Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ketaki Chitale : केतकी चितळेच्या अडचणीत आणखी वाढ, गोरेगाव पोलीस ताबा घेण्यासाठी हजर, इतर ठिकाणच्या पोलिसांचे प्रयत्नही सुरू

गोरेगाव पोलिसांना केतकीची ताबा घेण्याची परवानगी कालच मिळाली होती. मात्र वेळेअभावी त्यांना ताबा घेता आला नव्हाता. त्यामुळे ते आज केतकीचा ताबा घेत आहे.राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी केतकीविरोधात राज्यात तब्बल 17 ठिकाणी गुन्हे दाखल झाले आहेत.

Ketaki Chitale : केतकी चितळेच्या अडचणीत आणखी वाढ, गोरेगाव पोलीस ताबा घेण्यासाठी हजर, इतर ठिकाणच्या पोलिसांचे प्रयत्नही सुरू
केतकी चितळे, अभिनेत्रीImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: May 19, 2022 | 4:08 PM

ठाणे : अभिनेत्री केतकीच चितळेच्या (Ketaki Chitale) अडचणीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. कारण आता गोरेगाव पोलीस (Mumbai Police) केतकीचा ताबा घेण्यासाठी ठाणे कारागृहात (Thane jail) दाखल झाले आहेत. गोरेगाव पोलिसांना केतकीची ताबा घेण्याची परवानगी कालच मिळाली होती. मात्र वेळेअभावी त्यांना ताबा घेता आला नव्हाता. त्यामुळे ते आज केतकीचा ताबा घेत आहे.राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी केतकीविरोधात राज्यात तब्बल 17 ठिकाणी गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामुळे इतर पोलीसही केतकीचा ताबा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. पुण्यासह इतरही ठिकाणचे पोलीस नंतर घेणार ताबा घेणार असल्याची माहितीही समोर आली आहे. केतकी प्रकरणाने सध्या राज्याचे राजकारण ढवळून निघालंय. केतकीच्या पोस्टवर सर्वच राजकीय पक्षांनी निधेष व्यक्त केला आहे. मात्र यात आता दोन्ही बाजुने प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

तृप्ती देसाई काय म्हणाल्या?

काल भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी यावर प्रतिक्रिया देताना म्हणाल्या होत्या, केतकी चितळेच्या वयाचा विचार करता या सर्व गोष्टी संपवायला हव्यात, पवार साहेब मोठे नेते आहेत, त्यावर आता भूमिता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. असे म्हणणाऱ्या पंकजाताई मुंडे किती अभ्यासू आहेत ते कळतंय. परंतु दुसरी बाजू पाहता पवारसाहेबांच्या कन्या सुप्रियाताई मात्र कार्यकर्त्यांच्या माध्यमातून हे प्रकरण वाढवतानाच दिसत आहेत. सुप्रियाताईंनी स्वतःहून अशी सामंजस्याची भूमिका घेतली असती तर नक्कीच सर्वसामान्यांच्या मनात त्यांना अजून आदराचे स्थान वाढले असते. पंकजाताईंनी एक महिला म्हणून एका महिलेकडे बघण्याचा दृष्टिकोन जो दाखवला आहे, त्यामुळे त्यांच्याविषयी आमच्या मनात अजूनच आदर वाढला आहे. असे म्हणत तृप्ती देसाई यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर निशाणा साधला आहे.

आक्षेपार्ह पोस्टप्रकरणी अनेकजण अटकेत

केतकी चितळेची पोस्ट शअर करणे आणि त्यावर आणखी आक्षेपार्ह मजकूर पोस्ट करणे आणखी एका तरुणाला महागात पडलं आहे. कालच पनवेल पोलिसांनीही एका तरुणाला या प्रकरणात अटक केली आहे. किरण इनामदार असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. तर आधीही पवारांबाबत आक्षेपार्ह पोस्ट करणार भामरे अडनावाचा तरुणही पोलिसांच्या ताब्यात आहे. त्यामुळे या प्रकरणाची व्याप्ती वाढताना दिसून आली आहे. हे प्रकरण दिवसेंदिवस राज्यभर पसरत चालले आहे. यावरून राजकारणतही सध्या चांगल्याच ठिणग्या उडत आहेत. आता हे प्रकरण कधी शांत होणार हे येणारा काळच सांगेल.

हे सुद्धा वाचा

कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, मद्रास हाय कोर्टाचा दिलासा
कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, मद्रास हाय कोर्टाचा दिलासा.
केवळ दशक नाही, तर लोकांचं आयुष्य बदललंय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
केवळ दशक नाही, तर लोकांचं आयुष्य बदललंय - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
बावनकुळे - राऊत यांच्यात जुंपली; वार पालटवाराचं शाब्दिक युद्धं
बावनकुळे - राऊत यांच्यात जुंपली; वार पालटवाराचं शाब्दिक युद्धं.
आमचं सरकार टॅक्सच्या पै पैचा सन्मान करतं - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आमचं सरकार टॅक्सच्या पै पैचा सन्मान करतं - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा.
भारत जगातील एकमेव मेजर इकोनॉमी, मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा
भारत जगातील एकमेव मेजर इकोनॉमी, मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा.
न्यायालयाच्या आवारात कोरटकरवर शिव्यांची लाखोली
न्यायालयाच्या आवारात कोरटकरवर शिव्यांची लाखोली.
'तर हे कटाक्षाने पाळावं लागेल',ठाकरे गटाकडून 'तो' जुना व्हिडीओ व्हायरल
'तर हे कटाक्षाने पाळावं लागेल',ठाकरे गटाकडून 'तो' जुना व्हिडीओ व्हायरल.
३१ तारखेच्या आत पीक कर्ज भरा; अजितदादांच्या शेतकऱ्यांना सूचना
३१ तारखेच्या आत पीक कर्ज भरा; अजितदादांच्या शेतकऱ्यांना सूचना.
'आकाच्या सांगण्यावरून..',आरोपींच्या कबुलीनंतर धसांची पहिली प्रतिक्रिया
'आकाच्या सांगण्यावरून..',आरोपींच्या कबुलीनंतर धसांची पहिली प्रतिक्रिया.