Nagar Panchayat Election result 2022: मुख्यमंत्रीपद असूनही शिवसेना चौथ्या नंबर वर कशी? आघाडीत शिवसेना हळूहळू आकूचन पावतेय? भाजपला संधी?

राज्यातील नगरपंचायत आणि जिल्हा परिषदेचे निकाल हाती आले आहेत. भाजपने सर्वाधिक नगर पंचायती जिंकतानाच नगरपंचायतीतील सदस्य संख्येतही भाजप नंबर वन ठरला आहे.

Nagar Panchayat Election result 2022: मुख्यमंत्रीपद असूनही शिवसेना चौथ्या नंबर वर कशी? आघाडीत शिवसेना हळूहळू आकूचन पावतेय? भाजपला संधी?
cma uddhav thackeray
Follow us
| Updated on: Jan 19, 2022 | 5:24 PM

मुंबई: राज्यातील नगरपंचायत आणि जिल्हा परिषदेचे निकाल हाती आले आहेत. भाजपने सर्वाधिक नगर पंचायती जिंकतानाच नगरपंचायतीतील सदस्य संख्येतही भाजप नंबर वन ठरला आहे. विशेष म्हणजे गेल्या राज्याचं मुख्यमंत्रीपद आपल्याकडे असूनही शिवसेनेला आपला दबदबा निर्माण करता आलेला नाही. विदर्भात तर शिवसेनेला काही ठिकाणी खातेही खोलता आले नाही. त्यामुळे शिवसेना हळूहळू अंकूचन पावतेय का? भाजपला आगामी काळात राज्यात संधी आहे का? अशी चर्चा सुरू झाली आहे.

आकडेवारी काय सांगते?

राज्यात 2017मध्ये भाजपकडे नगरपंचायतीत 344 सदस्य होते. हा आकडा वाढून 417 झाला आहे. शिवसेनेकडे 201 सदस्य होते. त्यांचाही आकडा वाढून 290 झाला आहे. काँग्रेसची सदस्य संख्या मात्र प्रचंड घटली आहे. राष्ट्रवादीकडे 426 सदस्य होते. ही संख्या 299 झाली आहे. तर राष्ट्रवादीकडे 330 सदस्य होते. ही संख्या 369 झाली आहे. या आकडेवारीनुसार भाजप राज्यातील नंबर एकचा पक्ष ठरला आहे. तर काँग्रस दुसऱ्या, शिवसेना तिसऱ्या आणि राष्ट्रवादी चौथ्या क्रमांवर फेकला गेला. विशेष म्हणजे तिन्ही पक्षांची अनेक ठिकाणी युती होती. काही ठिकाणी अंडरस्टँडीग होती. तरीही भाजप नंबर वन ठरला. तर मुख्यमंत्रीपद स्वत:कडे असणाऱ्या शिवसेनेला आपला करिश्मा दाखवता आलेला नाही.

34 नगरपालिका– नगरपंचायतींमध्ये भाजपाची सत्ता?

भाजपाला या निवडणुकीत 400 पेक्षा जास्त जागा मिळाल्या आहेत. स्वबळावर किंवा काही मदत घेऊन 34 नगरपालिका – नगरपंचायतींमध्ये भाजपाची सत्ता येण्याची शक्यता आहे. गोंदिया जिल्हा परिषदेत भाजपाची सत्ता असेल तर भंडारा जिल्हा परिषदेत मदत घेऊन भाजपा सत्तेवर येणार आहे. त्या तुलनेत शिवसेना कुठेच दिसत नसल्याचं दिसून येत आहे.

विदर्भात शिवसेना पराभूत

विदर्भातही शिवसेनेला चांगली कामगिरी करता आलेली नाही. गोंदिया जिल्हा परिषदेत तर शिवसेनेला खातंही खोलता आलं नाही. या जिल्हा परिषदेत चाबी संघटनेला तीन जागा मिळाल्या. पण शिवसेनेला एकही जागा मिळाली नाही. गोंदियात सर्वाधिक जागा जिंकून भाजप नंबर वन पक्ष ठरला आहे.

फडणवीसांचा दावा काय?

राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या निकालावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मविआ सरकारकडून धनशक्ती, दंडशक्ती, सत्तेचा कितीही गैरवापर झाला तरी भाजपा हा क्रमांक एकचा पक्ष होता-राहील. भाजपाच्या 24 आणि सहयोगी मिळून सर्वाधिक 30 नगरपालिकांमध्ये भाजपाने सत्ता प्राप्त केली आहे. सदस्यसंख्येत सुद्धा सर्वाधिक 415 हून अधिक जागा जिंकत भाजपा हाच क्रमांक एकचा पक्ष बनला आहे, असं ट्विट फडणवीस यांनी केलं आहे.

चंद्रकांतदादांचं भाकीत खरं ठरणार?

राज्यातील विधानपरिषद, विधानसभा पोटनिवडणुका, ग्रामपंचायत, नगरपंचायत निवडणुकांच्या प्रत्येक निकालावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेला डिवचलं आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी मिळून शिवसेनेला संपवत आहेत. शिवसेनेने हे समजून घ्यावं, असं भाकीत चंद्रकांत पाटील यांनी वारंवार वर्तवलं आहे. आजच्या निकालातही शिवसेना अंकूचन पावत असल्याचं दिसून येत असल्याने चंद्रकांत पाटलांचं भाकीत वर्तवलं होतं. हे भाकीत खरं ठरणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

संबंधित बातम्या:

नगर पंचायत निवडणूक निकालावर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, भाजपच क्रमांक एकचा पक्ष असल्याचा दावा

Nagar Panchayat Election Results 2022 LIVE : जळगाव बोदवड नगरपंचायतीवर शिवसेनेचा भगवा

सोन्याचे भाव उतरु शकतात पण त्यासाठी ‘या’ निर्णयाची गरज

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.