कोर्टाने कपडे काढले, आता फक्त एक्सरे बाकी, जितेंद्र आव्हाड असे का म्हणालेत?

आमची जशी वज्रमूठ एक होती तशीच राहील. महाविकास आघाडी एकत्र आहेत. आम्हाला भीती नाही, असंही जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं.

कोर्टाने कपडे काढले, आता फक्त एक्सरे बाकी, जितेंद्र आव्हाड असे का म्हणालेत?
Follow us
| Updated on: May 12, 2023 | 3:33 PM

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने काल सत्ता संघर्षावरील निकाल दिला. जो तो आपआपल्या पद्धतीने या निकालाचे विश्लेषण करत आहे. यासंदर्भात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी मोठी प्रतिक्रिया दिली. जितेंद्र आव्हाड म्हणाले, सुप्रीम कोर्टाने सर्व कपडे काढून टाकलेत. आता फक्त एक्सरे करणे बाकी राहिले आहे. किती दिवसात पोपट मेल्याचे जाहीर करायचे, एवढं बाकी राहिले आहे. हा निकाल आमच्या बाजूने हे त्यांना सांगावे लागत आहे, असा टोला जितेंद्र आव्हाड यांनी लगावला.

जास्तीत जास्त ते काय करतील?

जितेंद्र आव्हाड म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाचा निकाल स्पष्ट आहे. सुप्रीम कोर्टाने जे सांगितले ते देखील स्पष्ट आहे. पोलीस अधिकाऱ्यांना नोकरासारखे वागवतात. जास्तीत जास्त केसेस टाकतील. दुसरे ते काही करु शकत नाही. तुरुंगात टाकतील ते त्यापेक्षा जास्त काय करतील.

हे सुद्धा वाचा

महाविकास आघाडी एकत्र आहे

सरकार काय करू शकते. फक्त खोट्या केसेस करू शकते. त्या व्यतिरिक्त सरकार काय करू शकते. चार दिवस सरकार जेलमध्ये टाकू शकते. त्याव्यतिरिक्त काय होऊ शकते, असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी विचारला. आमची जशी वज्रमूठ एक होती तशीच राहील. महाविकास आघाडी एकत्र आहेत. आम्हाला भीती नाही, असंही जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं.

उद्धव ठाकरे यांनी सत्तेला लाथ मारली

राज्यातील जनतेला सांगायचे आहे की सत्ता कुणी सोडत नाही. सत्तेसारखा नाद कुठलाच नाही. सत्तेतून बाहेर पडणे याला नैतिक बळ लागते. आजही मला उद्धव ठाकरे यांचे कौतुक वाटते की त्यांनी सत्तेला लाथ मारली.

पानावर दिलेले वाचायचे असते

राज्यपालांना सुप्रीम कोर्टाने जे रुल बुक दिले आहे त्यानुसार काम करावं लागतं. पानावर लिहिलेलं वाचायचं असते आणि कारवाई करायची असते. त्या माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे कपडे कोर्टाने फाडले. त्या नालायक माणसाला तिकडे बसवलं होते, असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला.

याला नैतिकता म्हणायची काय?

कुठलेही सरकार निवडून आले तर दोन चार कोटी रुपये देऊन पाडून टाकायचे. याला नैतिकता म्हणायची काय, असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी देवेंद्र फडणवीस यांना विचारला. काल सकाळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे 200 च्या स्पीडने बॉलिंग करत होते. आज 10 च्या स्पीडने बोलले. ते थकलेलं वाटले, असा टोलाही जितेंद्र आव्हाड यांनी लगावला.

पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.