ओबीसींमध्ये नवे प्रवर्ग शक्य आहे का?, ठाकरे, पवार, फडणवीस, चव्हाणांनी सांगावं; खासदार संभाजी छत्रपतींचं आवाहन

मराठा समाजाला ओबीसींमध्ये आरक्षण देण्याची अनेकांनी मागणी अनेक मराठा नेत्यांनी मागणी केली आहे. (is it possible to create new class in maratha reservation?, says Sambhaji Chhatrapati)

ओबीसींमध्ये नवे प्रवर्ग शक्य आहे का?, ठाकरे, पवार, फडणवीस, चव्हाणांनी सांगावं; खासदार संभाजी छत्रपतींचं आवाहन
Sambhaji Chhatrapati
Follow us
| Updated on: May 28, 2021 | 5:39 PM

मुंबई: मराठा समाजाला ओबीसींमध्ये आरक्षण देण्याची अनेकांनी मागणी अनेक मराठा नेत्यांनी मागणी केली आहे. त्यांची ही भूमिका असू शकते. पण ओबीसींमध्ये नवे प्रवर्ग करणे शक्य शक्य आहे का? हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, विरोधी पक्षनेते आणि मंत्री अशोक चव्हाण यांनीच सांगावं, असं आवाहन खासदार संभाजी छत्रपती यांनी केलं. (is it possible to create new class in maratha reservation?, says Sambhaji Chhatrapati)

भाजपचे खासदार संभाजी छत्रपती यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत संभाजी छत्रपती यांनी अत्यंत संतप्त भावना व्यक्त केल्या. तसेच मराठा आरक्षण टिकवण्यासाठी पर्यायही सांगितले. ओबीसीमध्ये नवीन प्रवर्ग तयार करणं शक्य आहे का? हे पाहावं. ते मी नाही सांगणार. ते राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगावं. वंचितांना आरक्षण मिळावं या मताचा मी आहे. शाहू महाराजांनी वंचितांना मुख्य प्रवाहात आणलं होतं. मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचीही भूमिका होती, असंही त्यांनी सांगितलं.

तीन पर्याय सत्ताधारी-विरोधकांना मान्य

मराठा आरक्षण टिकवण्यासाठी संभाजी छत्रपती यांनी सत्ताधारी आणि विरोधी पक्षांसमोर तीन पर्याय दिले आहेत. हे तिन्ही पर्याय त्यांनी मान्य केले आहेत. नंतर त्यांनी हे तीन पर्याय मान्य केले नाही तर त्याला तेच जबाबदार असतील असं ते म्हणाले. मराठा आरक्षण ही राज्य आणि केंद्राची जबाबदारी आहे. तुझं माझं करून चालणार नाही. इथं नवरा बायको म्हणूनच राहावं लागणार आहे. मराठा समाजाला न्याय द्यायचा असेल तर कुटुंबासारखं वागावं लागेल. आता शिवाजी महाराजांचे वंशज म्हणून व्हेटो काढावा लागेल. पण तो पूर्वीसारखा व्हेटो नसणार. तर व्हेटो म्हणजे गोड बोलून एकत्र येण्याचं काम करावं लागणार आहे, असं ते म्हणाले.

तीन पर्याय कोणते

पहिला पर्याय: राज्य सरकारने तात्काळ रिव्ह्यू पिटीशन दाखल करावी. हा राज्य सरकारचाच विषय.

दुसरा पर्याय: रिव्ह्यू पिटीशन टिकलं नाही तर क्युरिटिव्ह पिटीशन दाखल करावी. हा शेवटचा पर्याय आहे. पण हा पर्याय अपवादात्मक आहे. त्यासाठी भक्कम पुरावे घेऊनच कोर्टात जावं लागणार आहे.

तिसरा पर्याय: ‘342 अ’ च्या माध्यमातून आपण प्रपोजल केंद्राकडे देऊ शकतो. राज्यपालांच्या माध्यमातून ते राष्ट्रपतींकडे जाणार. राष्ट्रपतींना योग्य वाटलं तर ते केंद्रीय मागासवर्ग आयोगाकडे देतील. त्यांना योग्य वाटलं तर ते संसदेकडे पाठवतील. (is it possible to create new class in maratha reservation?, says Sambhaji Chhatrapati)

संबंधित बातम्या:

मुख्यमंत्री भेटेनात, आमदार रवी राणांनी उद्धव ठाकरेंच्या केबिनला निवेदन चिटकवलं

Maharashtra News LIVE Update | ज्या आशेने आलोय, त्या दिशेने सर्व सुरु : संभाजीराजे

जालनाच्या ‘त्या’ अमानुष मारहाणीबद्दल देवेंद्र फडणवीसांचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र

(is it possible to create new class in maratha reservation?, says Sambhaji Chhatrapati)

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.