ढगांच्या गर्दीत देवीचं दर्शन, निसर्गाचा आविष्कार जयदेव ठाकरेंच्या पत्नीच्या कॅमेऱ्यात कैद
फोटो कॅमेऱ्याची नजर जे पाहू शकते, ते कदाचित तुम्ही आम्ही त्या नजरेने पाहू शकत नाही. निसर्गाचा अविष्कार आपल्या कॅमेऱ्यात कैद केलाय जयदेव ठाकरे (Jaydev Thackeray) यांच्या पत्नी अनुराधा (Anuradha) यांनी.
मुंबई : मुंबईसह महाराष्ट्रात मान्सूनच्या सरी (Monsoon) कोसळत आहेत. हवामान विभागाच्या माहितीनुसार 9 जूनपर्यंत मान्सूनने 80 टक्के महाराष्ट्र व्यापला. मुंबईत (Mumbai Rains ) तर काल पहाटेपासून दिवसभर जोरदार पाऊस बरसला. खऱ्या अर्थाने पावसाळा सुरु झाल्याचं चित्र पाहायला मिळालं. पावासाळा आणि आल्हाददायक वातावरणात आता निसर्गाचे अनेक फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळतील.
फोटो कॅमेऱ्याची नजर जे पाहू शकते, ते कदाचित तुम्ही आम्ही त्या नजरेने पाहू शकत नाही. कारण आपल्या आजूबाजूला आपण उघड्या डोळ्यांनी पाहात असलेलं चित्र जेव्हा कॅमेऱ्यात कैद केलं जातं, तेव्हा आपल्याला त्याची खरी किंमत, खरा अविष्कार लक्षात येतो. असाच निसर्गाचा अविष्कार आपल्या कॅमेऱ्यात कैद केलाय जयदेव ठाकरे (Jaydev Thackeray) यांच्या पत्नी अनुराधा (Anuradha) यांनी.
हा फोटो श्री.जयदेव ठाकरे यांनी आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे यांना पाठवला. त्यानंतर दिनेश दुखंडे यांनी जयदेव यांना लगेच फोन लावला. तेंव्हा त्यांनी आमच्या प्रतिनिधीला सांगितले की, “हे ढगदर्शन माझी सौभाग्यवती अनुराधा हिला परवा (मंगळवार) सायंकाळी ७.१२ वाजता महालक्ष्मी मंदिरामागे आकाशात घडले. परवा ती या अद्भुत/दुर्लभ ढग दर्शनाने फारच भारावून गेली होती. त्वरित तिने फोटो काढून मला (जयदेव) पाठवला आणि म्हणाली,अहो! आज मला साक्षात देवीचे दर्शन झाले.परंतु कामात थोडा व्यस्त असल्याने आज मी सर्व जवळच्या मित्रांना हे दुर्लभ दर्शन पाठवले.
संबंधित बातम्या
Video: कोकण किनारपट्टीवर आज अमावस्येचं पहिलं उड्डाण, साडे तीन मीटरहून अधिक उंचीच्या लाटा उसळणार!