AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ketaki Chitale : वयाची तिशी गुन्ह्यांची विशी, अभिनयाचा पडदा ते तुरुंगाचे गज, केतकीची स्माईल आणि स्टाईल मात्र तीच

आता ती अॅट्रोसिटीच्या केसमध्ये अडचणीत आली आहे. मात्र केतकीचे वय जरी 30 च्या आसपास असले तरी तिच्यावर आतापर्यंत जवळपास 20 गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामुळे तिला महाराष्ट्रभर जेलवारी करावी लागणार का? असाही सवाल आता उपस्थित झाला आहे.

Ketaki Chitale : वयाची तिशी गुन्ह्यांची विशी, अभिनयाचा पडदा ते तुरुंगाचे गज, केतकीची स्माईल आणि स्टाईल मात्र तीच
अभिनेत्री केतकी चितळेImage Credit source: Facebook
| Updated on: May 20, 2022 | 4:06 PM
Share

मुंबई : गेल्या आठवडाभरा राज्यात एक पुन्हा चांगलेच चर्चेत आलंय. ते म्हणजे अभिनेत्री केतकी चितळेचं (Ketaki Chitale). केतकीने शरद पवारांबाबत (Sharad Pawar) एक आक्षेपार्ह पोस्ट केली आणि त्यानंतर तिच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत गेल्या. आज तिला रबाळे पोलिसांनी (Navi Mumbai Police) वाशी कोर्टात हजर केले होते. त्यानंतर कोर्टाने तिला 5 दिवसांची कोठडी सुनवाली आहे. सर्वात आधी तिला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनवण्यात आली होती. त्यानंतर ही कोठडी संपताच ठाणे पोलिसांनी केतकीला सत्र न्यायालयात हजर केलं. ठाकणे कोर्टाकडून केतकीला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. न्यायालयीन कोठडीमुळं केतकीचा जामिनाचा मार्ग मोकळा झाला असला. तर तिच्याविरोधात महाराष्ट्रभरात दाखल गुन्हे पाहता तिला एकापाठोपाठ अटक होऊ शकते, असेही कायदेतज्ज्ञ सांगत आहेत. आता ती अॅट्रोसिटीच्या केसमध्ये अडचणीत आली आहे. मात्र केतकीचे वय जरी 30 च्या आसपास असले तरी तिच्यावर आतापर्यंत जवळपास 20 गुन्हे दाखल झाले आहेत.

केतकीवर कुठे गुन्हे दाखल?

केतकी विरोधात शरद पवारांबाबत आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी महाराष्ट्रभरात 17 ठिकाणी गुन्हे दाखल झालेत. मुंबईत गोरेगाव, पवई, भोईवाडा, ठाण्यातील कळव्यात, नवी मुंबईतल्या नेरुळमध्ये, कळंबोली, पुणे, पिंपरी चिंचवड, देहूरोड, नाशिक, धुळे, अकोला, अमरावती, जळगाव, सातारा, अहमदनगर, उस्मानाबाद, यवतमाळमध्येही केतकीवर गुन्ह्याची नोंद झालीय. आता रबाळे पोलिसांनंतर या ठिकाणचे पोलीसही केतकीला ताब्यात घेऊ शकतात. तसेच फक्त हे 17 नाही तर याआधीही अशाच वादग्रस्त पोस्ट आणि विधान केल्यामुळेही तिच्यावर अनेक ठिकाणी गुन्हे दाखल झाले आहेत. आता तुम्ही म्हणाल एवढे गुन्हे तर एकाद्या सराईत गुन्हेगारावरही दाखल नसतील, अशीच काही परिस्थिती याठिकाणी निर्माण झाली आहे.

महाराष्ट्रभर जेलवारी करावी लागणार?

गोरेगाव, पवई, भोईवाडा, ठाण्यातील कळव्यात, नवी मुंबईतल्या नेरुळमध्ये, कळंबोली, पुणे, पिंपरी चिंचवड, देहूरोड, नाशिक, धुळे, अकोला, अमरावती, जळगाव, सातारा, अहमदनगर, उस्मानाबाद, यवतमाळ, एवढ्या ठिकाणी गुन्ह्यांची नोंद झाल्यावर आता सहाजिकच केतकीला महाराष्ट्रभर जेलवारी करावी लागणार का असा सवाल आता उपस्थित झाला आहे.

अनेकजण अडचणीत

या प्रकरणा एकटी केतकीच नाही तर इतरही अनेकजण वादग्रस्त पोस्टमुळे उडचणीत आले आहेत. पनवेल पोलिसांनी किरण ईनामदार नावाच्या तरुणाला अशाच वादग्रस्त पोस्टप्रकरणी ताब्यात घेतले आहे. तर दुसरी कडे काही दिवस आधी शरद पवारांबाबात अशी आक्षेपार्ह पोस्ट करणारा आणखी एक तरुण ताब्यात घेण्यात आलाय. त्यामुळे हे लोन दिवसेंदिवस पसरतच चालले आहे.

BMC साठी महायुतीची पहिली बैठक, पहिल्या फेरीत 142 जागांवर तोडगा
BMC साठी महायुतीची पहिली बैठक, पहिल्या फेरीत 142 जागांवर तोडगा.
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द.
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन.
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट.
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!.
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार.
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर.
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा.
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?.