Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IT Raids Kalpataru Group : कल्पतरु समूहाला आयकर खात्याचा दणका! इतक्या ठिकाणी छापे

IT Raids Kalpataru Group : कथित शेकडो कोटींच्या निधीचा गैरव्यहार प्रकरणात कल्पतरु समूहाला आयकर खात्याने दणका दिला. समूहाच्या अनेक कार्यालयावर, संचालकांच्या घरावर छापे टाकण्यात आले. समूहाच्या चार कंपन्या प्राप्तिकर खात्याच्या रडारवर होत्या.

IT Raids Kalpataru Group : कल्पतरु समूहाला आयकर खात्याचा दणका! इतक्या ठिकाणी छापे
Follow us
| Updated on: Aug 05, 2023 | 3:12 PM

नवी दिल्ली | 05 ऑगस्ट 2023 : कल्पतरु समूहाला सकाळीच आयकर खात्याने दणका दिला. कथित कर चोरी प्रकरणात प्राप्तिकर खात्याने छापेमारी (Raid on Kalpataru Group) केली. समूहाचे संस्थापक, संचालक आणि इतर कार्यालयावर छापे टाकण्यात आले. शुक्रवारीच आयकर खात्याने ही कारवाई केली. महाराष्ट्र, गोवा, गुजरात आणि राजस्थान येथील कार्यालय पण आयटी विभागाच्या रडारवर होते. कंपनीच्या व्यवहारात अनियमितता आणि कथित शेकडो कोटींच्या निधीचा गैरव्यहार प्रकरणात ही कारवाई करण्यात आली. आयकर विभागाने कल्पतरु समूहाचे संस्थापक मोफतराज पी. मुनोत आणि व्यवस्थापकीय संचालक पराग एम मुनोत यांच्या निवासस्थानावर छापा टाकला. या छापेमारीमुळे शेअर बाजारात (Share Market) कंपनीच्या शेअरवर विपरीत परिणाम झाला. शेअरमध्ये घसरण दिसून आली.

30 ठिकाणी छापेमारी

आयकर विभागाने शुक्रवारी ही कारवाई केली. कल्पतरु समूहाच्या महाराष्ट्र, गोवा, गुजरात आणि राजस्थान येथील कार्यालयावर छापे टाकण्यात आले. प्राप्तिकर खात्याने एकूण 30 ठिकाणी छापेमारी केली. हे वृत्त पसरताच कल्पतरुचा शेअर 646 रुपयांहून घसरुन 580 रुपयांवर पोहचला. या शेअरमध्ये 7 टक्क्यांहून अधिकची घसरण झाली.

हे सुद्धा वाचा

चार कंपन्या रडारवर

कथित कर चोरीप्रकरणात कल्पतरू समूहाच्या चार कंपन्या रडारवर आल्या आहेत. कंपनीच्या मुंबई आणि पुण्याच्या कार्यालयात पण छापा टाकण्यात आला. या छाप्यात काही तथ्य समोर आली, याची कोणतीच माहिती आयटी विभागाने दिली नाही. कल्पतरु समूहाने पण याविषयी कोणती माहिती दिलेली नाही. पण शेकडोंची कर चुकवेगिरी केल्याप्रकरणातच ही कारवाई झाल्याची चर्चा आहे.

बांधकाम क्षेत्रातील दादा कंपनी

कल्पतरु उद्योगसमूहाचा बांधकाम क्षेत्रात मोठा दबदबा आहे. देशातील अनेक राज्यात आणि शहरात कंपनीच्या साईट सुरु आहेत. कंपनी इतर उद्योगातही अग्रेसर आहे. कल्पतरु ही वीज वितरण, इमारती, पाणी पुरवठा, सिंचन, रेल्वे, तेल, गॅस पाईपलाईन, उड्डाणपूलं, मेट्रो रेल्वे, महामार्ग, विमानतळे यांच्या विकास कार्यात पण अग्रेसर आहे.

आताच बदलले नाव

या वर्षी कल्पतरु पॉवर ट्रान्समिशनने नाव बदलून कल्पतरु प्रोजेक्ट्स इंटरनॅशनल असे केले. 30 मे रोजी तीन प्रवर्तकांनी कंपनीचे 467.83 कोटी रुपयांचे शेअर पॉवर ट्रान्समिशनच्या आणि इन्फ्रास्ट्रक्चरसाठी ऑफलोड केले. हे वृत्त पसरताच कल्पतरुचा शेअर 646 रुपयांहून घसरुन 580 रुपयांवर पोहचला. या शेअरमध्ये 7 टक्क्यांहून अधिकची घसरण झाली. कल्पतरु ही वीज वितरण, इमारती, पाणी पुरवठा, सिंचन, रेल्वे, तेल, गॅस पाईपलाईन, उड्डाणपूलं, मेट्रो रेल्वे, महामार्ग, विमानतळे यांच्या विकास कार्यात पण अग्रेसर आहे.

बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट
बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट.
वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच
वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच.
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले.
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम.
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत.
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर.
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले.
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक.
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?.
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल.