600 रुपयांची मृतदेह बॅग 6,719 रुपयांना कशी? सोमय्यांचा मुंबई मनपावर अंत्यसंस्कार घोटाळ्याचा आरोप

भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी मुंबई महानगरपालिकेत कोरोना रुग्णांच्या अत्यंसंस्कारासाठी वापरण्यात आलेल्या मृतदेह बॅगमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप केला आहे (Kirit Somaiya on corona deadbody bags corruption).

600 रुपयांची मृतदेह बॅग 6,719 रुपयांना कशी? सोमय्यांचा मुंबई मनपावर अंत्यसंस्कार घोटाळ्याचा आरोप
Follow us
| Updated on: Jun 13, 2020 | 1:41 PM

मुंबई : भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी मुंबई महानगरपालिकेत कोरोना रुग्णांच्या अत्यंसंस्कारासाठी वापरण्यात आलेल्या मृतदेह बॅगमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप केला आहे (Kirit Somaiya on corona deadbody bags corruption). जी मृतदेह बॅग बाजारात 600 रुपयांना मिळते, ती बॅग महानगरपालिकेने 6,719 रुपयांना विकत घेतली. या मृतदेह बॅगच्या टेंडरमध्येच घोटाळा झाला आहे, असा आरोप सोमय्या यांनी केला. यावेळी त्यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली. ततसेच हे टेंडर कुणी भरलं होतं ही माहिती जनतेसमोर यायला हवी, असं म्हटलं.

किरीट सोमय्या म्हणाले, “कोरोना रुग्णांचे मृतदेह ठेवण्यासाठीच्या प्लास्टिक बॅगची किंमत मुंबई महानगरपालिकेने 6 हजार 719 रुपये सुचिक केली होती. मात्र, ही इतकी किंमत कोणत्या आधारावर सुचित करण्यात आली. या बॅगसाठी टेंडर प्रक्रिया सुरु झाली, अनेकांनी टेंडर भरले. यात बॅगसाठी 6 हजार 719 रुपयांचं टेंडर भरण्यात आलं आणि ते बीएमसीने स्वीकारलं. मात्र, बाजारात या बॅगची किंमत केवळ 600 रुपये आहे. हे उघड झाल्यावर आज बोंबाबोंब झाली. यानंतर मुंबई महानगरपालिकेने ते टेंडर रद्द केले. मात्र, हा घोटाळा ज्यांनी घडवून आणण्याचा ज्याने प्रयत्न केला त्याची चौकशी व्हायला हवी. 6 हजार 719 किंमत कोणी ठरवली, कुणी टेंडर भरले होते ही सर्व माहिती लोकांसमोर आली पाहिजे.”

किरीट सोमय्या यांनी राज्य सरकारच्या कोरोना नियंत्रणाच्या व्यवस्थापनावरही ताशेरे ओढले. गोरेगावमधील नेस्को रुग्णालयातील 3,000 बेडपैकी केवळ 387 बेड वापरण्यात आल्या आहेत. तर बांद्रातील एमएमआरडीए बीकेसी रुग्णालयातील 1 हजार 87 बेड्सपैकी केवळ 315 बेड वापरण्यात आले आहेत. असं असताना बीएमसीच्या इतर रुग्णालयांमध्ये कोरोना रुग्णांना इमारतीच्या पॅसेज आणि लॉबीमध्ये ताटकाळत बेड रिकामे होण्याची वाट पाहत आहेत. बीकेसीमध्ये इतके सारे बेड उपलब्ध असतानाही इतक्या रुग्णांना बेडच्या प्रतिक्षात का आहेत? असा प्रश्न किरिट सोमय्या यांनी सरकारला विचारला आहे.

संबंधित बातम्या :

अंत्यसंस्कारासाठी रांगा, पाच-सहा तास वेटिंग, मुंबईत आता अंत्यसंस्कारासाठीही ऑनलाईन बुकिंग

नवी मुंबईत कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ, एकाच दिवसात 129 नवे रुग्ण

महाराष्ट्रातील संकटात केंद्रीय हात नाही, पण सरकारे पाडण्यासाठी निधी वेळेत : सामना

Kirit Somaiya on corona deadbody beds corruption

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.