Sanjay Raut Vs Kirit somaiya : संजय राऊतांविरोधात तक्रार करण्यासाठी सोमैया बायको मुलं, सुनेसह पोलीस ठाण्यात, ‘तुडवा’ भोवणार?

100 कोटींचा टॉयलेट घोटाळा मी केला, असा आरोप संजय राऊत यांनी केला. मी ठाकरे सरकारला आव्हान केले आहे, की 100 पैशाचा घोटाळा तर दाखवा. राऊतांवर क्रिमिनल अॅक्शन घ्या. मी पुढच्या आठवड्यात क्रिमिनिल डिफिमेशन केस नोंदवणार असल्याचे किरीट सोमैया म्हणाले आहेत.

Sanjay Raut Vs Kirit somaiya : संजय राऊतांविरोधात तक्रार करण्यासाठी सोमैया बायको मुलं, सुनेसह पोलीस ठाण्यात, 'तुडवा' भोवणार?
संजय राऊतांविरोधात तक्रार दाखल करण्यासाठी जात असताना सोमैया कुटुंबImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: May 09, 2022 | 12:32 PM

मुंबई : शिवसेने नेते संजय राऊत यांच्याविरोधात भाजपा नेते किरीट सोमैया (Kirit Somaiya) यांच्या पत्नी मेधा सोमैया यांनी अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे. याकरता किरीट सोमैया, मेधा सोमैया आणि सर्व सोमैया कुटुंब पोलीस स्टेशनला पोहोचले. मुलुंडच्या नवघर पोलिसांत एफआयआर (FIR) अर्ज मेधा सोमैया यांनी दाखल केला आहे. सामनाच्या संपादकीय लेखात आपल्याविरोधात अपशब्द वापरण्यात आले, असा आरोप मेधा सोमैया (Medha Somaiya) यांनी केला आहे. सोबत त्यांचे वकील तसेच भाजपाचे कार्यकर्तेदेखील होते. शिवसेना आणि भाजपाचे वाद पाहता यावेळी पोलीस खबरदारी घेताना दिसून आले. मागच्या काही दिवसांपासून शिवसेना-भाजपात वाक् युद्ध पाहायला मिळत आहे. त्यात संजय राऊत आणि किरीट सोमैया यांच्यात तर तीव्र सामना सुरू आहे. आरोप-प्रत्यारोप रोजच होताना दिसून येत आहेत. आता सर्व कुटुंबासह सोमैयांनी राऊत यांच्याविरोधात तक्रार केली आहे.

‘नौटंकी बंद करा’

संजय राऊतांवर टीका करताना किरीट सोमैया म्हणाले, की नवघर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. प्रो. डॉ. मेधा किरीट सोमैया यांनी राऊतांविरोधात भादंवि 503, 506, 509 याअंतर्गत एफआयआर रजिस्टर करावी. 35 वर्ष शिक्षण क्षेत्रात त्या आहेत. भोंगा राऊत यांनी त्यांचे चारित्र्यहनन केले. सोमैया परिवारावर दडपण आणले. पोलिसांना चॅलेंज आहे. नौटंकी बंद करा. एफआयआर दाखल करणार नाही, त्या पोलिसांवर कारवाई करणार, असे संजय पांडे म्हणाले. आता आम्ही एफआयआर दाखल केला आहे. त्यांनी तो करून घ्यावा, असे किरीट सोमैया म्हणाले आहेत.

‘100 पैशाचा घोटाळा तर दाखवा’

100 कोटींचा टॉयलेट घोटाळ्याचा आरोप मी केला, असा आरोप संजय राऊत यांनी केला. मी ठाकरे सरकारला आव्हान केले आहे, की 100 पैशाचा घोटाळा तर दाखवा. राऊतांवर क्रिमिनल अॅक्शन घ्या. मी पुढच्या आठवड्यात क्रिमिनिल डिफिमेशन केस नोंदवणार असल्याचेही सोमैया म्हणाले. युवा प्रतिष्ठान स्थापन करून सोमैया कुटुंबाने 100 कोटींचा घोटाळा केला, असा आरोप संजय राऊत यांनी केला होता. त्यावर सोमैया आक्रमक झाले असून आपली आणि आपल्या कुटुंबाची बदनामी, चारित्र्यहनन केल्याचा आरोप करत तक्रार दाखल केली आहे.

राऊत काय म्हणाले होते?

शिवसेना नेते संजय राऊत यांनी सोमैयांवर टॉयलेट घोटाळ्याचा आरोप केला होता. मीरा भाईंदर महापालिका आणि राज्यात हा काही कोटींचा टॉयलेट घोटाळा केला आहे. सोमैया हे युवा प्रतिष्ठान नावाची प्रतिष्ठान चालवत होते. त्यांनी खोटी बिलं देऊन पैसे उकळले. पर्यावरणाचा ऱ्हास झाल्याची कारणं दाखवून हा घोटाळा झाला आहे. एकूण 100 कोटींचा हा घोटाळा असून याबाबत पत्रकार परिषद घेऊन सविस्तर माहिती देणार असल्याचे राऊत म्हणाले होते. घाण करून ठेवणारे म्हणतील पुरावे कुठे आहेत? पुरावे कुठे आहेत हेही माहिती आहे. युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून मेधा सोमैया आणि त्यांच्या कुटुंबाने केलेला हा घोटाळा आहे, असा दावाही त्यांनी केला होता.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.