AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हजारोंच्या गर्दीतून मौलाना अजहरीला घेऊन गुजरात ATS जुनागढला रवाना, घाटकोपरमध्ये काय घडलं?

junagadh hate speech case : मुफ्ती सलमान यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी जोरदार प्रदर्शन केलं. त्यामुळे वाहतुकीला सुद्धा बाधा निर्माण झाली. स्वत: मौलाना सलमान अजहरी यांना उपस्थित जमावाची समजूत काढावी लागली. समर्थक ऐकले नाहीत, तेव्हा पोलिसांनी बळाचा वापर केला. त्यानंतर थोडीशी गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती.

हजारोंच्या गर्दीतून मौलाना अजहरीला घेऊन गुजरात ATS जुनागढला रवाना, घाटकोपरमध्ये काय घडलं?
maulana salman azhari detained
Follow us
| Updated on: Feb 05, 2024 | 8:06 AM

junagadh hate speech case : गुजरात पोलिसांनी रविवारी मुंबईत राहणारा इस्लामिक उपदेशक मौलाना सलमान अजहरीला ताब्यात घेतलं. गुजरातच्या जुनागढमध्ये प्रक्षोभक भाषण केल्याचा अजहरी यांच्यावर आरोप आहे. मुंबई पोलिसांनी मौलाना आणि अन्य दोघांविरोधात आयपीसीच्या कलम 153(सी), 505(2), 188 आणि 114 अंतर्गत गुन्हा नोंदवलाय. सलमान अजहरी यांना घाटकोपर पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आलं होतं. सलमान अजहरी यांना पोलीस स्टेशनमध्ये आणल्याच समजताच त्यांचे हजारो समर्थक सुटकेची मागणी करण्यासाठी घाटकोपर पोलीस स्टेशनबाहेर जमले. त्यामुळे परिसरातील वाहतुकीवर परिणाम झाला. पोलिसांनी सुरक्षा बंदोबस्त वाढवला.

या दरम्यान मौलाना सलमान अजहरी यांनी पोलीस स्टेशनबाहेर जमलेल्या आपल्या समर्थकांना कायदा-सुव्यवस्था कायम राखण्याच आवाहन कराव लागलं. मौलानाने घाटकोपर पोलीस स्टेशनबाहेर जमलेल्या गर्दीला माइकवरुन संबोधित केलं. ते म्हणाले की, “मी गुन्हेगार नाहीय. मला कुठल्या गुन्ह्यासाठी इथे आणलेलं नाहीय. ते आवश्यक चौकशी करतायत आणि मी त्यांना सहकार्य करतोय. माझ्या नशिबात लिहील असेल, मला अटक झाली, तर त्यासाठी सुद्धा मी तयार आहे” मौलान अजहरीला दोन दिवसांचा ट्रांजिट रिमांड देण्यात आला आहे. गुजरात पोलीस त्यांना घेऊन जुनागढला रवाना झाले आहेत.

अजून कोणाला अटक?

मौलाना सलमान अजहरीच्या प्रकरणात गुजरात पोलिसांनी भारतीय दंड संहिता (IPC) कलम 153 बी आणि 505 (2) अंतर्गत मोहम्मद यूसुफ मालेक आणि अजीम हबीब या दोन स्थानिक आयोजकांना अटक केलीय. मुफ्ती अजहरी यांच्यावर मागच्या बुधवारी जुनागढ येथे एका कार्यक्रमात आपत्तीजनक भाषण दिल्याचा आरोप आहे.

इस्लामिक उपदेशकाच्या वकिलाने काय सांगितलं?

मुफ्ती अजहरी यांच्या भाषणाचा व्हिडिओ शनिवारी इंटरनेटवर व्हायरल झाला. त्यानंतर पोलिसांनी जुनागढमधील कार्यक्रमाच्या आयोजकांना अटक केली. मौलानाला पकडण्यासाठी शोध मोहिम सुरु झाली होती. अजहरी यांच्या भाषणातून धर्म आणि नशामुक्तीबद्दल जागरुकता होईल, असं सांगून आयोजकांनी कार्यक्रमाला परवानगी मागितली होती. पण येथील भाषणात त्यांनी प्रक्षोभक शब्दांचा वापर केला. मौलाना अजहरीच्या वकीलांनी ANI शी बोलताना सांगितलं की, ‘इस्लामिक उपदेशक चौकशीत सहकार्य करायला तयार आहे’

जळगाव हादरलं! मुलीने प्रेमविवाह केला म्हणून बापानेच घेतला लेकीचा जीव
जळगाव हादरलं! मुलीने प्रेमविवाह केला म्हणून बापानेच घेतला लेकीचा जीव.
एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग
एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग.
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी.
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा.
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त.
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती.
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव.
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट.
'काही लोक घरातून बाहेर पडले की..', नाव न घेता शिंदेंचा ठाकरेंना टोला
'काही लोक घरातून बाहेर पडले की..', नाव न घेता शिंदेंचा ठाकरेंना टोला.
'१३० अण्वस्त्रे फक्त भारतासाठी..', पाकिस्तानची पुन्हा एकदा डरपोक्ती
'१३० अण्वस्त्रे फक्त भारतासाठी..', पाकिस्तानची पुन्हा एकदा डरपोक्ती.