Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी राज ठाकरे यांना बोलवले, उद्धव ठाकरे यांना ‘फुली’

ram mandir pran pratishtha | अयोध्या येथील श्रीराम मंदिरासाठी उद्धव ठाकरे यांचे योगदान काय आहे. घरात बसून भूमिका घेणे आणि प्रत्यक्ष कारसेवा करणे यात फरक आहे. राम मंदिरासाठी शिवसेना उबाठा पक्षाने एक कोटी रुपये दिले होते. परंतु राम मंदिरासाठी एक कोटी रुपये भरपूर लोकांनी दिले आहेत, असे गिरीश महाजन यांनी सांगितले.

राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी राज ठाकरे यांना बोलवले, उद्धव ठाकरे यांना 'फुली'
uddav and raj thackeray Image Credit source: TV9MARATHI
Follow us
| Updated on: Dec 26, 2023 | 1:32 PM

विनायक डावरूंग, मुंबई, दि.26 डिसेंबर | अयोध्येत श्रीराम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा २२ जानेवारी रोजी होणार आहे. या कार्यक्रमासाठी अयोध्येत जोरदार तयारी सुरु आहे. व्हीव्हीआयपी लोकांना निमंत्रण पाठवण्यात आले आहे. या सोहळ्याचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना निमंत्रण पाठवण्यात आले नाही. राज ठाकरे यांना मात्र निमंत्रण मिळाले आहे. त्यावरुन खासदार संजय राऊत सातत्याने टीका करत आहेत. त्यांच्या टीकेला राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी उत्तर दिले आहे. उद्धव ठाकरे हे साधे आमदार आहेत. केंद्राच्या व्हीव्हीआयपीच्या यादीत उद्धव ठाकरे नसतील. राज ठाकरे असतील. यामुळे राज ठाकरे यांना बोलावले असेल, असे गिरीश महाजन यांनी सांगितले आहे.

उद्धव ठाकरे यांचे योगदान काय?

अयोध्या येथील श्रीराम मंदिरासाठी उद्धव ठाकरे यांचे योगदान काय आहे. घरात बसून भूमिका घेणे आणि प्रत्यक्ष कारसेवा करणे यात फरक आहे. आम्ही वीस, वीस दिवस कारागृहामध्ये होतो. तेव्हा संजय राऊत आणि उद्धव ठाकरे कुठे होते? बाळासाहेब ठाकरे यांच्या भूमिकेबाबत दुमत नाही. मात्र जे बोलतायेत ते आयत्या बिळावरचे नागोबा आहेत. संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांनी कारसेवा केल्याचा एखादा फोटो दाखवावा, असे आव्हान गिरीश महाजन यांनी दिले. राम मंदिरासाठी शिवसेना उबाठा पक्षाने एक कोटी रुपये दिले होते. परंतु राम मंदिरासाठी एक कोटी भरपूर लोकांनी दिले आहेत, असे गिरीश महाजन यांनी सांगितले.

आम्ही टिकणारे आरक्षण देणार

मराठा समाजाला आम्ही आरक्षण देणारच आहोत. हे टिकणारे आरक्षण असणार आहे, हे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी वारंवार सांगितले आहे. या आधी आम्ही टिकणारे आरक्षण दिले होते. उच्च न्यायालयाने ते मान्य केले. परंतु सरकार बदलले उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले आणि सर्वोच्च न्यायालयात ते फेटाळले गेले. सर्वोच्च न्यायालयात क्युरेटीव्ही पिटीशनच्या माध्यमातून नवीन आशा निर्माण झाली आहे. त्यात आम्ही मराठा समाज कसा सामाजिक, शैक्षणिक दृष्ट्या मागास आहे, हे सिद्ध करणार आहोत, असे गिरीश महाजन यांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा

दोन्ही नेत्यांनी थांबावे

मनोज जरांगे पाटील आणि छगन भुजबळ यांच्यात ज्या पद्धतीने टीका, टीपणी चालू आहे, ती खालच्या भाषेत चालू आहे. मला वाटते हे कुठेतरी थांबले पाहिजे. दोन नेत्यांमधील वाद थांबला पाहिजे. समाज, समाजात दुफळी निर्माण होता कामा नये. छनग भुजबळ यांनाही मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी विनंती केली की आता हे थांबवा. मी ज्या दिवशी जरांगे पाटलांकडे गेलो त्यांनाही सांगितलं की आता हे थांबवा. पुन्हा शब्दाला शब्द होऊ नये, असे गिरीश महाजन यांनी सांगितले.

शिक्षकाने FB पोस्ट लिहिली अन् संपवलं आयुष्य, कारण ऐकून बसेल धक्का
शिक्षकाने FB पोस्ट लिहिली अन् संपवलं आयुष्य, कारण ऐकून बसेल धक्का.
निवडणूक हरलो, मंत्रिपद गेलं तरी चालेल, पण. ; गडकरींचा जातीयवादावर टोला
निवडणूक हरलो, मंत्रिपद गेलं तरी चालेल, पण. ; गडकरींचा जातीयवादावर टोला.
राऊतांकडून उदय सामंतांचं तोंडभरून कौतुक, 'त्यांचं अभिनंदन, कारण..'
राऊतांकडून उदय सामंतांचं तोंडभरून कौतुक, 'त्यांचं अभिनंदन, कारण..'.
बीडचा बिहार झालाय का? संतोष देशमुख हत्येची पुनरावृत्ती
बीडचा बिहार झालाय का? संतोष देशमुख हत्येची पुनरावृत्ती.
तुमच्या कारला फास्टटॅग आहे? असेल तर हा व्हिडीओ बघा, कारण 1 एप्रिलपासून
तुमच्या कारला फास्टटॅग आहे? असेल तर हा व्हिडीओ बघा, कारण 1 एप्रिलपासून.
'बीडमध्ये चाललंय काय? सरकार काय करतंय?' दमानियांच्या डोळ्यात अश्रू अन्
'बीडमध्ये चाललंय काय? सरकार काय करतंय?' दमानियांच्या डोळ्यात अश्रू अन्.
लोकलने आज प्रवास करताय? मध्य रेल्वेच्या मेनलाईनवर असा असणार मेगाब्लॉक
लोकलने आज प्रवास करताय? मध्य रेल्वेच्या मेनलाईनवर असा असणार मेगाब्लॉक.
देशात तणाव पसरवणंच त्यांच काम; संजय राऊतांचा हल्लाबोल
देशात तणाव पसरवणंच त्यांच काम; संजय राऊतांचा हल्लाबोल.
शिंदेंचे मंत्री जाहीरपणे म्हणाले, 'गुलाबराव पाटील गद्दार, पण जनतेनं..'
शिंदेंचे मंत्री जाहीरपणे म्हणाले, 'गुलाबराव पाटील गद्दार, पण जनतेनं..'.
खोक्याच्या कुटुंबाला मारहाण; 20 ते 25 जणांवर गुन्हा दाखल
खोक्याच्या कुटुंबाला मारहाण; 20 ते 25 जणांवर गुन्हा दाखल.