Jayashree Patil : जयश्री पाटील यांना मोठा दिलासा, 29 एप्रिलपर्यंत अटकेपासून संरक्षण

वकील गुणरत्न सदावर्तेंच्या पत्नी जयश्री पाटील यांना कोर्टाने दिलासा दिला आहे. त्यांना 29 एप्रिलपर्यंत अटकेपासून संरक्षण देण्यात आलं आहे. एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन भडकण्यात सहभाग असणे आणि कर्मचाऱ्यांकडून पैसे घेतल्याच्या आरोपात त्यांच्यावर गुन्ह दाखल झाला आहे.

Jayashree Patil : जयश्री पाटील यांना मोठा दिलासा, 29 एप्रिलपर्यंत अटकेपासून संरक्षण
सदावर्तेंच्या पत्नी जयश्री पाटील यांना कोर्टाचा दिलासा
Follow us
| Updated on: Apr 18, 2022 | 6:04 PM

मुंबई : वकील गुणरत्न सदावर्तेंच्या (Gunratna Sadavarte) पत्नी जयश्री पाटील (Jayshree Patil) यांना कोर्टाने दिलासा दिला आहे. त्यांना 29 एप्रिलपर्यंत अटकेपासून संरक्षण देण्यात आलं आहे. एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन (St Worker Protest) भडकण्यात सहभाग असणे आणि कर्मचाऱ्यांकडून पैसे घेतल्याच्या आरोपात त्यांच्यावर गुन्ह दाखल झाला आहे. जेव्हापासून हे एसटी कर्मचाऱ्यांचं आक्रमक आंदोलन शरद पवारांच्या घराबाहेर पार पडलं आहे, तेव्हापासून गुणरत्न सदावर्ते आणि त्यांच्या पत्नी जयश्री पाटील यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. सदावर्तेंच्या घराच्या छतावर जी मिटिंग झाली त्या मिटिंगला जयश्री पाटील या उपस्थित होत्या, तसेच एसटी कर्मचाऱ्यांकडून पैसे घेण्यातही त्यांचा सहभाग आहे, त्यामुळे त्यांना सहआरोपी करावे आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी सरकारी वकिलांनी कोर्टात केली होती. त्यानंतर गावदेवी पोलीस ठाण्यात जयश्री पाटलांवर गुन्हा दाखल झाला आहे.

कोर्टाकडून तुर्तास दिलासा

एसटी कर्मचाऱ्यांच्या आदोलनाच्या कटात सहभागी असल्याप्रकरणी आणि पैसे घेतल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर जयश्री पाटील काही काळ फरार असल्याच्याही चर्चा होत्या. त्यानंतर त्यांनी अटपूर्व जामीनासाठी थेट कोर्टात धाव घेतल्याची माहिती समोर आली आहे. आणि याच प्रकरणात आता कोर्टाने त्यांना तुर्तास दिलासा दिला आहे.

गुणरत्न सदावर्तेंना 14 दिवसांची कोठडी

जयश्री पाटील यांचे पती गुणरत्न सदावर्ते यांच्या साताऱ्यातील प्रकरणावरही सुनावणी पार पडली आहे. मराठा आंदोलनावेळी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी सध्या गुणरत्न सदावर्ते सातारा पोलिसांच्या ताब्यात आहे. आज त्यांची कोठडी संपल्याने त्यांना सातारा पोलिसांनी त्यांना न्यायालयात हजर केले होते. त्यानंंतर साताऱ्यातील कोर्टाने त्यांना 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत धाडलं आहे. आता सदावर्तेंचा या प्रकरणात जामीन मागण्याचा अर्जही मोकळा झाला आहे.

पवार कुटुंब आणि सरकारवर सदावर्तेंचे गंभीर आरोप

एसटी कर्मचाऱ्यांची बाजू गुणरत्न सदावर्ते कोर्टात मांडत होते. पाच महिने चाललेल्या या आंदोलनादरम्यान सदावर्ते हे सतत शरद पवार आणि अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप करत होते. त्यांनी केलेल्या टीकेमुळेच एसटी कर्मचारी भडकले असेही आरोपात म्हटलं गेलं आहे. मात्र पवार कुटुंबियांची आणि सरकारमधील मंत्र्यांची भ्रष्टाचाराची प्रकरणं बाहेर काढली म्हणून आता सरकार बदल्याच्या भावनेतून मला अडकवत आहे. माझ्या जिवाला काही झालं तर त्याला शरद पवार जबाबदार असतील असा आरोपही सदावर्ते आणि त्यांच्या कुटुंबियांकडून करण्यात आला आहे.

Jayant Patil: आपली ताकद प्रचंड आहे, आपण भिडलो तर विरोधकांचा टिकाव लागणार नाही: जयंत पाटील

Sanjay Raut : आता संयम संपला, मुख्यमंत्री, गृहमंत्री एक्शन मोडमध्ये, राऊतांचा भाजपला थेट इशारा

Raju Shetty : ऊस शेतीवर शरद पवारांनी बोलनं हे अत्यंत दुर्दैवी; राजू शेट्टींचे शरद पवारांना प्रत्युत्तर

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.