कांदिवली स्टेशनजवळ रेल्वेची ट्रकला धडक, बॅरिकेट्स तोडून ट्रक फरफटत

ट्रकची मागील बाजू रेल्वे मार्गावर आल्याने ही धडक झाली. सुदैवाने या अपघातत कुणालाही दुखापत झाली नाही. (Kandivali Train Collides With Truck)

कांदिवली स्टेशनजवळ रेल्वेची ट्रकला धडक, बॅरिकेट्स तोडून ट्रक फरफटत
Follow us
| Updated on: Jul 20, 2020 | 3:43 PM

मुंबई : रेल्वे रुळावर ट्रक आल्याने जोराची धडक होऊन अपघात झाला. कांदिवली स्टेशनजवळ ही दुर्घटना घडली. ट्रकची मागील बाजू रेल्वे मार्गावर आल्याने ही धडक झाली. सुदैवाने या अपघातत कुणालाही दुखापत झाली नाही. (Kandivali Train Collides With Truck) वांद्रे-अमृतसर या रेल्वेला दुपारी साडेबाराच्या सुमारास हा किरकोळ अपघात झाला.

पश्चिम रेल्वेमार्गावरील कांदिवली रेल्वे स्टेशनजवळ रेल्वे लाईनचं काम सुरु आहे. यासाठी ट्रकमधून आवश्यक मालवाहतूक केली जाते. मात्र आज दुपारी साडेबाराच्या सुमारास, आलेल्या रेल्वेने, या ट्रकला धडक दिली. या धडकेमुळे ट्रकच्या मागील बाजूचं नुकसान झालं आहे. शिवाय रेल्वेच्या धडकेमुळे ट्रक फरफटत गेल्याने दुभाजकाच्या बॅरिकेट्स तोडून, ट्रक पुढे गेला. (Kandivali Train Collides With Truck)

सुदैवाने या अपघातात कोणालाही दुखापत झालेली नाही. मात्र यामुळे वाहतूक विस्कळीत झाली. या अपघातामुळे घटनास्थळी पोलीस आणि अधिकाऱ्यांनी धाव घेत, आवश्यक उपाययोजना केल्या.

दरम्यान, रेल्वे लाईनचं काम सुरु असताना, रेल्वेमार्गावर ट्रक कसा आला, यामध्ये कोणाचा हलगर्जीपणा आहे का, याबाबत आता तपास सुरु आहे.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.