कोरोनाग्रस्त महिलेला अव्वाच्या सव्वा बिल, कल्याणच्या सेना नगरसेवकाने उचलून घरी पोहोचवले

रुग्णालयाने रुग्णाला पीपीई किटचे 50 हजार लावले होते. इतकेच नव्हे तर रुग्णालयीन कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचा खर्चदेखील रुग्णाच्या माथी मारला होता.

कोरोनाग्रस्त महिलेला अव्वाच्या सव्वा बिल, कल्याणच्या सेना नगरसेवकाने उचलून घरी पोहोचवले
Follow us
| Updated on: Aug 06, 2020 | 5:36 PM

कल्याण : कोरोनाग्रस्त महिलेला अव्वाच्या सव्वा बिल आकारल्याने शिवसेना नगरसेवकाने तिला चक्क हॉस्पिटलमधून उचलून घरी आणले. कल्याण डोंबिवली महापलिकेचे शिवसेना नगरसेवक महेश गायकवाड यांनी रुग्ण महिलेला थेट घरी पोहोचते केले. (Kalyan Dombivali Shivsena Corporator Mahesh Gaikwad takes Corona free Patient to her home)

संबंधित महिलेच्या नातेवाईकांनी हॉस्पिटलमध्ये 80 हजार रुपये भरले, तेव्हा तिच्यावर उपचार होतील, अशी हमी हॉस्पिटल प्रशासनाने दिल्याचे सांगितले जाते. मात्र डिस्चार्जच्या वेळेस आपल्याकडे अतिरिक्त 90 हजार रुपयांची मागणी करण्यात आली, असा दावा रुग्णाच्या नातेवाईकांनी केला आहे.

हेही वाचा : खासदार नवनीत कौर राणा यांना कोरोनाची लागण

रुग्णालयाचा पवित्रा पाहून रुग्णाचे नातेवाईक हैराण झाले. याबाबत त्यांनी कल्याण पूर्वचे नगरसेवक महेश गायकवाड यांना सांगितले. तेव्हा गायकवाड यांनी रुग्णालयात जाऊन बिलाबाबत जाब विचारला.

Mahafast 100 | बुलेटच्या वेगाने 100 बातम्या, ‘महाफास्ट’ रोज रात्री 7.56 वा. टीव्ही 9 मराठीवर

रुग्णालयाने रुग्णाला पीपीई किटचे 50 हजार लावले होते. इतकेच नव्हे तर रुग्णालयीन कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचा खर्चदेखील रुग्णाच्या माथी मारला होता, असे समोर आले. त्यामुळे संतप्त नगरसेवकाने रुग्णाला उचलून थेट घरी पोहचते केले. या घटनेनंतर कोरोना काळात रुग्णाला लुबाडणाऱ्या हॉस्पिटलवर काय कारवाई होणार, असा सवाल विचारला जात आहे.

(Kalyan Dombivali Shivsena Corporator Mahesh Gaikwad takes Corona free Patient to her home)

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.