तो काय खूप मोठा डायरेक्टर फायरेक्टर नाही, ऐतिहासिक चित्रपटावर राष्ट्रवादीच्या नेत्याची भूमिका काय
ऐतिहासिक घटनांवर चित्रपट दाखवत असताना इतिहासाचे विकृतीकरण होता कामा नये अशी आमची ठाम भूमिका असल्याचे जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले.
मुंबईः राज्यात सध्या वेगवेगळ्या गोष्टीवरुन राजकारण तापले आहे. मागील गेल्या काही दिवसापासून हर हर महादेव या चित्रपटावरून प्रचंड वाद झाला होता. छत्रपती शिवाजी महाराज यांचे विकृतीकरण केले जात असून हे थांबवणे गरजेचे असल्याचे मत वेगवेगळ्या संघटनाकडून येत होते. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी या चित्रपटाविषयी मत व्यक्त करताना त्यांनी इतिहास आणि चित्रपट दिग्दर्शक आणि चित्रपट परीक्षण मंडळावर ताशेरे ओढले आहेत.
हर हर महादेव या चित्रपटाविषयी मत व्यक्त करतान ते म्हणाले की, हर हर महादेव चित्रपटात विकृतीकरण केले गेले आहे. त्यामुळे या विकृतीकरणाला आमचा विरोध कायम असणार आहे. हर हर चित्रपटात दाखवण्यात आलेला मावळा हा केसे वाढलेला दाखवण्यात आला आहे.
मात्र हे शिवकालीन इतिहासाचे विकृतीकरण केले आहे. त्यामुळे हा चित्रपट दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी जरी बनविला असला तरी ते काही वरून पडले नाहीत आणि ते काही फार मोठे दिग्दर्शक वगैरे आहेत अशातलाही भाग नाही असा टोलाही त्यांनी दिग्दर्शक महेश मांजरेकर यांना लगावला आहे.हर हर महा
देव चित्रपटाविषयी मत व्यक्त करताना ते म्हणाले की, अशा प्रकारचे ऐतिहासिक चित्रपट बनवताना आणि त्याचे चित्रपट परीक्षण मंडळाकडून तो प्रदर्शित करण्यासाठी मान्यता देण्याअगोदर त्यांच्यातील समितीमध्ये संबंधित विषयातील तज्ज्ञ असले पाहिजेत अशीही मागणी करण्यात आली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी चित्रपट निर्मिती करताना इतिहासातील वापरलेले संदर्भ आणि चित्रपटातून दाखवण्यात आलेले चित्रीकरण यामध्ये साम्य असले पाहिजे. चित्रपट आहे म्हणून तुम्ही पाहिजे त्या गोष्टी प्रेक्षकांच्या माथी मारू नका असा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे.