AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Corona | लॉकडाऊनमुळे मुलाचं लग्न साधेपणाने, बचत झालेल्या पैशातून हवालदाराकडून सहकाऱ्यांना सॅनिटायझर वाटप

कोरोनाचा प्रादुर्भाव पाहाता जे जे मार्ग पोलीस स्टेशनमधील हवालदार बागी यांनी आपल्या सहकाऱ्यांना सॅनिटायझर वाटप केलं.

Corona | लॉकडाऊनमुळे मुलाचं लग्न साधेपणाने, बचत झालेल्या पैशातून हवालदाराकडून सहकाऱ्यांना सॅनिटायझर वाटप
| Updated on: Jun 05, 2020 | 10:12 PM
Share

मुंबई : मुंबईत पोलीस हवालदाराने मुलाच्या लग्नाच्या (Police Constable Distribute Sanitizer To Colleagues) पैशातून सहकाऱ्यांना सॅनिटायझर वाटप केलं आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव पाहाता जे जे मार्ग पोलीस स्टेशनमधील हवालदार बागी यांनी आपल्या सहकाऱ्यांना सॅनिटायझर (Police Constable Distribute Sanitizer To Colleagues) वाटप केलं.

पोलीस हवालदार बागी हे जे जे मार्ग पोलीस स्टेशनमध्ये नियुक्त आहेत. त्यांचा मुलगा पवन बागी याचं लग्न ठरलं होतं. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या देशात लॉकडाऊन आहे. यामुळे मोठ्या स्वरुपात लग्न समारंभ करणं शक्य नव्हतं. यामुळे पवनचा विवाह अत्यंत साधेपणाने आणि कमी लोकांच्या उपस्थितीत पार पडला. साधेपणाने लग्न केल्याने दोन्ही पक्षाच्या  पैशांची बचत झाली.

जे जे मार्ग पोलीस स्टेशनमधील 40 पोलिसांना कोरोना

जे जे मार्ग पोलीस स्टेशनमध्ये काही दिवसांपूर्वी सुमारे 40 च्यावर पोलिसांना कोरोनाची लागण झाली होती (Police Constable Distribute Sanitizer To Colleagues). आता त्यांच्यापैकी अनेक जण बरे झाले आहेत. मात्र, अजूनही काही पोलिसांवर उपचार सुरु आहेत.

कोरोनावर सध्या औषध नाही. त्यामुळे काळजी घेणं जास्त आवश्यक आहे. त्यासाठी सतत हात स्वच्छ करत राहणं हा त्यावरील महत्त्वाचा उपाय आहे. त्यामुळे बागी यांनी लग्नाच्या खर्चातून बचत झालेल्या पैशातून सुमारे 10 हजार रुपयांच सॅनिटायझर विकत घेतलं आणि ते आपल्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना भेट दिलं. हे सॅनिटायझर जे जे मार्ग पोलीस स्टेशन मधील सर्वांना वाटलं जाणार (Police Constable Distribute Sanitizer To Colleagues) आहे.

संबंधित बातम्या :

लॉकडाऊनदरम्यान रस्त्यावर प्लास्टिकच्या बाटल्यांचा खच, नाशिकच्या पोलीस पठ्ठ्याने बाटलीतून बाग फुलवली

राज्यातील पोलीस दलाला कोरोनाचा विळखा, तब्बल 1421 पोलिसांना कोरोनाची तीव्र लक्षण

राज्यात अत्यावश्यक सेवेसाठी 4 लाख 40 हजार पास वाटप, तर 5 लाख 92 हजार नागरिक क्वारंटाईन

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.