मुनगंटीवार संतापाच्या भरात देशमुखांना म्हणाले; तुम्ही गृहमंत्री असूनही त्याचा खूनच केला असता

सध्या या प्रकरणात संबंधित लोकांचे जबाब नोंदवण्याचे काम सुरु आहे. अहवाल आल्यानंतर लगेचच कठोर कारवाई केली जाईल, असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले. | Sudhir Mungantiwar Anil Deshmukh

मुनगंटीवार संतापाच्या भरात देशमुखांना म्हणाले; तुम्ही गृहमंत्री असूनही त्याचा खूनच केला असता
इतक्या घृणास्पद घटनेनंतरही राज्य सरकार फक्त नोंद घेऊ म्हणते. विरोधी पक्षातील आमदार काय मेलेल्या मनाचे आहेत का? आमचं मन जिवंत आहे. तुमच्या तळपायाची आग मस्तकात गेली पाहिजे.
Follow us
| Updated on: Mar 04, 2021 | 12:34 PM

मुंबई: जळगाव वसतीगृहातील प्रकारावरुन अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी सभागृहात विरोधक आक्रमक होताना दिसले. भाजप नेते सुधीर मुनंगटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी आक्रमक भाषेत गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी लक्ष्य केले. जळगावातील वसतीगृहात पोलिसांकडून मुलींना नग्न करुन नाचायला लावण्यात आले. या जागी तुमची किंवा माझी बहीण असती तर हा केवळ विचार करुन पाहा. तुम्ही गृहमंत्री असलात तरी असा प्रकार झाला असता तर तुम्ही खूनच केला असता, असे सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले. (BJP leader Sudhir Mungantiwar slams HM Anil Deshmukh)

इतक्या घृणास्पद घटनेनंतरही राज्य सरकार फक्त नोंद घेऊ म्हणते. विरोधी पक्षातील आमदार काय मेलेल्या मनाचे आहेत का? आमचं मन जिवंत आहे. तुमच्या तळपायाची आग मस्तकात गेली पाहिजे. अशा प्रकारानंतर किती तासात संबंधितांवर कारवाई करणार, किती तासात करणार, हे सरकारने सांगायला पाहिजे. हे पाप तुम्हाला फेडावे लागेल, अशी टीका सुधीर मुनगंटीवार यांनी केली.

गृहमंत्री काय म्हणाले?

सध्या या प्रकरणात संबंधित लोकांचे जबाब नोंदवण्याचे काम सुरु आहे. अहवाल आल्यानंतर लगेचच कठोर कारवाई केली जाईल, असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले.

मुनगंटीवारांकडून राष्ट्रपती राजवटीचा पुनरुच्चार

गृहमंत्र्यांच्या या उत्तरावर सुधीर मुनगंटीवार यांनी हल्लाबोल गेला. आम्ही कारवाई करु, असे सांगायला ही घटना काही पाच मिनिटांपूर्वी घडलेली नाही. घटना होऊन बरेच तास उलटून गेले आहेत. त्यानंतरही पोलिसांकडून चौकशी होत नाही. अशी परिस्थिती राहिली तर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू व्हावी, अशी मागणी मला करावी लागेल, असे सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

आमदार श्वेता महाले आक्रमक

दरम्यान, भाजप आमदार श्वेता महाले यांनीही याप्रकरणी आक्रमक पवित्रा घेतला आहे. “जळगावमध्ये अतिशय निंदनीय घटना घडली आहे. जळगावच्या आशादीप वसतिगृहात अशी घटना घडणे खूप चुकीचं आहे. कर्मचाऱ्यांकडून मुलींना कपडे काढून नाचायला सांगतात हे अतिशय निंदनीय आहे आणि त्यांच्यावर कडक कारवाई व्हावी. हे कृत्य करायला नकार देणाऱ्या महिलांना मारझोड केली जाते. या आरोपींवर कडक कारवाई करावी आणि सरकारने दखल घ्यावी. आपली सुरक्षा करणाऱ्या लोकांकडून अशी घटना होते ते खूप दुर्दैवी आहे” असं आमदार श्वेता महाले म्हणाल्या.

शासकीय आशादीप महिला वसतिगृहातील प्रकार

जळगावमधील शासकीय आशादीप महिला वसतिगृहात तरुणींना कपडे काढून नृत्य करायला भाग पाडल्याचा आरोप केला जात आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडे या कृत्याचा व्हिडीओही सादर केला. जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी तातडीने दखल घेऊन या प्रकरणाची चौकशी करण्याचे आश्वासन दिले.

संबंधित बातम्या

(BJP leader Sudhir Mungantiwar slams HM Anil Deshmukh)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.