्यानंतर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, बाळासाहेबांच्या स्मारकाचं काम ५० टक्के झालंय. पक्षाची कोणतीही मागणी नाही. बाळासाहेबांचं स्मारक हे जनतेचं स्मारक आहे. जनतेतंच राहणार आहे. त्याच्या मॅनेजिंग कमिटीत कोण आहे. कोण नाही याच्याशी काही देणंघेणं नाही. हे स्मारक तयार करण्यासाठी मी मुख्यमंत्री असताना कायदा करून ही जागा हँडओव्हर केली होती.

एमएमआरडीएतनं त्यावेळी आम्ही मान्यता दिली. एमएमआरडीतनं काम होईल, हे सांगितलं. त्याला निधी उपलब्ध करून दिला. त्यानंतर त्या विभागाची जबाबदारी एकनाथ शिंदे यांच्याकडं आली. त्यांनी त्याला निधी उपलब्ध करून देऊन कामाला गती दिली. त्यानंतर एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले. शिंदे हे मुख्यमंत्री असतानाचं या स्मारकाचं काम पूर्ण होणाराय. आम्हाला स्मारकाचं काम पूर्ण होऊन ते जनतेला समर्पित करण्यात रस आहे. त्या समितीत कोण आहे, त्यात आम्हाला काही रस नाही, असंही फडणवीस म्हणाले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक लोकांना समर्पित करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी मी, उपमुख्यमंत्री व इतर मंत्री पाहणी करायला आलो आहोत. पहिल्या टप्प्यात सिव्हिल वर्क ५० टक्केपेक्षा जास्त झाले. दुसऱ्या टप्प्याच्या आवश्यक बाबींची तयार सुरू आहे. लवकरात लवकर दुसरा टप्पा सुरू होईल. लाखो लोकांना प्रेरणा देणारा हा प्रकल्प आहे. जनतेला समर्पित करण्याचं आमचं काम आहे, असंही शिंदे यांनी सांगितलं.

आमची मध्यस्थी, भारत-पाकचा वाद अमेरिकेने मिटवला,ट्रम्प यांचा पुनरूच्चार
आमची मध्यस्थी, भारत-पाकचा वाद अमेरिकेने मिटवला,ट्रम्प यांचा पुनरूच्चार.
मुंबईचा पहिला केबल-स्टे उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला
मुंबईचा पहिला केबल-स्टे उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला.
भारतानं कबरडं मोडलं पाकिस्तान वठणीवर, संरक्षण मंत्र्याचं मोठं वक्तव्य
भारतानं कबरडं मोडलं पाकिस्तान वठणीवर, संरक्षण मंत्र्याचं मोठं वक्तव्य.
ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानचं मोठं नुकसान
ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानचं मोठं नुकसान.
चीनविरोधात मोठी भारताची अ‍ॅक्शन, तणावादरम्यान खोटा प्रचार करणं भोवलं
चीनविरोधात मोठी भारताची अ‍ॅक्शन, तणावादरम्यान खोटा प्रचार करणं भोवलं.
आयकर विभागाची विदर्भात मोठी कारवाई; सोनं-चांदीच्या दुकानांवर धाडसत्र
आयकर विभागाची विदर्भात मोठी कारवाई; सोनं-चांदीच्या दुकानांवर धाडसत्र.
जोरदार वारा, पावसाचा तडाखा; फळबागांना नुकसान
जोरदार वारा, पावसाचा तडाखा; फळबागांना नुकसान.
मराठी दाम्पत्यानं घातला डिलिव्हरी बॉय सोबत वाद, भांडूपमधला बघा VIDEO
मराठी दाम्पत्यानं घातला डिलिव्हरी बॉय सोबत वाद, भांडूपमधला बघा VIDEO.
सचिन अहीर पवारांच्या भेटीला अन् एकाच गाडीतून प्रवास, काय झाली चर्चा?
सचिन अहीर पवारांच्या भेटीला अन् एकाच गाडीतून प्रवास, काय झाली चर्चा?.
केंद्रीय कॅबिनेट बैठकीत ऑपरेशन सिंदूरवर चर्चा, सुत्रांची माहिती
केंद्रीय कॅबिनेट बैठकीत ऑपरेशन सिंदूरवर चर्चा, सुत्रांची माहिती.