Kirit Somaiya : राज्यातला वाद पुन्हा दिल्लीत पोहोचणार, सोमय्यांसह भाजप नेत्यांचं शिष्टमंडळ केंद्रीय गृह सचिवांना भेटणार
ही शिवसेनेची गुंडगिरी आहे. किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांना संपण्याचा हा डाव आहे, असा आरोप वारंवार होत आहे. त्यातच आता राज्यातला हा वाद पुन्हा दिल्लीत पोहोचला आहे. कारण भाजप नेते उद्या केंद्रीय गृहसचिवांना (Central Home secretory) भेटण्यासाठी जाणार आहेत.
मुंबई : राज्यात पुन्हा भाजप विरुद्ध महाविकास (Bjp Vs Shivsena) आघाडी असा जोरदार वाद रंगला आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर पुन्हा हल्ला झाल्याने राजकारण आणखी तापलं आहे. भाजप नेतेही आता यावरून आक्रमक झाले आहेत. ही शिवसेनेची गुंडगिरी आहे. किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांना संपण्याचा हा डाव आहे, असा आरोप वारंवार होत आहे. त्यातच आता राज्यातला हा वाद पुन्हा दिल्लीत पोहोचला आहे. कारण भाजप नेते उद्या केंद्रीय गृहसचिवांना (Central Home secretory) भेटण्यासाठी जाणार आहेत. त्यावेळी ते महाविकास आघाडी आणि पोलिसांविरोधात तक्रार करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. शिवसैनिकांनी मल्ला संपण्यासाठी पुन्हा माझ्यावर हल्ला केला असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. तर उद्याच्या दिल्ली दौऱ्याबाबत त्यांनी त्यांच्या ट्विटरवरून माहिती दिली आहे. त्यामुळे पुन्हा केंद्रीय तपास यंत्रणाही यात उतरण्याची शक्यता आहे.
भाजपच्या शिष्टमंडळात कोण कोण?
भाजप नेते यांनी ट्विट करून याबाबत माहिती देताना, उद्या 10.15 वा. भाजपाचे शिष्टमंडळ आमदार मिहिर कोटेचा, आमदार अमित साटम, आमदार पराग शाह, आमदार राहुल नार्वेकर आणि भाजपा महापालिका नेता विनोद मिश्रा आण मी नॉर्थ ब्लॉक दिल्ली येथे केंद्र सरकारचे गृह सचिव यांना शिवसेनेचा गुंडांनी मला केलेल्या मारहाण प्रकरण संबंधात कारवाई साठी भेटणार, असे ट्विट केले आहे. त्यामुळे उद्या पुन्हा एकदा यावरून राजकीय आरोप प्रत्यारोप रंगणार हे स्पष्ट झाले आहेत.
किरीट सोमय्या यांचं ट्विट
उद्या १०.१५ वा. भाजपा चे शिष्टमंडळ आ मिहिर कोटेचा, आ अमित साटम, आ. पराग शाह, आ राहुल नार्वेकर आणि भाजपा महापालिका नेता विनोद मिश्रा आण मी
नॉर्थ ब्लॉक दिल्ली येथे केंद्र सरकारचे गृह सचिव यांना शिवसेनेचा गुंडांनी मला केलेल्या मारहाण प्रकरण संबंधात कारवाई साठी भेटणार.
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) April 24, 2022
सुधीर मुनगंटीवर यांचाही हल्लाबोल
राज्यातील चालू घडामोडींवर बोलताना भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनीही सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. जो वाईट कृती करतो त्याला संविधानाच्या शक्तीच्या आधारावर सर्व भोगाव लागतं असे भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलंय..बेईमानाच्या आधारावर जन्माला आलेल सरकार आपल्या बेईमानीचा पिच्छा सोडायला तयार नाही. तुम्ही हनुमान चालिसा म्हणणार असाल तर हे देशातील सर्वात अपवित्र कार्य , हा राजद्रोह परंतु वंदे मातरम , भारत माता की जय न म्हणणारे हे तर मांडीवर बसले पाहिजेत. अशी टीका त्यांनी केली आहे.