तुम्ही लवंगी फटाका फोडला, मी दिवाळीनंतर फटाक्यांवर फटाके फोडणार; किरीट सोमय्यांचा सूचक इशारा
तुम्ही लवंगी फटका फोडला. तोही फुस्स निघाला. पण मी दिवाळीपासून देव दिवाळीपर्यंत फटाक्यांवर फटाके फोडणार आहे. जवळपास अर्धा डझन फटाके फोडणार आहे. (Kirit Somaiya Samvad with BJP Activists at mumbai)
मुंबई: तुम्ही लवंगी फटका फोडला. तोही फुस्स निघाला. पण मी दिवाळीपासून देव दिवाळीपर्यंत फटाक्यांवर फटाके फोडणार आहे. जवळपास अर्धा डझन फटाके फोडणार आहे, असा सूचक इशारा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दिला आहे.
भाजप कार्यकर्त्यांना संबोधित करताना किरीट सोमय्या यांनी हा इशारा दिला. एक नाय… दोन नाय… तीन नाय… चार नाय… पूर्ण अर्धा डझन लोकांचे फटाके फुटणार आहेत. दिवाळी ते देव दिवाळीपर्यंत हे फटाके फुटणार आहेत. या ठाकरे सरकारने घोटाळे केले. तीन मंत्र्यांचे तीन घोटाळे आहेत. अजित पवारांनी त्यांच्या जावयाला खूश केलं. हसन मुश्रीफ यांनी त्यांच्या जावयांना खूश केलं. नवाब मलिकांनी त्यांच्या जावयांना खूश केले. पण मी या सर्वांचे फटाके फोडले, असं सोमय्या म्हणाले.
घोटाळ्यापासून लक्ष विचलीत करण्याचा प्रयत्न
आम्ही अॅटम बॉम्ब फोडतो. त्यांनी लवंगी मिरची फोडली. तीही फूस्स गेली. गेली 13 दिवस नाटक सुरू आहे. शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना घोटाळ्यापासून लक्ष विचलीत करायचं होतं. रोज उठून मलिक ट्विट करतात, फेसबूकवर पोस्ट टाकतात, नंतर पीसी घेतात. वानखेडे हिंदू नाही, मुस्लिम आहेत… मुस्लिम नाहीत, दलित आहेत… क्रांती रेडकरचा नवरा मुस्लिम आहे… त्याचं पहिलं लग्न झालं… हे झालं अन् ते झालं… गेल्या 13 दिवस हेच सुरू आहे. काय लावलं आहे महाराष्ट्रात? असा संतप्त सवालही त्यांनी केला.
तुमच्या सरकारचं तेरावं घालणार
13 दिवस तुम्ही नाटक केलं. तुमच्या सरकारचं तेरावं आम्ही करणार आहोत. या वानखेडेने काय केलं? त्यांची चूक झाली असेल तर करा ना तक्रार, असं आव्हानच त्यांनी दिलं.
मलिकांचा हल्लाबोल
दरम्यान, नवाब मलिक यांनीही किरीट सोमय्या यांच्या धमक्यांना भीक घालत नसल्याचं म्हटलं. किरीट सोमय्या घोटाळे उघड करण्याची पोकळ धमकी देत आहेत. आम्हाला काय धमक्या देताय. आम्ही अशा धमक्यांना घाबरत नाही. आगामी अधिवेशनात मीच भाजपचे पुराव्यानिशी घोटाळे उघड करणार आहे. मी असा भांडाफोड करणार आहे की भाजप नेते आणि कार्यकर्त्यांना तोंड लपवून पळावे लागेल, असं मलिक म्हणाले.
संबंधित बातम्या:
समीर वानखेडे जन्माने मुस्लिमच, बोगस दाखल्यावरून नोकरी मिळवली; नवाब मलिक ठाम
औरंगाबादेत मालमत्ता नियमित करण्यासाठी मुदतवाढ, 30 नोव्हेंबरपर्यंत प्रक्रिया करण्याची परवानगी
(Kirit Somaiya Samvad with BJP Activists at mumbai)