Mumbai Lockdown : .. तर मुंबईत लॉकडाऊन, पालिका आयुक्त इकबाल चहल यांनी अट सांगितली
मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबाल चहल (Iqubal Chahal) यांनी मुंबईतील वाढत्या कोरोना (Corona) रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन (Lockdown) मोठं वक्तव्य केलं आहे.
मुंबई: मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबाल चहल (Iqubal Chahal) यांनी मुंबईतील वाढत्या कोरोना (Corona) रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन (Lockdown) मोठं वक्तव्य केलं आहे. महापालिका कार्यक्षेत्रातील रुग्णांची दिवसभरातील संख्या 20 हजारांच्यावर गेल्यास मुंबईत लॉकडाऊन करावाचं लागेल, असं इकबाल चहल यांनी सांगितलं. एनडीटीव्ही या खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.
मुंबईत 3 जानेवारीला 8 हजार 82 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर, सोमवारी 622 रुग्ण बरे झाले आहेत. मुंबईतील वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर इकबाल चहल यांनी महत्वाचा इशारा दिला आहे. मुंबईतील रुग्णसंख्या अशीच वाढत राहून एका दिवसात 20 हजारांपेक्षा अधिक रुग्ण आढळून आल्यास लॉकडाऊन करावंच लागणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.
मुंबईत 30 हजार खाटा उपलब्ध
इकबाल चहल यांनी मुंबई महापालिका वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर सतर्क झाल्याचं सांगितलं. मुंबईचं कौतुक सर्व स्तरात झालं होतं. यामध्ये सर्वांचं योगदान होतं. मात्र, आता ओमिक्रॉन वाढत आहे. आता मुंबईचा कोरोना आकडा आठ हजारांवर गेला आहे. नागरिकांनी आपल्याला कोरोना पासून दूर कसं राहता येईल हे पाहावं, असं आवाहन इकबाल चहल यांनी केलं आहे. महापालिकेकडे 30 हजार पेक्षा जास्त खाटा सध्या उपलब्ध आहेत. तीन हजार खाटा सध्या भरलेल्या आहेत. औषधे आहेत व्हेंटीलेटर उपलब्ध आहेत सगळी तयारी आमची झालेली आहे, असंही ते म्हणाले.
मुंबई कोरोना अपडेट
#CoronavirusUpdates 3rd January, 6:00pm
Positive Pts. (24 hrs) – 8082 Discharged Pts. (24 hrs) – 622
Total Recovered Pts. – 7,51, 358
Overall Recovery Rate – 93%
Total Active Pts. – 37274
Doubling Rate – 138 Days Growth Rate (27 Dec – 2 Jan)- 0.50%#NaToCorona
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) January 3, 2022
मुंबईत ओमिक्रॉनचे नवे 40 रुग्ण
महाराष्ट्रातील ओमिक्रॉन बाधितांची संख्या 578 वर पोहोचली आहे. सकाळपर्यंतच्या माहितीनुसार 259 रुग्ण ओमिक्रॉन संसर्गातून बरे झाले आहेत. सोमवारी राज्यात 12 हजार 160 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. राज्यात 3 जानेवारीला ओमिक्रॉनचे 68 रुग्ण आढळले आहेत. मुंबई-40, पुणे-14 नागपूर- 4, पुणे ग्रामीण ,पनवेल प्रत्येकी 3 तर कोल्हापूर, नवी मुंबई, सातारा ,रायगड 1 रुग्ण, ही आजची आकडेवारी आहे. राज्यात आतापर्यंत 578 रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी 259 जणांना डिस्चार्ज मिळाला आहे.
राज्यात लॉकडाऊन कधी लागणार?
राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यात ज्या दिवशी 700 मेट्रिक टन ऑक्सिजन लागेल त्या दिवसापासून कठोर निर्बंध लागू करावे, लागतील असा इशारा दिला होता.
इतर बातम्या:
पिंपरी महानगरपालिकेची निवडणूक लवकरच ; या तारखेला प्रभागरचनेचा आराखडा निवडणूक आयोगाकडे सादर करणार
Pankaja Munde : पंकजा मुंडे यांना ओमिक्रॉनची लागण; ताई काळजी घ्या, धनंजय मुंडे यांचा मेसेज
Iqubal Chalal said if daily corona cases cross twenty thousand in city Lockdown will must imposed